शरद पवारांच्या नगर दौ-या नंतर ॲड.संदिप वर्पे यांनी दिले विधानसभेचं संकेत

शरद पवारांच्या नगर दौ-या नंतर ॲड.संदिप वर्पे यांनी दिले विधानसभेचं संकेत

After Sharad Pawar’s visit to the city, Adv.Sandip Varpe gave the signal for the assembly

तरुणांना संधी, अनेकांच्या आशा पल्लवीतOpportunity for youth, hope of many in Pallavi

Rajendara C. Salkar,News Portal, वृत्तवेध ऑनलाईन! Sun21July , 14.10 Pm.By सालकर राजेंद्र

कोपरगाव : मागील दोन वेळा विधानसभेसाठी आपल्याला आग्रह करण्यात आला परंतु आपण टाळलं , शरद पवार यांच्या अकोले विजयी संकल्प मेळावानंतर मात्र यावेळी आपण इच्छुक असल्याचे आत्मविश्वासाने सांगत महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रवक्ता ॲड.संदिप वर्पे यांनी विधानसभेचं संकेत दिले आहेत.

शरद पवार यांच्या नगर जिल्हा दौऱ्यात त्यांच्या गाडीत ॲड.संदिप वर्पे

 

यावेळी ॲड.संदिप वर्पे म्हणाले की, सन २०१४ यावेळेस आपल्याला कोपरगाव विधानसभेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उभे राहण्याचा आग्रह करण्यात आला होता परंतु आपण त्यावेळेस नकार दिला होता
यातच मागच्या २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राजकीय अस्थिरता निर्माण झाली होती आपल्याला पक्षाकडून तिकीटासाठी विचारणा झाली होती मात्र सर्वार्थाने योग्य व सक्षम उमेदवार म्हणून आ. आशुतोष काळे यांच्यासाठी आपण काम केले. याचा उल्लेख ॲड.संदिप वर्पे यांनी केला. तर शरद पवारांसोबत एकनिष्ठ राहिलो. मी देखील राष्ट्रवादीत बंड झाल्यानंतर शरद पवारांसोबत राहण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादी पक्ष फुटीनंतर आम्ही साहेबांसोबत कायम राहिलो. अभिमान आहे की मी अशा परिस्थितीत शरद पवार साहेबांसोबत राहिलो.अशी आठवण देखील त्यांनी यावेळी करून दिली.

मात्र यावेळी साहेबांनी तरुणांना संधी देण्याचा निर्णय घेतल्याने मला साहेबांनी पाठीवरती हात ठेऊन फक्त लढ म्हणावे असं म्हणत यावेळेस आपणही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून कोपरगाव विधानसभेसाठी इच्छुक असल्याचे संकेत ॲड.संदिप वर्पे यांनी बोलताना दिले. दोन दिवसांपूर्वी शरद पवार यांनी नगर जिल्हा दौरा केला. संपूर्ण दौऱ्यात संदीप वर्पे हे शरद पवार यांच्याबरोबर गाडीतच होते

अलिकडेच गणेश सहकारी साखर कारखाना परिसरातील कोल्हे समर्थकांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यात त्यांना शिर्डीमधील शेतकरी मेळाव्याचे निमंत्रण दिले होते. आता हे निमंत्रण पवार यांनी स्वीकारले असून ते उपस्थितही राहणार आहेत.ही भेट घडवून आणण्यात आपणच पुढाकार घेतला असल्याचे ॲड.संदिप वर्पे यांनी सांगितले.

“ज्याचा आमदार त्याची जागा” या फार्मूल्याप्रमाणे कोपरगाव विधानसभेची जागा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडे आहे. या अनुषंगाने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नगर जिल्हा दौऱ्यासंबंधी रविवारी जळगाव येथे झालेल्या बैठकीत जयंत पाटील यांनी सुद्धा ॲड.संदिप वर्पे यांना यंदा विधानसभेच्या दृष्टीने तयारीत राहण्याबाबत सुचविले असल्याचे कळते.

 

दरम्यान, कोपरगाव विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून ॲड.संदिप वर्पे विधानसभेसाठी इच्छूक असल्याचे स्पष्ट संकेत माध्यमांसमोर देखील दिले आहेत. त्यांनी मागील काही वर्षांपासून विधानसभेची तयारी सुरू केली आहे. कोपरगावात अनेकांनी निवडणुक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे शरद पवार आता आगामी विधानसभा निवडणुकीत कोणत्या तरुणाला उमेदवारी देणार ? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे

चौकट
विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवारांनी तरुण चेहऱ्यांना पुढे करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने नगरमधील अकोले मतदारसंघातून पवारांनी ऐन तिशीतील अमित भांगरे, आंबेगाव मतदारसंघातून देवदत्त निकम, तर तासगाव मतदारसंघातून दिवंगत नेते आर.आर.पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांच्या नावाची घोषणा केली आहे. त्यामुळे अनेक तरुणांच्या आशा पल्लवीत झाले आहेत.

Leave a Reply

You cannot copy content of this page