श्री साईबाबा संस्थानचे कॅन्सर रुग्णालय; बासनात गुंडाळून लालफितीत अडकून ठेवले- संजय काळे
Shree Saibaba Sansthan’s Cancer Hospital wrapped in silk wrapped in red tape – Sanjay Kale
Rajendara C. Salkar,News Portal, वृत्तवेध ऑनलाईन! Sat20July , 20.00 Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव : श्री. साईबाबा संस्थानने, श्रीसाईबाबा शताब्धी कॅन्सरहॉस्पीटल चालू करावे असा प्रस्ताव संस्थानने, पहिल्यांदा व्यवस्थापन समितीचे बैठकित (दि.९मार्च) २०१७ रोजी निर्णय क्र. १७१ प्रमाणे चर्चेत आला. परंतु गेल्या आठ वर्षात संस्थान व्यवस्थापनाने हेतू पुरस्कार हा प्रस्ताव बासनात गुंडाळून लालफितीत अडकून ठेवले असल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी केला असून श्री. साईबाबा संस्थानने कॅन्सर हॉस्पीटल चालू करण्याचे विनंती पत्र नुकतेच संस्थांनचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहे
ग्रामीण भागातील कॅन्सरग्रस्त रुग्ण आज महागड्या उपचार पध्दतील उपचार न घेताच मरण स्विकारत आहे. श्री. साईबाबांच्या विचारात रुग्ण सेवा प्राधान्य क्रमांकावर आहे. त्यामुळे संस्थानने प्राधान्याने शिर्डीत स्वतःचे कॅन्सर हॉस्पीटल काढावे.श्री साईबाबा संस्थानच्या कॅन्सर हॉस्पिटलला टाटा ट्रस्ट मुंबई यांनी संस्थानला कॅन्सर रुग्णालय चालू करायासाठी तांत्रिक, मशिनरी, मनुष्य बळ इत्यादीचे सहाय्य व्यवस्थापन करण्याची तयारी दाखवली. संस्थानचे व्यवस्थापन समितीमध्ये ह्या संदर्भात (दि२६ जुलै) २०१८, व (दि३०मे) २०२३ रोजी चर्चा झाली. शेवटची चर्चा ह्याविषयावर(दि २५जुलै) २०२३ रोजी झाली होती .राज्यात कॅन्सर उपचारात टाटा मेमोरीयल ट्रस्ट मुंबई हे अग्रेसर नाव आहे. त्यांचेकडे अद्ययावत मशिनरी, डॉक्टर, तंत्रज्ञान विकसित आहे. ती संस्था श्री. साईबाबा संस्थानला दवाखाना उभारणीत मदत करण्यास तयार आहे ही आपली जमेची बाजू असल्याचे काळे यांनी पत्रकात म्हटले आहे.
सन २०१८ मध्ये संस्थानने कॅन्सर हॉस्पीटल उभारणीसाठी बांधकाम, मेडीकल १,३३,९०,५४, ५००/- रूपये (अक्षरी- एकशे तेहतीस कोटी नव्वद लाख चौपन्न हजार पाचशे मात्र) येणार असल्याचा अंदाज पकडून विधी व न्याय विभागाकडे परवानगी साठी पाठवले होते. ( दि १६ एप्रील) २०१९ रोजीचे पत्रान्वये विधी व न्याय विभाग, महाराष्ट्र शासन यांनी माहिती मागितली. पण आज अखेर ना माहिती गेली ना कॅन्सर हॉस्पीटल निर्मितीसाठी प्रयत्न झाले. प्रत्येक मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापन समितीचे प्राधान्य क्रम बदलले. असल्याची खंत काळे यांनी पत्रकात व्यक्त केली आहे.
श्री. साईबाबा संस्थानची स्वतःची आर्थिक परिस्थिती मजबूत आहे. संस्थान कैन्सरचे उच्च तंत्रज्ञानाने मजबूत असे स्वतःचे रुग्णालय उभारु शकते. संस्थानने स्वतःच्या पैशातच निविदा बोलावून कॅन्सर हॉस्पीटल उभारावे. कॅन्सर हॉस्पीटलचे स्वतंत्र देणगी खाते रावे उघडावे. जगातील सर्वोच्च प्रतिचे तंत्रज्ञान असलेले उपकरणे स्वतः विकत घ्यावे.
संस्थान व्यवस्थापनाने कॅन्सरचे रूग्णालय स्थापन करण्यासाठी आरक्षण क्र 3938 जे दवाखान्यासाठी राखीव आहे त्याचा वापर करावा. ही आरक्षणे शिर्डी बसस्थानकापासून केवळ ५०० मीटर अंतरावर आहे. आता गगनचुंबी इमारतींना परवानगी असल्यामुळे गावाचे बाहेर लांब रूग्णालय नेण्याची आवश्यकता नाही
संस्थानने हे काम चालू केल्यानंतर हया कार्यासाठी अनेक देणगीदार पुढे येतील यात शंका नसावी…संस्थान व्यवस्थापनाने आजवर हेतुपुरस्कर हा प्रस्ताव आठ वर्षापासून बासनात, लाल फितीत अडकवून ठेवलेला आहे. माझे आपणास विनम्र आवाहन आहे कि संस्थानने स्वतःच्या पैशात तात्काळ मोठे असे जवळ जवळ ५०० बेडचे कैन्सर रूग्णालयाची निर्मिती करावी. असे आवाहन काळे यांनी पत्रकातून केली आहे
आपण तात्काळ माझे पत्राचे अनुषंगाने स्वतंत्र विभाग, अधिकारी, कर्मचारी नेमुन लागणा-या मंजूऱ्या घ्याव्यात, मा. उच्च न्यायालयाची परवानगी घ्यावी. त्यासाठी मी देखील मा. उच्च न्यायालयात सी.ए. दाखल करणार असल्याचे संजय बबुताई भास्करराव काळे यांनी पत्रकात शेवटी नमूद केले आहे
Post Views:
68