ऑलम्पिकमध्ये कांस्यपदक पटकावणारी नेमबाज मनु भाकर भारताची पहिली लक्ष्मी-विवेक कोल्हे
Olympic bronze medalist shooter Manu Bhakar is India’s first Lakshmi-Vivek Kolhe
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने खाते उघडलेIndia opened its account at the Paris Olympics
Rajendara C. Salkar,News Portal, वृत्तवेध ऑनलाईन! Mon29July ,16.40 Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगांव :पॅरीस ऑलीम्पीक क्रिडा स्पर्धेत हरियाणा (झज्जर) च्या मनु रामकिशन भाकर हीने १० मीटर नेमबाजी प्रकारात पहिले कास्य पदक जिंकुन जो इतिहास रचत ती भारताची पहिली लक्ष्मी ठरली अशा शब्दात जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी संजीवनी युवा प्रतिष्ठान व उद्योग समुहाच्यावतीने अभिनंदन केले आहे.
तिचे वडील रामकिशन भाकर हे मर्चंट नेव्हीमध्ये मुख्यअभियंता आहेत. मनु भाकर हिने २०२० मध्ये टोकीओ ऑलीम्पीक स्पर्धेत सर्वप्रथम भाग घेतला होता मात्र नेमबाजीत तिची बंदूक खराब झाल्याने तिला पदकांने हुलकावणी दिली होती. बावीस वर्षीय मनु भाकर हीने अत्यंत मेहनत घेत पॅरीस ऑलीम्पीक स्पर्धेत अंतिम तीन खेळाडू मध्ये स्थान मिळवत भारत देशासाठी पहिले कास्य पदक पटकावून इतिहास घडविला, खेळातील सातत्य तिला जेते पदाकडे घेऊन गेले, असे विवेक कोल्हे शेवटी म्हणाले. पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेत अन्य भारतवासीयांच्या विजेतेपदासाठी त्यांनी शिर्डीच्या साईबाबांना साकडे घातले आहे.
Post Views:
48