कोपरगाव रमाई आवास योजनेचा अडीच कोटीचा निधी परत गेला -संजय काळे
Kopargaon Ramai Awas Yojana funds of two and a half crores have gone back – Sanjay Kale
खर्चीत ४० लाख ६५००० ची चौकशी करणार40 lakh 65000 will be investigated
Rajendara C. Salkar,News Portal, वृत्तवेध ऑनलाईन! ,Fir23 Aug 20.30 Am.By सालकर राजेंद्र
कोपरगाव : शहरात २५८ दारिद्रय रेषेखालील व दारिद्रय रेषेवरील अनूसुचित जाती व नवबौध्द घटकांसाठी राबविण्यात येणाऱ्या रमाई आवास घरकूल योजने अंतर्गत आलेले अडीच कोटी केवळ श्रेय वादामुळे परत गेले असल्याचा ठपका सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी ठेवला असून याला लोकप्रतिनिधी जबाबदार असल्याचा आरोप आहे त्यांनी केला तर यातील ४० लाख ६५ हजार खर्चित निधीचाही हिशोब मागणार असल्याचे सुद्धा संजय काळे यांनी प्रसिद्धी पत्रकातून केले आहे
कोपरगाव शहरातील २५८ घरासाठी रमाई घरकुल योजनेअंतर्गत २०११-१२ साली कोपरगाव नगरपालिकेला दोन कोटी ९० लाख ६५ हजार इतका निधी मिळाला होता परंतु केवळ श्रेयवादामुळे हा निधी तब्बल बारा वर्षे पडून होता अखेर जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या अधिकारात आदेश काढून अडीच कोटी रुपयांचा निधी परत कर्जत नगरपंचायतीला वर्ग केला असल्याचे संजय काळे यांनी सांगितले मात्र यातील ४० लाख ६५ हजार रुपये खर्ची पडल्याचे दिसते याचा आपण हिशोब मागणार असल्याचे सूतोवाच त्यांनी केले.
अहमदनगर जिल्ह्यात ह्या योजनेत १७ कोटी ४१लाख ५१ हजार रूपयांचा निधी नऊ नगरपरिषदांना वितरित झाला होता..मा जिल्हाधिकारी अहमदनगर यांचे दि ३० ऑगस्ट २०२२ चे आदेशान्वये कोपरगाव नगरपरिषदेचा २ कोटी ५० लाख रूपयेचा निधी नगरपंचायत कर्जत ला पाठण्याचे आदेश दिले व कोपरगावचा निधी कर्जतला गेला
कोपरगाव शहरातील अनूसुचित जातीचे २५८ लाभधारक प्रशासन व लोकप्रतिनिधी यांचे हलगर्जीपणामुळे वंचित राहिले.. ह्या १२ वर्षाचे काळात अनेक वेळेस सहमती एक्सप्रेसची सत्ता होती.. ना खाऊंगा व खाणे दुंगा पण येऊन गेले.. सगळ्याच पक्षांच्या सत्ता येऊन गेल्या.. पूर्व व पश्चिमचे मिळून तिन आमदार , तीन खासदार ह्या काळात होऊन गेले…पण कोपरगावचे अनुसुचित जातीचे व नवबौध्द लाभार्थी घरकुलांपासून यांनी श्रेयवादासाठी वंचित ठेवले हे सत्य लपवता येणार नाही.. असे काळे यांनी पत्रकात म्हटले आहे
१२ वर्षाचे कालखंडात १२५८ लाभधारक कोपरगाव नगरपरिषदेच्या नाकर्त्यापणामुळे परत गेलेत.. हे वास्तव नाकारता येणार नाही.. हे गरिबांचे कैवारी आहेत काय? हाच प्रश्न पडला आहे…
आम्ही ३०० कोटी आणले.. आम्ही ३००० कोटी आणले याचे मोठे फ्लेक्स लागतात.. आम्ही कोपरगाव शहरातील १२५८ नागरीकांना घरकुला पासून वचित ठेवले.. बारा वर्ष निधी सांभाळून बँकेत ठेवला याचे फ्लेक्स कोणी लावणार काय? असा मिस्कील टोला संजय काळे यांनी पत्रकातून शेवटी लगावला आहे
चौकट
माजी मंगेश पाटील नगराध्यक्ष असताना त्यांनी १००० घरकुलांची योजना मंजूर झाली होती.. त्यासाठी केंद्राने ४.५ कोटी रूपयांचा निधी पाठवला होता.. दोघांचे श्रेय वादात हा निधी २०११ मध्ये व्याजासह परत गेला.. भुर्दंड जनतेच्या करातून भरावा लागला योजनेसाठी निधी आणण्यासाठी मंगेश पाटील खास विमानाने दिल्लीला गेले होते – संजय काळे
Post Views:
53