कोपरगावात पहिल्या श्रावणी सोमवारी गंगा गोदावरीची महाआरती
Mahaaarti of Ganga Godavari on Monday first Shravani in Kopargaon
आरतीसाठी हजारो भाविकांची उपस्थितीThousands of devotees attend for Aarti
Rajendara C. Salkar,News Portal, वृत्तवेध ऑनलाईन! Tue 6Aug 18.00 Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव : बनारस येथील गंगा आरतीच्या धर्तीवर गोदावरी आरतीचा पहिल्या श्रावणी सोमवारी (दि.५) रोजी सायंकाळी ६.३० वाजता शुभारंभ करण्यात आला. विवेक कोल्हे व सौ रेणुका कोल्हे यांच्या प्रमुख हस्ते आरती करण्यात आली.
फटाक्यांच्या आतिषबाजीत आणि आकर्षक विद्युत रोषणाईच्या वातावरणात हर हर गंगे आणि हर हर महादेव’ च्या जयघोषात अवघा गोदाकाठ दुमदुमला होता.
ठळक मुद्दे
आता दर श्रावणी सोमवारी सायंकाळी महाआरती नित्यक्रम,
गंगागोदा आरती सुरू असताना बोटीतून फटाक्यांच्या लखलखाटाने आकाश आणि गोदापात्र उजळले
श्रावण महिन्यात गोदा आरती सुरु करण्याबाबत संजीवनी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या संकल्पनेतून त्यांच्या सहकाऱ्यांनी गोदा महाआरती करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या श्रावण सोमवारी
(दि.५) रोजी सायंकाळी ६.३० वाजता विवेक कोल्हे व सौ. रेणुका कोल्हे यांच्या प्रमुख हस्ते आरती करण्यात आली.अतिशय देखणा सोहळा पाहण्यासाठी व गंगा गोदामातेचे पूजन करण्यासाठी हजारो भाविकांनी गोदावरी घाट येथे उपस्थिती लावली.
यावेळी विवेक कोल्हे म्हणाले की, श्री सदगुरू साईबाबा, संत जनार्दन स्वामी,संत जंगलीदास महाराज अशा अनेक संतांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन आहे.मागील वर्षी शेवटच्या श्रावणी सोमवारी आपण हा सोहळा घेतला होता मात्र या वर्षी प्रत्येक सोमवारी गंगागोदा महाआरती व्हावी असे आयोजन भाविकांच्या आग्रहास्तव केलेले आहे. काठोकाठ दुथडी भरून वाहणारी गोदामाता अशीच अखंड वाहती रहावी आणि सर्वत्र सुजलाम सुफलाम करावे.अशी प्रार्थना त्यांनी केली.
या वर्षी सुरू झालेला श्रावण महिना सोमवारपासून सुरू झाला श्रावण महिन्याची सांगता देखील सोमवारीच होणार आहे सुमारे ७१ वर्षांनी असा दुर्लभ योग आलेला आहे. त्यामुळे संपूर्ण श्रावण महिन्याच्या प्रत्येक सोमवारी महाआरतीचे आयोजन करण्यात येणार आहे असे विवेक कोल्हे यांनी सांगितले. त्यासाठी भजन आणि देखावे सोहळे असे विशेष आयोजन करण्यात येणार आहे साधू संतांच्या उपस्थितीत होणाऱ्या गंगागोदा महाआरतीसाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहुन पवित्र अशा श्रावण महिन्यात गंगापूजन व दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन विवेक कोल्हे यांनी यावेळी केले आहे.
यावेळी नागरिक,शिवभक्त,विविध क्षेत्रातील मान्यवर आणि संजीवनी युवा प्रतिष्ठानचे युवासेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post Views:
42