बियाणे खाल्ल्याने विषबाधा होऊन तीन लांडोर व एका मोराचा मृत्यू 

बियाणे खाल्ल्याने विषबाधा होऊन तीन लांडोर व एका मोराचा मृत्यू 

Three Landors and one Peacock died due to poisoning after eating the seeds

Rajendara C. Salkar,News Portal, वृत्तवेध ऑनलाईन! Sun21July , 16.20 Pm.By सालकर राजेंद्र

कोपरगाव : सध्या पेरणीचा हंगाम सुरू असून  लष्करी आळीचा हल्ला होत आहे. यामुळे शेतकरी बियाण्यांना कीटकनाशके लावून लागवड करत आहेत मात्र हेच बियाणे खाल्ल्याने कोपरगाव तालुक्यातील पढेगाव  येथे तीन लांडोर व एका मोराला आपला प्राण गमवावा लागला आहे.दोन जखमी मोरावर उपचार सुरु आहे. 

कोपरगाव तालुक्यातील कोपरगाव वैजापूर रस्त्यावरील पढेगाव येथील प्रगतशील शेतकरी सतीश नेने नेहमीप्रमाणे दररोज सकाळी शेतात फेरफटका मारण्यासाठी जातात,  त्यांच्या शेतात भरपूर मोर आहेत त्यांना खायला ते घेऊन जातात, आज फेरफटका मारत असताना त्यांना 
गट नंबर १५५ मध्ये एक मोर व एक लांडोर मृत अवस्थेत दिसले त्यांच्याच बाजूला दोन मोर विव्हळत पडले असल्याचे दिसून आले, ज्यांनी ते जखमी मोर घरी आणले व त्यांच्यावर औषध उपचार केले, व त्यांनी तात्काळ वनविभाग अधिकाऱ्यांशी संपर्क केला मात्र त्यांनी फोन उचलले नाहीत, मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही, काही वेळानंतर वनरक्षक अमोल किनकर व साथीदार तेथे आले त्यांनी प्राथमिक उपचार व जखमी मोरांना दिले. वन अधिकारी प्रतिभा सोनवणे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी मी संग्रामपूर राहाता येते बिबट्या पकडण्याच्या मोहिमेत असल्याचे सांगितले. त्यांनी कीनकर यांना मयत मोर, लांडोर व जखमी मोर गाडीवर घेऊन येण्यास सांगितले. पशुधन विकास अधिकारी डॉ. दिलीप दहे यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले शनिवार आहे दवाखान्यात गर्दी आहे मी पढेगाव येथे येऊ शकणार नाही. नंतर नेने यांनी एक टेम्पो बोलावून त्यात दोन मयत मोर लांडोर, व एक जखमी मोर, व लांडोर यांना दहे यांच्याकडे पशु रुग्णालयात पाठवण्यात आले. 
तपासणी केल्यानंतर पशुधन विकास अधिकारी डॉ दिलीप दहे म्हणाले सध्या पेरणीचे दिवस असल्याने शेतात शेतकरी बियाणे पेरतो हे बियाणे विषारी औषधे लावलेले असल्याने  हे पक्षी खातात लांडोर व मोराचा मृत्यू शेतातील बी बियाण्यावर विषारी औषध लावल्याने  व ते मोर लांडोर यांच्या खाण्यात आल्याने मग असा प्रकार होऊ शकतो. मोराचा मृत्यु नेमका कशाने झाला हे अहवाल आल्यावर समजेल असे डॉक्टरांनी सांगितले तीनलांडोर व एका मोरांवर कुंभारी येथील काटवनात अग्नी दहन करण्यात आले. याप्रसंगी वनरक्षक श्रद्धा पडवळ, अमोल किनकर, समीर शेख, सागर इंदरखे, प्रदीप इंदरखे उपस्थित होते .                           

Leave a Reply

You cannot copy content of this page