कोपरगावकरांच्यावतीने आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा सत्कार
Shiv Sena felicitated party chief Uddhav Thackeray today on behalf of the people of Kopargaon
Rajendara C. Salkar,News Portal, वृत्तवेध ऑनलाईन!Sat14, Sep 20.30 Am.By सालकर राजेंद्र
कोपरगाव : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच्या काळातच कोपरगाव शहराच्या पाणी प्रश्नासाठी पाच नंबर साठवण तलावाला १३१.२४ कोटी रुपये निधी देण्यात आला होता. त्या पाच नंबर साठवण तलावाचे काम पूर्णत्वाकडे जात आहे. कोपरगावात जुनी पेन्शन कर्मचाऱ्यांचे महाअधिवेशनाला भेट देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज रविवारी १५ सप्टेंबर रोजी कोपरगाव येथे येत आहे.
कोपरगावकरांच्या पाणी प्रश्नात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जातीने लक्ष घालुन निवडणुकीच्या प्रचार सभेत शब्द दिला होता त्यानुसार मुख्यमंत्री असतांना कोपरगावकर व शिवसैनिक यांच्या विनंतीला मान देवुन ५ नं साठवण तलावासाठी १३१.२४ कोटी रूपये निधी देवुन कोपरगावकरांची तहान भागविण्याचा प्रयत्न केला. आज तो ५ नंबर साठवण तळे पुर्णत्वाकडे जात आहे. योगायोगाने उद्धव ठाकरे कोपरगाव येथे येत असुन त्यांनी दिलेल्या निधीबद्दल कोपरगावकरांच्या वतीने व शिवसैनिकांच्या वतीने आभार व कृतज्ञता व्यक्त करून त्यांचा जाहीर सत्कार करण्यात येणार आहे. त्यामुळे कोपरगाव शिवसैनिकात आनंदाचे वातावरण पसरले आहे
यासंबंधी शिवसेना शहर कार्यालयमध्ये शनिवारी दिनांक (दि.१४ रोजी) दुपारी पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. बैठकीस शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, उपजिल्हाप्रमुख कैलास जाधव, माजी नगराध्यक्ष संजय सातभाई, शहरप्रमुख सनी वाघ, माजी शहरप्रमुख कलविंदरसिंग दडियाल, रवी कथले, रंजन जाधव, पप्पू पडियार, अक्षय निकुंब आदिसह शिवसैनिक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.