कोपरगाव बेटातील शुक्राचार्य मंदिरात भव्य शुक्रचार्य मुर्ती ‘प्राण प्रतिष्ठा’ सोहळा पार पडला
A grand Shukracharya idol ‘Pran Pratishta’ ceremony was held in the Shukracharya temple in Kopargaon island
पूजेचे यजमानपद उर्जादायी क्षण- विवेक कोल्हेPowering Moments Hosted by Puja – Vivek Kolhe
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन! ,Sun25 Aug 14.00 Am.By सालकर राजेंद्र
कोपरगाव: कोपरगाव भेट येथील श्री गुरु शुक्राचार्य मंदिरात श्रावण मास पवित्र पर्वकाळात परम जगातील एकमेव परम सद्गुरु श्री श्री शुक्राचार्य महाराजांच्या तेजस्वी मुर्तीचा भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळा मिती श्रावण शु।। १४ शके १९४६ निमित्त सोहळ्याच्या पूर्वसंध्येला रविवार दि. १८ ऑगस्ट रोजी सकाळी ९.०० वा. परम सद्गुरु शुक्राचार्य महाराज यांच्या सुंदर मुर्तीची भव्य मिरवणूक तहसिल कार्यालय मैदान, कोपरगांव येथून मोठ्या उत्साहात वाजत-गाजत गुरुद्वारा रोड इंदिरा शॉपींग सेंटर छ. शिवाजी महाराज पुतळा चौक पोलिस स्टेशन लहान पुल मार्गे मंदिर सद्गुरु शुक्राचार्य मंदिर कोपरगाव बेट येथे पोहोचली.
सोमवारी दि. १९ ऑगस्ट ते शुक्रवारी दि. २३ ऑगस्ट पर्यंत वास्तविक विधी पाच दिवसाच्या कालावधीत संपन्न झाला. अशी माहिती मंदिर समितीचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड यांनी दिली.
या समारंभात गुरू वैभव जोशी , सागर जोशी टाकळी कर , शिधेश कुलकर्णी , सागर जोशी कोरगावकर , निखिल कुलकर्णी , राकेश भणगे , नरेंद्र जोशी आणि संतोष शेंदुर्निकर आणि त्यांच्या टीमच्या आध्यात्मिक मार्गदर्शनाखाली
प्रायक्षित्त, संकल्प, प्रधान संकल्प, पुण्याहवाचन, देवता आवाहन, वास्तुमंडल, योगिनी, क्षेत्रपाल, देवता स्थापन, श्री मुर्तीस जलाधिवास, मंगलाचरण, नवग्रहमंडल देवता स्थापन,ग्रह हवन, लोकपाल होम, श्री मुर्तीस फुलाधिवास, सायं. पुजन, मंगलाचरण, पौष्टिक हवन, पराय होम, श्री मुर्तीस १०८ कुंभात्मक स्नान व फलाधिवास, सायं. पुजन,पुष्पार्चन, बिर्वार्धन, कुंकुमार्चन श्री मुर्तीचे तत्वज्ञास व होम,श्री मुर्तीस शय्याधिवास व धान्याधिवास, सायं. पुजन, प्रधान हवन, उत्तरांग हवन, बलिदान पुर्णाहुती, श्री मुर्तीची स्थापना व प्राणप्रतिष्ठा, महानैवद्य, महाआरती व महाप्रसाद सर्व विधींचा समावेश होता. सोमवारी १९ ऑगस्ट रोजी सुरू झाले आणि शुक्रवारी २३ रोजी संपले
यजमान म्हणून विवेक कोल्हे सौ रेणुका कोल्हे आणि प्रदीपशेठ राठी त्यांचे कुटुंबीय याला साक्षीदार होते. जगातील एकमेव परम सदगुरू शुक्राचार्य महाराज हे मंदिर अद्वितीय आहे कारण ते दानव गुरु श्री शुक्राचार्य महाराज यांच्या संजीवनी मंत्राची अगाध महती सांगणारे आणि ब्रह्ममुहूर्त म्हणून ओळखले जाणारे प्रभावी स्थान असल्याने या ठिकाणी विवाह सोहळ्यासाठी मुहूर्त पाहण्याची गरज नाही कुठल्याही वेळी कधीही या ठिकाणी विवाह करता येतो अशी या मंदिराची प्रचिती आहे महादेवाची पिंड स्वरूपात पारंपारिक जुन्या काळातील मंदिर बांधले गेले आहे.
या कार्यक्रमास आखाडा परिषदेचे प्रवक्ते प.पू.महंत डॉ.भक्तीचरणदास महाराज,महंत राजाराम महाराज,महंत बालकदास महाराज, महंत चंदनदास महाराज,महंत पद्मचरणदास महाराज, महंत रमेशगिरी भंत शिवानंद गिरी महाराज महंत बालकेश्वरनंद महाराज महंत चंद्रहार महाराज,महंत परमानंद महाराज,महंत राघवेश्वरानंदगिरी महाराज (उंडेमहाराज), साध्वी शारदा माताजी, जोशी गुरू,संजीवनी एज्युकेशन ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे चेअरमन नितीन कोल्हे, अंबादास देवकर,पराग संधान
या मान्यवरासह विश्वस्त मंडळ, सदस्य,पदाधिकारी, कर्मचारी आणि पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा प्राणप्रतिष्ठा सोहळा यशस्वी होण्यासाठी ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड, सचिव संजीव कुलकर्णी, खजिनदार गजानन को-हाळकर, सदस्य लक्ष्मीकांत कुलकर्णी,हेमंत पटवर्धन तसेच स्थानिक व्यवस्थापक कमिटी
सचिन परदेशी मंदिर प्रमुख, प्रसाद पन्हे उपप्रमुख, संजय वडांगळे, राजेंद्र (मुन्ना) आव्हाड,भागचंद रुईकर, बाळासाहेब लकारे, बाळासाहेब गाडे मधुकर साखरे, सुजित वरखेडे, विजय रोहम , आदिनाथ ढाकणे, विलास आव्हाड, विलास रंगनाथ आव्हाड, अरुण जोशी, दिलीप सांगळे दत्तात्रय सावंत, महेंद्र नाईकवाडे, विशाल राऊत, विकास शर्मा,राजाराम पावरा (व्यवस्थापक) यांनी विशेष परिश्रम घेतले
Post Views:
53