सोमैय्या विद्या विहार : श्री शारदा इंग्लिश मिडीयम स्कूलचा १००% निकाल

सोमैय्या विद्या विहार : श्री शारदा इंग्लिश मिडीयम स्कूलचा १००% निकाल

शुभांगी आंबेकर ९६.४०% गुण पहिली

वृत्तवेध ऑनलाईन।1August 2020,15 : 25
By : Rajendra Salkar

कोपरगांव : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या वतीने मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. तालुक्यातील सोमैय्या विद्याविहारचे श्री शारदा इंग्लिश मिडीयम स्कूलचा १००% निकाल लागला आहे. विद्यालयाने दरवर्षीप्रमाणे घवघवीत यशाची उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे.
कु. शुभांगी नितीन आंबेकर हिने ९६.४०% गुण मिळवून विद्यालयात प्रथम येण्याचा मान मिळवला आहे.

कु.वैष्णवी अनिल नरोडे ९४.८०%, चि.प्रसाद लक्ष्मण जोशी ९४.४०% गुण मिळवून अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकवला आहे. विद्यालयातून एकूण १६४ विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते. त्यापैकी १४२ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह तसेच २१ विद्यार्थी प्रथम श्रेणीत व १ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शालेय प्रशासन, स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष एस.मोहन , सहाय्यकव्यवस्थापक मधुकर दराडे, अकौंटंट दिनेश गुप्ता, विश्वस्त सौदागर कुलाल, समन्वयक अश्विनी शेळके, पालक- शिक्षक संघ, प्राचार्य के एल वाकचौरे, उपप्राचार्य डी व्ही चाफेकर, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आदिंनी अभिनंदन केले.

Leave a Reply

You cannot copy content of this page