कोपरगाव शहरपोलीस स्टेशनात अपुरा कर्मचारी वर्ग; ड्युटीवरील कर्मचाऱ्यांवर प्रचंड ताण !

कोपरगाव शहरपोलीस स्टेशनात अपुरा कर्मचारी वर्ग; ड्युटीवरील कर्मचाऱ्यांवर प्रचंड ताण !

Inadequate manpower in Kopargaon City Police Station; Heavy stress on the employees on duty!

ठळक मुद्दे

पोलीस स्टेशनसाठी सहाय्यक फौजदार यासह ५६ कर्मचाऱ्यांचा स्टाफ मंजूर आहे.१७ पोलीस कर्मचारी व सहाय्यक फौजदारांची पदे रिक्त आहेत

Highlights

A staff of 56 employees including Assistant Police Station is sanctioned. 17 posts of Police Constable and Assistant Police Officer are vacant.

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन! Wed31July 14.20 Pm.By सालकर राजेंद्र

कोपरगाव : येथील शहर पोलीस स्थानकात सध्या सहाय्यक उपनिरीक्षक आणि हवालदार यांची कमतरता आहे. खात्याकडून बदल्यांचे आदेश निघत असतात. पण, अपुरे संख्याबळ असलेल्या कोपरगाव पोलीस स्थानकात बदली झालेला एकही कर्मचारी येत नाही. उलट, आहे त्याच कर्मचाऱ्यांपैकी एखाद्याला दुसऱ्या ठिकाणी बदली करून पाठवले जात आहे. अशाप्रकारे कोपरगाव पोलीस स्थानकाकडे का दुर्लक्ष केले जात आहे, असा प्रश्न येथील कर्मचाऱ्यांनाच पडला आहे.

संवेदनक्षम कोपरगाव शहर पोलिस स्टेशनला अपुरे पोलिस कर्मचारी आहेत. शहरास १० ग्रामपंचायतींसाठी एकच पोलिस ठाणे असून २४ पोलिस कर्मचार्‍यावर या ठाण्याचा कारभार चालू आहे. शहरातील गुन्हेगारीवर  आळा घालण्यासाठी कोपरगाव शहर स्टेशनमधून नियोजन केले जाते. हे नियोजन करता करता  त्या पोलिसांची तारांबळ होत आहे.

या पोलीस स्थानकाला ४० हवालदारांची गरज असून २४ हवालदारांची या ठिकाणी नियुक्ती केली आहे. त्यातील चौघांची इतरत्र बदली झाली आहे. त्यामुळे प्रत्यक्षात फक्त ९  हवालदार या ठिकाणी रूजू आहेत. तर तीन जणांची मुंबईला बदली झाल्याने त्यांना लवकरच कार्यमुक्त करण्यात येईल,  दोन ठाणे अंमलदार, दोन वायरलेस व दोन ऑनलाईन तक्रार (डायल नंबर १००) साठी अशी सहाजण  सकाळ संध्याकाळ कार्यालयीन कामकाज हाताळतात. त्यामुळे प्रत्यक्ष तीनच हवालदार या पोलीस स्टेशनला  सेवा बजावत आहे. यात नियमितपणे सबजेल डयुटी २ हवालदार,  न्यायालय ड्युटी ३ वाहतूक नियंत्रण २ हवालदार तैनात ठेवावेच लागतात. दररोज किमान ५ जणांच्या साप्ताहिक सुट्या,याशिवाय एक  दोन जण आजारी रजेवर,या पोलिस ठाण्याच्या हद्दीत संवत्सर, काकडी, जेऊर कुंभारी व गांधीनगर या या चौक्या असून येथे प्रत्येकी चार कर्मचाऱ्यांची आवश्यकता असते  चौकीचे कामकाज जाऊन येऊन  पोलीस कॉन्सटेबल हाताळीत आहेत.

