कोपरगावात महिला अत्याचाराविरोधांत मविआ’चे काळा मास्क घालुन मुक निषेध आंदोलन
In Kopargaon against women’s atrocities, Maviya’s black mask was a silent protest movement
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन! ,Sat24 Aug 15.00 Am.By सालकर राजेंद्र
कोपरगाव: न्यायालयाने बंदला मज्जाव केल्यानंतर शनिवारचा नियोजित ‘महाराष्ट्र बंद’ मविआकडून मागे घेण्यात आला. बदलापूर घटनेच्या निषेधार्थ कोपरगावात येथे आज महिला अत्याचाराविरोधात मविआ’चे वतीने काळा मास्क घालून छत्रपती शिवाजी महाराज स्मारक चौक या ठिकाणी मुक आंदोलन करण्यात आले.
बदलापूर घटनेवरून सरकारची कोंडी करण्यासाठी बंदला मज्जाव केल्यानंतर राज्यभर मूक आंदोलन करण्याचा निर्णय मविआच्या नेत्यांनी स्पष्ट केला या निर्णयानंतर कोपरगाव मध्ये महाविकास आघाडीच्या वतीने शनिवारी (२४) रोजी सकाळी अकरा वाजता येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक चौक या ठिकाणी काळया फिती व मास्क बांधून मूक निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी महिलांच्या हातात विविध घोषणा देणारे फलक होते त्याचप्रमाणे उपस्थित महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी घोषणाबाजी करत सरकारचा निषेध केला.
यावेळी इयत्ता सातवीच्या बारा वर्षाच्या राजेश्वरी संतोष होने या मुलीने ‘आज शिवाजी महाराज असते तर” या काव्यपंक्ती सादर करून विरोधकांवर हल्लाबोल केला,
महाराष्ट्राची कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली असुन लहान बालके व महिला भगिनींवरील अत्याचाराच्या विनयभंगाच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. नुकतीच बदलापुर येथे दोन बालिकांवर गुन्हेगारी पार्श्वभुमी असलेल्या नराधमाने अत्याचार केले. याप्रकरणी स्थानिक पोलीस प्रशासनाने राज्यातील सत्ताधाऱ्यांच्या दबावामुळे गुन्हा दाखल करण्यास अक्षम विलंब केला. याचा आम्ही निषेध करतो. सदर प्रकरणातील आरोपीस फास्टट्रॅक कोर्टात खटला चालवुन तात्काळ फाशी द्यावी.तसेच बदलापूर येथिल जनआंदोलन प्रकरणातील आंदोलकांवरील गुन्हे त्वरीत मागे घेण्यात यावे त्वरीत कारवाईचे आदेश देऊन महाराष्ट्रातील जनतेस दिलासा द्यावा या मागण्यांचे निवेदन या ठिकाणी आलेल्या तहसीलदार महेश सावंत यांना देण्यात आले.
यावेळी शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संपर्कप्रमुख राजेंद्र झावरे, कैलास जाधव, संजय सातभाई, योगेश बागुल, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे राज्य प्रवक्ते संदीप वर्पे, शहराध्यक्ष स्वप्निल पवार, भावेश थोरात, काँग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव नितीन शिंदे, शहराध्यक्ष तुषार पोटे, मनसेचे अनिल गायकवाड, योगेश गंगवाल, यासह प्रमोद लबडे, सनी वाघ, कलविंदरसिंग दडियाल, कालूआप्पा आव्हाड, भरत मोरे, रवी कथले, प्रवीण शिंदे, सपना मोरे, राखी विसपुते, वर्षा शिंगाडे, अश्विनी होने, शितल चव्हाण, इरफान शेख, प्रकाश शेळके, राहुल देशपांडे, बाळासाहेब साळुंके, राजू शेख, अतिश बोरुडे, अशिष निकुंब, सिद्धार्थ शेळके, विजय जाधव आदी महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.