मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्या विना अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याचे अनावरण कराल तर तेथेच आत्मदहन करू- फकीरा चंदनशिवे.
If the Chief Minister unveils the statue of Annabhau Sathe without the Deputy Chief Minister, we will self-immolate there – Fakira Chandanshive.
अण्णाभाऊ साठे पुतळा अनावरण कार्यक्रमावर प्रश्नचिन्ह
Rajendara C. Salkar,News Portal, वृत्तवेध ऑनलाईन!Sat5, Sep.14.00 Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव भारताचे जगातील अण्णा लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचा एकमेव व पहिला पुतळा कोपरगावात उभारण्यात आला आहे या पुतळ्याचे अनावरण राज्याचे मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते व्हावे अन्यथा सात तारखेला पुतळ्यासमोरच आपण डिझेल पेट्रोल टाकून आत्मदहन करणार असल्याचा इशाराच सत्यशोधक लहुजी क्रांती सेना जिल्हाअध्यक्ष फकीरा चंदनशिव यांनी शनिवारी ५ ऑक्टोबर रोजी अमरण उपोषण स्थळावरून दिला आहे.
कोपरगाव शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते व्हावे या मागणीसाठी सत्यशोधक लहुजी क्रांती सेना जिल्हाअध्यक्ष फकीरा चंदनशिव कोपरगाव तालुका उपाध्यक्ष गणेश पगारे, तालुका संघटक सुरेश मरसाळे, तालुका युवा अध्यक्ष राजेंद्र कांबळे हे चार पदाधिकारी अण्णाभाऊ साठे पुतळा या ठिकाणी अमरण उपोषणास बसले आहे
उपोषणकर्ते फकीरा चंदनशिव म्हणाले अण्णाभाऊ साठे यांचा हा राज्य व देशासह जगातील एकमेव व पहिला पूर्णाकृती पुतळा आहे याचे अनावरण मोठ्या थाटामाटात मुख्यमंत्री अथवा उपमुख्यमंत्री तोलामोलाच्या मंत्र्यांच्या हस्ते व्हावे अशी गेल्या दीड वर्षापासून वारंवार व सातत्याने आम्ही कोपरगाव नगरपालिकेकडे मागणी करत आहोत. आमदार आशुतोष काळे यांना देखील मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री बोलवा असे पत्र दोन-तीन वेळा दिले माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांना देखील पत्र दिल्याचे फोटो माझ्याकडे आहेत असेही चंदनशिव म्हणाले
पुढे बोलताना फकीरा चंदनशिव म्हणाले पुतळा आल्यानंतर मातंग समाजाने वारंवार नगरपालिकेकडे मागणी केली मोर्चे काढले आंदोलन केले करूनही पुतळ्याच्या अनावरण करण्यात आले नाही मात्र आता निवडणुका दिसू लागल्याने अचानक चार दिवसात काय गोंधळ झाला समाजाला विश्वासात घेतले नाही कुठला विचार केला नाही त्यांच्या मनानेच त्यांनी तारीख ठरवली त्यांनी कोणालाच विचारले नाही त्यांच्या त्यांच्याच मनाचा कारभार केला असल्याचा दणदणीत आरोप चंदनशिवे यांनी केला मागे मी एकदा उपोषण केले त्यावेळेस माझे उपोषण सोडण्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आले होते परंतु मी त्यांना सांगितले मला मुख्यमंत्री अथवा उपमुख्यमंत्री यांच्याच हस्ते या पुतळ्याचे अनावरण व्हावे अशी मागणी केली. करायचेच असते तर त्याच वेळेस नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना सांगून त्यांची तारीख घेऊन आजी माजी आमदारांच्या हस्ते अनावरण केले असते अशा टोला देखील चंदनशिवे यांनी यावेळी लगावला मुळात आम्ही दीड वर्ष का थांबलो ? कारण आम्हाला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीच पाहिजे होता, अण्णाभाऊ साठे यांचा नातू आमच्या रक्ताचा आहे त्याच्यासाठी हजारोच्या संख्येने रॅली काढू आम्हाला वाईट एकाच गोष्टीचे वाटते की यात राजकारण होत आहे या राजकारणापायी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आम्हाला ज्यांचा मोठा अभिमान आहे असे अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन भाऊ साठे यांच्या उपस्थितीत अनावरण करण्याचे जे स्वप्न होते. अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन भाऊ साठे आम्हाला हे मुख्यमंत्र्यांपेक्षा कमी नाहीत परंतु काही लोक आम्हाला असे म्हटले मुख्यमंत्री आणायचे आणि अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे अनावरण करायचे तुमची लायकी आहे का असे काही जातीवादी लोक बोलले
