वारीगाव परिसर विकासाची जबाबदारी देखील माझीच- आ.आशुतोष काळे
I am also responsible for the development of Warigaon area – A. Ashutosh Kale
शासकीय योजनांचा आढावा कामांची पाहणीReview of government schemes Inspection of works
Rajendara C. Salkar,News Portal, वृत्तवेध ऑनलाईन! Mon29July 20.20 Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव – विकासाच्या बाबतीत मतदार संघातील जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण केली आहे. त्याप्रमाणे वारी येथील विकासाचे प्रश्न देखील सोडविले असून विकासाचा जो शब्द दिला आहे तो पूर्ण केला असून यापुढील वारीगाव परिसराच्या विकासाची जबाबदारी देखील माझीच असल्याची ग्वाही आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.
आ.आशुतोष काळे यांनी नुकताच वारी येथे सुरू असलेल्या विविध विकास कामांचा व शासकीय योजनांचा आढावा घेतला याप्रसंगी वारी ग्रामस्थांशी संवाद साधतांना ते बोलत होते.
ते म्हणाले की, माजी खा.कर्मवीर शंकरराव काळे ,माजी आ.अशोक काळे यांनी देखील मतदार संघातील जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण केली आहे. त्यामुळे विकासाच्या बाबतीत दिलेला शब्द पूर्ण करून यापुढील काळात देखील वारी व परिसराच्या विकासाचे प्रश्न मी सोडविणार असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी त्यांनी वारी – कान्हेगाव पाणीपुरवठा योजना, गोदावरी नदीवरील पूल, श्री रामेश्वर मंदिर विकास, सब स्टेशन क्षमतावाढ, रस्ते आदींसह विविध विकासकामांची पाहणी केली. वारी गावासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देवून मागील काही दशकपासून प्रलंबित असणारी विकास कामे मार्गी लावल्याबद्दल उपस्थित असलेल्या नागरिकांनी आ.आशुतोष काळे याचे आभार मानले. महायुती शासनाने सर्वसामान्य जनतेसाठी विविध लाभाच्या योजना आणल्या असून जास्तीत जास्त पात्र लाभार्थी नागरिकांनी शासनाच्या या विविध योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामपंचायत व विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post Views:
48