काका कोयटेंच मोठं विधान;… म्हणून विवेक कोल्हे आमदार होतील 

काका कोयटेंच मोठं विधान;… म्हणून विवेक कोल्हे आमदार होतील 

Kaka Koyte’s big statement;… So Vivek Kolhe will become MLA

१० वा राष्ट्रीय हथकरघा दिन10th National Handloom Day

Rajendara C. Salkar,News Portal, वृत्तवेध ऑनलाईन! Thu 8 Aug 19.30 Pm.By सालकर राजेंद्र

कोपरगाव : महाराष्ट्रात विधानसभेची  दोन महिन्यात होणारी  निवडणूक तोंडावर आहे. अशातच महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांनी एका कार्यक्रमात कोपरगावची बाजारपेठ फुलण्यासाठी विवेक कोल्हे आमदार होतील या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला भलतेच उधाण आले आहे.

येथील समता पतसंस्थेच्या स्व. यशवंतराव चव्हाण सभागृहात १०व्या राष्ट्रीय हथकरघा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात काका कोयटे बोलत होते.
होतकरू, धाडसी युवा चेहरा म्हणून विवेक कोल्हे यांनी जनतेच्या मनात घर केल्याने त्यांच्याकडे आश्वासक नेतृत्व म्हणून कोपरगावकर नागरिक पाहतात.  व्यापारी, उद्योजक,राजकीय  नेते,शेतकरी,सामाजिक कार्यकर्ते यांनी हेरलेला हा अभ्यासू युवा नेता लवकरच विधानसभेत आपला आवाज बुलंद करेल अशी अपेक्षा सर्वांना असल्याने
त्यातच आता काका कोयटे यांनी वर्तवलेल्या अंदाजामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडालीय आणि आधीपासूनच सुरू असलेल्या चर्चांना आणखीच उधाण आलंय.
कोपरगावच्या राजकारणात काका कोयटे यांच्याकडे  एक राजकीय विश्लेषक म्हणून पाहिले जाते त्यामुळेच त्यांनी केलेल्या वक्तव्याची चर्चा तर होणारच !
यावेळी शुभेच्छा देताना संजीवनी स्वयं सहाय्यता महिला बचत गटाच्या अध्यक्षा सौ. रेणुका कोल्हे म्हणाल्या, हातमाग कर्मचारी हे आपल्या कलेतून सुबकता निर्माण करतात. अहिंसा संस्थेने केलेल्या प्रयत्नांचा आता वटवृक्ष होतो आहे.अहिंसेच्या कापडी वस्तू राज्यासह देशात अनेक ठिकाणी मागणी होत आहे.बाजारपेठ नावलौकिकाकडे घेऊन जाण्यासाठी सार्वत्रिक प्रयत्नांची गरज आहे जे आपण सर्व मिळून करू आणि कोपरगावची सर्वार्थाने प्रगती करू.या सर्व महिलानी एकत्रित येत उभा केलेला आदर्श सर्वांना प्रेरणा देणारा आहे  अशा भावना  व्यक्त केल्या. यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला व विद्या अहिंसा हथकरघा केंद्रास भेट दिली.
यावेळी शोभना ठोळे,अरुणा लोहाडे, कल्याणी गंगवाल, मुंबई विणकर सेवा केंद्राचे मनीष पवईकर,राजेश ठोळे,जैन समाजाचे पंच अशोक पापडीवाल,अमित लोहाडे,प्रितम गंगवाल,प्रेमचंद गंगवाल, हातमाग कारागीर प्रियंका सुपेकर आदींसह महिला नागरीक उपस्थित होते.

चौकट – 

विवेक कोल्हे यांनी व्हिजन मध्ये ठेवलेले स्काय अर्थात” शिर्डी टुरिझम, कोपरगाव टेक्नॉलॉजी, येवला टेक्सटाइल हा ट्रिपल टी  या स्कायचे शक्तीकेंद्र असणार आहे.”  

 

Leave a Reply

You cannot copy content of this page