म्हणून तो घाव आमच्या जिव्हारी लागलेला आहे गेल्या दीड वर्षापासून या गोष्टीचा आम्ही पाठपुरावा करीत आहोत कार्यक्रमाला मुख्यमंत्री अथवा उपमुख्यमंत्री येत नसतील तर मी आजच सांगतो आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे येत्या सात तारखेला जर यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या विना लोकार्पण सोहळा केला तर मी सांगतो याच ठिकाणी पेट्रोल डिझेल टाकून आत्मदहन करील हा 100% इशारा असून नुसता इशाराच नाही तर खरोखर करून देखील दाखवील अण्णाभाऊ पुतळा समोर स्वतःला पेटून घे असे फकीरा चंदनशिवे या चंदनशिवे यांनी स्पष्टपणे सांगितले.
आचारसंहिता लागण्याच्या आत श्रेय घेण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांच्याकडून घाईघाईने अनावरण सोहळा उरकण्याचा घाट घातला जात असताना या लोकार्पण कार्यक्रमावरून समाज बांधवांमध्ये तीव्र नाराजी पुतळा लोकार्पणावरून पुन्हा वादाला तोंड फुटले आहे.
यांचा पुतळा राज्यासह देशात व जगात सर्वप्रथम माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी कोपरगाव येथे बसविला आणि तेथूनच लोकशाहीर साठे यांची अधिक ओळख समाजाला झाली. त्यामुळे स्व. कोल्हे यांचे योगदान समाजाला विसरता येणार नाही. लोकार्पण सोहळ्यामध्ये कोल्हे परिवाराला मानाचे स्थान दिले पाहिजे, अशी मागणी समाज बांधवाच्या वतीने राजेंद्र बागुल यांनी केली.
शुक्रवारी ४ ऑक्टोबर रोजी कोपरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी सुहास जगताप यांच्या दालनात मातंग समाजातील प्रमुख पदाधिकारी व समाजातील विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी यांची बैठक झाली. समाजातील अनेकांनी स्व. शंकरराव कोल्हे यांच्या पत्नी सिंधुताई कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मानाने लोकार्पण सोहळा करावा, अन्यथा हा सोहळा होऊ देणार नाही. जर केलाच तर आम्ही निषेध करुन काळे झेंडे दाखविणार, असा इशारा समाज बांधवांनी नगरपालिका बैठकीत दिला होता
दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या सोहळ्याला पुन्हा वादाची किनार लागली आहे. अंतर्गत वादविवाद व मतभेद मिटवण्यासाठी स्मारक देखरेख समितीचे अध्यक्ष सुखदेव जाधव, उपाध्यक्ष विनोद राक्षे, राजेंद्र बागुल, नितीन साबळे, शरद त्रिभुवन, नितीन पोळ, फकिरा चंदनशिवे यांच्यासह समाजबांधवांनी चर्चा केली. काही कार्यकर्त्यांनी कडाडून विरोध करीत पुतळ्याचा सोहळा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत करावा. दोन दिवसांचा कालावधी कमी आहे, तेव्हा हा सोहळा पुढे ढकलण्यात यावा, अशी मागणी बैठकीत मुख्याधिकारी सुहास जगताप यांच्याकडे करण्यात आली होती एकंदरीत सामाजिक संघटना आक्रमक झाल्याने एवढा विरोधानंतरही कार्यक्रम घेतल्यास प्रशासकराज असल्यामुळे होणाऱ्या सर्व परिणामांची जबाबदारी मुख्याधिकारी यांच्यावरच येणार असल्याचे दिसते. तसेच जर समाज बांधव नाराज असतील तर केवळ आचारसंहिता व हौस म्हणून कार्यक्रम घेण्यातही काही मजा नाही
Post Views:
65