सध्या कोपरगाव शहर पोलीस स्टेशनसाठी एक वरिष्ठ पोलीस निरीक्षक दोन सहाय्यक पोलीस निरीक्षक व दोन सहाय्यक फौजदार हे अधिकारी कार्यरत आहेत. थोडक्यात काय तर अधिकारी असो की हवालदार असो एका कर्मचाऱ्याला नाटकाप्रमाणे तीन तीन चार चार वेगवेगळ्या भूमिका वठवाव्या लागत असल्याचे  दिसते  आहे. उदाहरणच द्यायचे झाले तर पोलीस उपनिरीक्षक रात्रपाळीवर असल्यास दिवसा सहाय्यक उपनिरीक्षकांच्या कमतरतेमुळे हवालदारांनाच पोलीस स्टेशनचे कामकाज पाहावे लागते. चौकीवरील सहाय्यक उपनिरीक्षक रजेवर गेल्यास त्या चौकीची जबाबदारीही पोलीस स्थानकातील त्या दिवशी सेवेवर असलेल्या हवालदारावरच असते.
पोलीस खात्याकडून वेळोवेळी हवालदार आणि सहाय्यक उपनिरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश जारी केले जातात. पण या आदेशाद्वारे कोपरगाव पोलीस स्थानकात एकही कर्मचारी पाठवला जात नाही. तर अपुरा कर्मचारी असूनही या ठिकाणी असलेल्या कर्मचाऱ्यांची इतरत्र बदली केली जाते.यामुळे पोलीस स्टेशनातील  हवालदार आणि सहाय्यक उपनिरीक्षक कामाच्या बोजाखाली दिवस काढावे लागत आहेत. होमगार्ड नेमणुकीमुळे पोलिसांना आधार मिळत आहे
कोपरगाव शहर  पोलीस स्टेशन महत्त्वाचे आहे. कोपरगाव हे  शुक्लेश्वर, कचेश्वर, जनार्दन स्वामी, साई तपोभूमी, जंगलीदास माऊली, असे धार्मिक तीर्थक्षेत्र असलेले शैक्षणिक हब असलेले शहर असले तरी, दंगली व जातीयवादामुळे कोपरगाव संवेदनशील गटात आहे.  या परिस्थितीत  कोपरगाव शहर  पोलिस ठाण्यात दिवसेंदिवस पोलिसांची संख्या घटतच आहे. गेल्या काही वर्षांपासून येथे कर्मचाऱ्यांची कुमक कमी आहे. संख्याबळाच्या बाबतीत हे पोलीस एक दुर्लक्षितच आहेत. शहराचे विधानसभा मतदारसंघातील दहा गावांत  या पोलीस स्टेशनचे कार्यक्षेत्र विभागले गेले आहे. यात शहरासह संवत्सर, काकडी, जेवूर कुंभारी व गांधीनगर हे भाग या पोलीस स्टेशनच्या स्थानकाच्या हद्दीत येतात. कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचा स्थानकाचा कारभार सत्ताधारी आमदारांच्या अखत्यारित येऊनही या पोलीस स्थानकात पुरेसा कर्मचारी वर्ग नाही.

चौकट

कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न –

अपुर्‍या पोलिस कर्मचार्‍यांमुळे कोपरगाव  येथे नेहमी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होत आहे. गेल्या काही दिवसापासून गोहत्या व लवजिहाद यावरून शहरातील वातावरण वारंवार तणावाचे होत आहे गोहत्या असो की लव जिहाद  या केसेस मध्ये संपूर्ण समाजाला दोषी धरणे योग्य नाही त्याचबरोबर गुन्हेगार कोणत्याही समाजाचा असो यासाठी त्या समाजातील तथाकथित नेत्यांनी पोलीस स्टेशनवर येऊन शक्ती प्रदर्शन करणे योग्य नाही सोशल मीडियावर एकमेकांविरुद्ध लिखाण बंद केले पाहिजे यामुळे शहरात तणाव निर्माण होतो  जो गुन्हेगार आहे त्या गुन्हेगाराला शिक्षा झाली पाहिजे यात दुमत नाही परंतु याला धार्मिक व सामाजिक रंग देणे चुकीचे आहे अशाप्रकारे काही ठराविक व्यक्ती वारंवार या गोष्टी करत असल्याचे दिसून येत आहे. गाव तुमचे आहे तुम्हीच सलोखा ठेवला पाहिजे – प्रदीप देशमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कोपरगाव पोलीस स्टेशन

श्रावण महिना सुरू होत असून पुढे गणेशात्सव, रमजान ईद सणांची मालिका सुरू होणार आहे त्यात यावर्षी विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या निवडणुका होण्याची दाट शक्यता आहे.त्यामुळे बाहेरून बंदोबस्त मागवण्याची वेळ कोपरगाव पोलिसांवर येणार आहे तत्पूर्वी पोलीस प्रशासनाने अनेक पोलीस कॉन्सटेबल बढतीच्या प्रतीक्षेत आहेत. या कर्मचाऱ्यांच्या बढतीची प्रक्रियापोलीस खात्याने पूर्ण केली आहे. या कर्मचाऱ्यांना बढती मिळाल्यास पोलीस हवालदारांच्या संख्येत मोठी भर पडणार आहे. खात्याने ही बढती आदेश जारी करून त्यातील बहुतेक कर्मचारी कोपरगाव पोलीस स्टेशनमध्ये पाठवून या समस्येवर तोडगा निघेल.

Leave a Reply

You cannot copy content of this page