ठिबकचे ७० लाख बँक खात्यात जमा होणार – आ. आशुतोष काळे
एकाच महिन्यात दुसऱ्यांदा ठिबक अनुदान
वृत्तवेध ऑनलाईन।1August2020,17 :25
By : Rajendra Salkar
कोपरगाव : सन २०१९-२०२० च्या ठिबक अनुदानापोटी या आधी ४३.९० लाख रुपये अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग झाले असून आता लवकरच ७० लाखाचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग होणार आहे. एकाच महिन्यात शेतकऱ्यांना दुसऱ्यांदा अनुदान मिळणार ही मतदार संघातील पहिलीच घटना असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली आपण सातत्याने सरकारकडे केलेल्या पाठपुराव्याचे हे फलित असल्याचे त्यांनी सांगितले.
ठिबक सिंचन पद्धती वापर करून पाण्याची बचत करा या सरकारच्या आव्हानाला प्रतिसाद देत अनुदान मिळेल या आशेने शेतकऱ्यांनी २०१९/२० मध्ये असंख्य शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन संच खरेदी खरेदी करून मोठी गुंतवणूक केली. पण अनुदान मिळेना ही बाब आमदार आशुतोष काळे यांच्या कानावर टाकल, आ. काळे यांनी त्यांनी राज्याचे कृषीमंत्री नामदार दादा भुसे, नामदार पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे जिल्हा नियोजन बैठकीत लक्ष वेधून त्याबाबत पाठपुरावा केला होता. तसेच मागील महिन्यात कृषी आयुक्त यांच्याशी देखील याबाबत सकारात्मक चर्चा झाली होती. त्या पाठपुराव्यातून जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच ४३.९० लाख रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाले होते. उर्वरित शेतकऱ्यांचे देखील ठिबक सिंचन अनुदान मिळावे यासाठी पाठपुरावा सुरूच होता. त्या पाठपुराव्यातून शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाणीव असलेल्या महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देतांना सुक्ष्म सिंचन योजना अंतर्गत २०१९-२०च्या ठिबक सिंचन अनुदानापासून वंचित असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात नव्याने ७० लाख रुपये अनुदान जमा केले आहे. त्यामुळे कोपरगाव तालुक्याला आजपर्यंत एक कोटी चोवीस लाख रुपये एकाच महिन्यात ठिबक सिंचन अनुदानापोटी मिळाले आहे. उर्वरित शेतकऱ्यांना देखील लवकरात लवकर ठिबक सिंचन योजनेचे अनुदान मिळावे यासाठी पाठपुरावा सुरूच असून त्याबाबत तालुका कृषी अधिकाऱ्यांना तसे आदेश देण्यात आले आहे. सध्या संपूर्ण विश्वावर कोरोना व्हायरसचे वैश्विक संकट आहे. या संकटात तीन महिने लॉकडाऊन असल्यामुळे आर्थिक चाके रुतली असतांना महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहून शेतकऱ्यांना एकाच महिन्यात दुसऱ्यांदा ठीबक सिंचनचे अनुदान देवून खरीप हंगामात योग्य वेळी सहकार्य करून मोलाची मदत केल्याबद्दल आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने महाविकास आघाडी सरकारचे आभार मानले आहे.