निद्रिस्त सरकारला जाग आणल्याशिवाय माघार नाही- सौ स्नेहलता कोल्हे

निद्रिस्त सरकारला जाग आणल्याशिवाय माघार नाही- सौ स्नेहलता कोल्हे

मित्रपक्षांचे रुसवे-फुगवे काढण्यात गुंतलेल्या सरकारला पोशिंदयाचा विसर

मागील काळात केलेल्या कामाची पाहणी करुन फोटोसेशन व व्हिडिओ काढण्यातच दंग असलेले आमदार शेतकरी बांधवांच्या दुधाच्या भावासंदर्भात गप्प का ? – मा.आ.सौ स्नेहलता कोल्हे

वृत्तवेध ऑनलाईन।1August2020,15 :25
By : Rajendra Salkar

कोपरगाव : कोरोना महामारीच्या संकटामुळे अगोदरच राज्यातील दूध उत्पादक आणि शेतकरी अडचणीत असताना मित्रपक्षांचे रुसवे-फुगवे काढण्यात गुंतलेल्या सरकारला शेतकऱ्यांचा विसर पडल्याने जगाचा पोशिंदा अडचणीत आला आहे. तेंव्हा या निद्रिस्त सरकारला जाग आणल्याशिवाय आता माघार नाही अशी स्पष्टोक्ती माजी आमदार भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलता कोल्हे भाजपाच्या महाएल्गार आंदोलन प्रसंगी चांदेकसारे (झगडे फाटा) येथे दिली.

भारतीय जनता पार्टी, रयत क्रांती संघटना, शिवसंग्राम, रासप, रिपाई या मित्रपक्षाच्या वतीने राज्यभर महाएल्गार आंदोलन करण्यात आले. प्रदेश सचिव सौ स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव मतदार संघातील सुमारे ७८ दूध संकलन केंद्रावर आज आंदोलन करण्यात आले.

जोपर्यंत शेतक-यांना व दूध उत्पादकांना रास्त भाव मिळत नाही तोपर्यंत शेतक-यांच्या प्रश्नासाठी लढा चालूच राहील दुधाला सरसकट १० रुपये प्रतिलिटर अनुदान , दूध खरेदीचा दर ३० रुपये प्रति लिटर, व दूध भुकटी निर्यातीला प्रति लिटर ५० रुपये
जोपर्यंत शेतक-यांना व दूध उत्पादकांना रास्त भाव मिळत नाही तोपर्यंत शेतक-यांच्या प्रश्नासाठी लढा चालूच राहील असेही सौ. कोल्हे यांनी सांगितले .

राज्यात भारतीय जनता पार्टीची सत्ता असतांना ज्यावेळी दुधाचे भाव कमी झाले होते, त्यावेळी तातडीने दूध उत्पादकांना पाच रूपयाचे अनुदान देण्यात आले होते, कांदयांचे भाव गडगडले असतांना थेट कांदा उत्पादक शेतक-यांच्या खात्यात अनुदान जमा झाले होते. मात्र आघाडी सरकारच्या काळात सर्वात जास्त फटका शेतकरी व दूध उत्पादकांना बसला आहे. दुर्दैवाने शेतक-यांना पंधरा ते सोळा रुपये दराने आपल्या दूधाची विक्री करावी लागते आहे. शेतकरी हाच आर्थीक व्यवस्थेचा कणा असून राज्य शासनातील सहभागी पक्ष आपापसातील रूसवे फुगवे काढण्यातच व्यस्त असल्याने त्यांना शेतक-यांचा विसर पडला असल्याचे सौ. कोल्हे म्हणाल्या.

कोरोना महामारीच्या संकटाने नागरीक त्रस्त आहे, दिवसेंदिवस रूग्ण वाढत असतांना सरकारला या विपयाचे गांभीर्य नाही, उपाययोजना नाही. कोरोना परिस्थिती हाताळण्यात हे सरकार पुर्णपणे अपयशी ठरले आहे. बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या मालाचे नियोजन केले नाही, विक्री व्यवस्था ठप्प झाली, माता भगिनी विषयी च्या संवेदना बोथट झाल्या आहे,कोविड सेंटर मध्ये उपचार घेणा-या महिलां रुग्णही सुरक्षित नाही, विनयभंग, अत्याचाराच्या घटना घडत आहे, या घोळामुळे जनता त्रस्त झाली असून आघाडी सरकारमध्ये ताळमेळ दिसत नाही.या निद्रिस्त सरकारला आता जाग आणण्याची गरज असून जोपर्यंत शेतक-यांना व दूध उत्पादकांना रास्त भाव मिळत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी लढा सुरूच ठेवणार असल्याचे सौ कोल्हे म्हणाल्या.

यावेळी भाजपचे निरीक्षक नितीन कापसे, तालुकाध्यक्ष साहेबराव रोहम, शहराध्यक्ष कैलास खैरे, केशवराव भवर, संचालक संजय होन, रिपाईचे दिपक गायकवाड, रासपचे राजेंद्र जानराव, संदीप कांदळकर, विलास होन, हरिभाऊ गिरमे चंद्रकांत औताडे आप्पासाहेब औताडे, अँड ज्ञानेश्वर होन ,धनंजय माळी ,गणेश राऊत,रमेश औताडे, महिला आघाडीच्या अध्यक्षा योगिता होन, सरपंच पुनम खरात, उपसरपंच विजय होन, व्ही टी होन, किरण होन,सखाहरी राऊत, मच्छिंद्र जावळे , रावसाहेब होन, बाजीराव होन, भाऊसाहेब होन, प्रल्हाद होन, प्रशांत होन, जितेंद्र होन आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन माजी सरपंच केशवराव होन यांनी केले तर आभार ज्ञानेश्वर होन यांनीं मानले.

 

Leave a Reply

You cannot copy content of this page