कोपरगाव स्वामी समर्थ केंद्रांवर गुरुपौर्णिमेचा उत्साह

कोपरगाव स्वामी समर्थ केंद्रांवर गुरुपौर्णिमेचा उत्साह

Gurupurnima excitement at Kopargaon Swami Samarth Kendras

देशभरातील हजारो समर्थ केंद्रांवर श्री गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला.Shri Gurupurnima festival was celebrated at thousands of Samartha centers across the country.

Rajendara C. Salkar,News Portal, वृत्तवेध ऑनलाईन! Sun21July , 14.20 Pm.By सालकर राजेंद्र

कोपरगाव : अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचे दिंडोरीतील प्रधान केंद्र, त्र्यंबकेश्वरच्या समर्थ गुरुपीठासह देशभरातील हजारो समर्थ केंद्रांवर श्री गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला.

आषाढातील पौर्णिमेच्या म्हणजेच व्यासपौर्णिमेच्या मंगलदिनी संपूर्ण भारतभर गुरूंचे, आई-वडिलांचे तसेच आदरणीय व्यक्तीचे पूजन केले जाते. सेवामार्गातील लाखो सेवेकऱ्यांच्या दृष्टीने या उत्सवाचे अनन्यसाधारण असे महत्त्व असल्याने सर्वजण वर्षभर या दिवसाची मोठ्या आतुरतेने वाट पाहतात. सेवामार्गाचा गुरुपौर्णिमा उत्सव आषाढी एकादशीपासूनच सुरू झाला होता .

रविवारी (दि२१) रोजी कोपरगाव येथील सुभद्रानगर निवारा केंद्रात स्वामींचा गाभारा आकर्षक रीतीने सजविण्यात आला होता प्रसन्न व भक्तिमय वातावरणात शेकडो स्वामी भक्तांनी समर्थ महाराज यांचे आशीर्वाद घेतले गुरु पौर्णिमेनिमित्त सकाळपासूनच स्वामी समर्थ केंद्रात स्वामी चरित्र वाचन विविध धार्मिक कार्यक्रम आरती पार पडली त्यानंतर भक्तांनी श्री स्वामी समर्थ महाराजांचे षोडशोपचार पूजन करून गुरुपद स्वीकारले. यावेळी भजनी मंडळांनी महिला व भक्तांना आनंदात तल्लीन होऊन महिलांनी फेर धरून औदुंबरास प्रदक्षिणा मारल्या मोठ्या उत्साहात गुरुपौर्णिमा उत्सव पार पडला भक्तांना प्रसादाचे वाटप करण्यात आले

Leave a Reply

You cannot copy content of this page