संजीवनी पाॅलीटेक्निक : ३४ विध्यार्थ्यांची मॅग्ना कंपनीत नोकरीसाठी निवड – अमित कोल्हे

संजीवनी पाॅलीटेक्निक : ३४ विध्यार्थ्यांची मॅग्ना कंपनीत नोकरीसाठी निवड – अमित कोल्हे

लाॅकडाउनच्या काळात मॅग्ना कंपनीने घेतल्या ऑनलाईन मुलाखती

मॅग्ना कंपनी ऑनलाइन मुलाखती घेऊन केली निवड

वृत्तवेध ऑनलाईन।1August 2020,15:25 By : Rajendra Salkar

कोपरगांव: पाॅलीटेक्निक मधिल विध्यार्थ्यांना पदविका अभ्याक्रम पुर्ण करताना त्यांच्यात उद्योग जगताला अभिपे्रत असणारे कौशल्ये व अद्ययावत ज्ञानाची रूजवण झाल्यास त्यांना चांगल्या कंपन्या लागलीच नोकऱ्या देतात. अलिकडेच पुणे येथिल मॅग्नाऑटोमोटीव्ह इंडिया प्रा. लिमिटेड कंपनीला डीप्लोमा इंजिनिअर्स हवे होते. मुळातच संजीवनी के.बी. पी. पाॅलीटेक्निकचे नाव उद्योग जगतात चांगले असल्यामुळे कंपनीने थेट पाॅलीटेक्निकच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाशी संपर्क साधुन डीप्लोमा इंजिनिअर्सची मागणी केली. होकार देताच कंपनीने ऑनलाईन मुलाखती घेवुन ३४ नवोदित डीप्लोमा इंजिनिअर्सची आकर्षक पगारावर डायरेक्ट पे रोलवर नियुक्ती केली आहे, अशी माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

पत्रकात श्री कोल्हे यांनी म्हटले आहे की कोविड १९ च्या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, अनेकांना दैनंदिन खर्च आणि जबाबदाऱ्या कशा सांभाळाव्या या चिंतेने ग्रासले आहे. समाजातील सर्वच गटातील लोकांना कोरोना व्हायरसच्या महामारीने आर्थिक मेटाकुटीस आणले. निवउ झालेले बरेचसे विध्यार्थी शेतकरी कुटूंबातील आहेत. अशा परीस्थितीमध्ये कोविड १९ च्या अगोदर व लाॅकडाउनच्या काळातही संजीवनीने गरजु अभियंत्यांना नामांकित कंपन्यामध्ये नोकऱ्या मिळवुन दिल्या. आलिकडेच मॅग्ना अटोमोटिव्ह इंडिया प्रा. लिमिटेड या मुळच्या कॅनडाच्या बहुराष्ट्रीय कंपनीने पुणे येथिल प्लॅन्ट साठी ऋशिकेश संजय चव्हाण, वैभव कारभारी चिमणे, ईश्वर पोपट सानप, अभिषेक रामनाथ म्हस्के, रोहीत जगन्नाथ खरात, महेश म्हाळू गिधाड, शुभम शिवाजी सोणवने, केतन नारायण मते, साद वजीर पटेल, विक्रांत गणेश महाले, अक्षय गोविंद मलिक, मयुर शिवाजी गिते, अजय केशव निर्भवने, योगेश अशोक भागवत, तेजस रामचंद्र चव्हाण, मनोज भास्कर टिळेकर, प्रसाद संजय शिरसाठ , भूषण हारीभाऊ आहेर, संकेत राजेंद्र धनवटे, आदेश भरत जुन्नरे, विकास ज्ञानदेव गव्हाणे, कृश्णा नारायण कडलग, तेजस रामदास कोळपकर, अर्बझ कुरेशी निेलेश ज्ञानेश्वर वाहुल, पल्लवी जाधव, शुभम जयवंतराव कानडे, मंथन राजेंद्र विटनोर, अभिजीत किशोर गाढे, सचिन लिलाधर जावळे, वैभव संजय बनसोडे, तेजस आढाव, वैष्णव गुंजाळ व हर्षल तुपे यांची निवड केली. यातील १७ विध्यार्थी सेवेत रूजु झाले आहेत तर उर्वरीत पुढील आठवड्यात नोकरीत हजर होणार आहे.

माजी मंत्री श्री शंकरराव कोल्हे यांनी १९८२ साली ग्रामीण भागातील विध्यार्थी इंजिनिअर होवुन स्वतःच्या पायावर उभे रहावे, यासाठी संजीवनी पाॅलीटेक्निकची स्थापना केली. दरवर्षी शेकडोच्या संख्येने संस्थेच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या विषेश प्रयत्नाने नामंाकित कंपन्यांमध्ये नोकऱ्या मिळत असल्याने माजी मत्री श्री कोल्हे यांनी पाहीलेले स्वप्न सत्यात उतरत आहे. इ. १० वी नंतर डीप्लोमा इंजिनिअर होवुन चांगली नोकरी मिळवुन कुटुंबाचा आधार बनण्यासाठी संजीवनी पाॅलीटेक्निकच्या योगदानाची दखल घेतल्या जात आहे. इ. १० वीचा निकाल लागताच प्रवेशासाठी अनेक पालक व विध्यार्थी चौकशी करीत आहेत ही संजीवनी पाॅलीटेक्निकची उपलब्धी आहे.

विध्यार्थ्यांना कोविड १९ या महामारीच्या काळातही बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये विध्यार्थ्यांच्या निवडीबध्दल माजी मंत्री शंकरराव कोल्हे , कार्याध्यक्ष नितीनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी गुणवंत विध्यार्थी, त्यांचे भाग्यवान व संजीवनीवर विश्वास टाकलेले पालक, प्राचार्य ए. आर. मिरीकर आणि ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे प्रमुख प्रा. आय. के. सय्यद यांचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page