कोपरगावच्या शुक्राचार्य मंदिरावर भुयार; आतमध्ये ध्यानमंदिर
Subway at Shukracharya Temple of Kopargaon; Meditation temple inside
गुरु शुक्राचार्य यांच्या शिवपिंडीस १७ किलो चांदीचे लेपनGuru Shukracharya’s Shivpindis 17 kg silver plated
Rajendara C. Salkar,News Portal, वृत्तवेध ऑनलाईन! Tue30July 20.20 Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव : कोपरगाव बेटातील श्री शुक्राचार्य मंदिरात संवर्धनाचे काम सुरू असताना गाभाऱ्याच्या वरती एक तळघर सापडले आहे. नेमके हे तळघर कशाचे आहे याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. आतापर्यंत १२ बाय १२ या जागेत सहा फूट उंचीची पोकळ जागा आढळून आली. बहुदा हे त्याकाळचे ध्यान मंदीर असावे असा अंदाज लावला जात असल्याची माहिती पत्रकारांना मंदिर समितीचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड यांनी दिली.
मंदिर समितीचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड यांच्या उपस्थितीत येथे काम सुरु आहे. संजीवनी मंत्राचे जनक म्हणून प्रसिद्ध असलेले जगातील एकमेव अतिशय पुरातन जागृत धार्मिक ऐतिहासिक पौराणिक संदर्भ असलेले ग्रामदैवत श्री गुरुशुक्राचार्य महाराज मंदीराचे गाभार्याचे वरील भागात१२ बाय १२ या आकाराचे ध्यानमंदीर आढळून आले आहे ते पहाण्यासाठी भाविकभक्त नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. याची देखील माहिती काल मंदिर समितीच्या वतीने या विषयावर मंगळवारी सकाळी ११ वाजता शुक्राचार्य मंदिरात झालेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांना माहिती देण्यात आली आहे घेतली जात आहे.
पत्रकारांना माहिती देताना अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड म्हणाले सध्या श्री गुरुशुक्राचार्य महाराज पुरातन मंदीराच्या नुतनीकरणाचे काम सुरु आहे. त्यावेळेस काम करतांना हे ध्यान मंदीर तिन आठवडयापूर्वी आढळून आले हजारो वर्षाची परंपरा असलेल्या जगातील एकमेव मंदीर असलेल्या श्री गुरुशुक्राचार्य महाराजांची महती संपूर्ण जगभर पसरली आहे. श्रावण महिन्या निमित्त मंदीरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. परम सदगुरु श्री गुरुशुक्राचार्य मंदीर गाभाराची दुरुस्ती व सुशोभिकरणाचे काम नासिक येथील उद्योगपती यांचे मदतीने व सहकार्याने हे काम पूर्णत्वास जात आहे. गाभारा दुरुस्ती समोरील सभामंडपाच्या वरील भागात कोणी कधीही न पाहिलेली छोटीसी खिडकी आढळून आली. ती खिडकी उघडली असता सभामंडपाच्या गच्चीच्या खाली १२ बाय १२ या जागेत सहा फूट उंचीची पोकळ जागा आढळून आली. बहुदा हे त्याकाळचे ध्यान मंदीर असावे असा कयास लावला जात असल्याचे आव्हाड यांनी सांगितले.
या मंदीराचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाडांसह सर्व विश्वस्त झाल्यापासून गेल्या वर्षापासून मंदीर परिसरात विविध बदल केले जात आहेत. पूर्वीचा श्री क्षेत्र बेट हा दंडकारण्याचा एक भाग होता. चोहोबाजुंनी त्याला पाण्याने वेढले होते. या पावनभुमीत भार्गव ॠषींचे पूत्र कवी म्हणजेच श्री गुरुशुक्राचार्य महाराज यांचे कर्मस्थान असून त्यांच्या वास्तव्याने घोर तपश्चर्यने पावन व पवित्र झालेला हा परिसर आहे. येथे श्री गुरुशुक्राचार्यांचा वास्तव्याचा व त्या बरोबरच भगवान शंकराकडून मिळवलेल्या संजीवनी मंत्राचा कचदेव (बृहस्पती पूत्र) व शुक्राचार्यांची कन्या देवयानी यांचे प्रेमकथेचा संदर्भ आहे त्याचा उल्लेख ययाती या कादंबरीत प्रामुख्याने आलेला आहे अशी माहिती अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड यांनी दिली.
चौकट
श्री गुरुशुक्राचार्य महाराजांच्या शिवपंडीस १७ किलो चांदीचे लेपण केले जाणार आहे त्यासाठी डॉ.रामदास आव्हाड यानी २ किलो व इतर शुक्रभक्तानी चांदी देवू केली आहे त्याचेही काम लवकरच केले जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
Post Views:
85