रयत शिक्षण संस्था; बहुचर्चित ऑनलाईन शिक्षक बदल्यांना वर्षभर स्थगिती
Ryot Education Institute; A year-long moratorium on the popular online teacher transfers
शिक्षकांनी मानले आमदार काळे यांचे आभारTeachers thanked MLA Kale
पीडीएफ शिक्षक संघटना नाशिक विभाग उपाध्यक्ष ललित जगताप PDF Teachers Association Nashik Division Vice President Lalit Jagtap
Rajendara C. Salkar,News Portal, वृत्तवेध ऑनलाईन! Sat20July , 20.10 Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव : रयत शिक्षण संस्थेतील बहुचर्चित ऑनलाईन बदल्यांना एक वर्ष स्थगिती देण्यात आलीआहे. पवित्र पोर्टलव्दारे प्राप्त होणारे ऑनलाईन उमेदवार मिळण्यास न्यायालयीन प्रक्रियेमुळे विलंब होत असल्याने बदली प्रक्रियेव्दारे करण्यात येणाऱ्या बदल्यास चालू वर्षासाठी स्थगिती देण्यात येत आहे.असल्याचे परिपत्रक रयत शिक्षण संस्था सातारा यांच्याकडून जारी करण्यात आल्याने ‘रयत’ सेवकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
गुरुवारी (दि.१८) रोजी दुपारी साई तपोभूमी येथील कार्यालयात शिक्षकांनी आमदार आशुतोष काळे यांचे आभार व्यक्त करून सत्कार केला.
रयत शिक्षण संस्थेमध्ये उपरोक्त विषयानुसार संस्थेचे परिपत्रक क्र.५० (दि.०५मार्च ) अन्वये संस्थेच्या सेवकांचे बदली धोरण सर्व शाखांना निर्गमित केलेले आहे. वरील संदर्भीय परिपत्रकानुसार ऑनलाइन बदली प्रक्रिया सुरु करण्यात आलेली होती. यंदा ऑनलाइन बदल्यांचा निर्णय घेण्यात आला होता. काही सेवकांच्या तालुक्याबाहेर बदली करण्याच्या नियमामुळे सेवकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती. या निर्णयविरोधात संस्थेच्या पाचही विभागातील सेवकांनी निवेदने दिली होती . संस्थेचे पदाधिकारी, अध्यक्ष शरद पवार यांनाही निवेदने देऊन त्यांचे लक्ष वेधण्यात आले होते.
कोपरगाव तालुक्यातील सेवकांच्या बदली प्रश्नी बदली धोरण व अंमलबजावणी याबाबत जनरल बॉडी सदस्य पद्माकांत कुदळे व अरुण चंद्रे सर यांनी नगर उत्तर विभागाचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. याप्रश्नी
आमदार आशुतोष काळे यांनी सेवक, त्यांचा त्याग, संस्थेसाठी देत असलेले योगदान, त्याचा संस्थेच्या शैक्षणिक व सेवकांच्या आर्थिक बाबींवर होणारे दुष्परिणाम व त्रुटी यावर संस्थेच्या बैठकीत सविस्तर चर्चा केली होती .
या सर्व बाबींचा करून संस्थेने पवित्र पोर्टलव्दारे प्राप्त होणारे उमेदवार मिळण्यास न्यायालयीन प्रक्रियेमुळे विलंब होतअसल्याने ऑनलाइन बदली प्रक्रियेव्दारे करण्यात येणाऱ्या बदल्यास चालू वर्षासाठी स्थगिती देण्यात येत आहे. असे परिपत्रक क्र.१२ संस्थेच्या वतीने (दि.९जुलै) रोजी जारी करण्यात आले आहे.
मात्र ही स्थगिती देताना विनंती बदल्यांपैकी फक्त दुर्धर आजार, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्ता, अपंग व मतीमंद मुलांचे पालक, आंतरविभागीय विनंती बदल्या, आवश्यक अशा प्रशासकीय बदल्या,विशेषबाब म्हणून करण्यात येतील. असेही परिपत्रकात म्हटले आहे. सदर परिपत्रकाची प्रत माहितीसाठी मा. चेअरमन, रयत शिक्षण संस्था, सातारा, सचिव रयत शिक्षण संस्था, सातारा, मा. व्हाईस चेअरमन, रयत शिक्षण संस्था, सातारा
मा.सर्व विभागीय चेअरमन, रयत शिक्षण संस्था,सातारा, मा.सर्व सदस्य, मॅनेजिंग कौन्सिल, रयत शिक्षण संस्था, सहसचिव (उ.शि./ऑडिट), रयत शिक्षण संस्था, सातारा, सहसचिव (माध्य.), रयत शिक्षण संस्था, सातारा, सर्व विभागीय अधिकारी, रयत शिक्षण संस्था यांना देण्यात आले असून कारवाईसाठी सर्व शाखाप्रमुख रयत शिक्षण संस्था यांना पाठविण्यात आली आहे.
त्यामुळे संस्था कर्मचार्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे. उत्तर विभाग रयत उत्तर विभागाचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे यांचे के. बी. पी. विद्यालय व कन्याविद्यामंदिर येथील शिक्षक व महिला शिक्षकांनी आभार व्यक्त करून त्यांचा सत्कार केला यावेळी शिक्षकांनी पद्माकर कुदळे व अरुण चंद्रे सर यांचा देखील सत्कार केला.
चौकट
यावेळी शिक्षक लोकशाही आघाडी (टीडीएफ) या शिक्षक संघटनेच्या नाशिक विभाग उपाध्यक्षपदासाठी करंजी विद्यालयातील गणित व विज्ञान विषयाचे शिक्षक ललित जगताप सर यांची सन २०२४ ते २०२७ या तीन वर्षासाठी निवड झाली याबद्दल आमदार आशुतोष काळे यांनी त्यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
Post Views:
73