कोपरगावात संजीवनी युवा प्रतिष्ठानचे वतीने भव्य नोकरी महोत्सव; अनेक युवक- युवतींना मिळाला रोजगार
Grand Job Festival organized by Sanjivani Youth Foundation at Kopargaon; Many young men and women got employment
२२३४ नोकरी प्रमाणपत्र व या व्यतिरिक्त ८९० सेकंड राऊंडसाठी सिलेक्ट
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन!Sat5, Sep.19.20 Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव: संजीवनी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या यांच्या संकल्पनेतून, आज संत जनार्दन स्वामी महाराज आश्रम भक्तनिवासात भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात सुमारे १० हजार युवक युवतीनी सहभाग घेतला. तर १०० हून अधिक नामांकित कंपन्यांनी सहभाग घेतल्याने हजारो तरुणांना नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या. युवा नेते विवेक कोल्हे यांच्या पुढाकाराने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमामुळे स्थानिक युवक युवतींना त्यांच्या कौशल्यानुसार नोकऱ्या मिळविण्याची संधी मिळाली. अध्यक्षस्थानी संजीवनी विद्यापीठाचे मॅनेजिंग ट्रस्ट अमित कोल्हे होते.
युवा नेते विवेक कोल्हे यांच्या संकल्पनेतून कोपरगाव विधानसभा मतदार संघासाठी माध्यमातून हा भव्य नोकरी महोत्सव आयोजित करण्यात आला. यावेळी विवेक कोल्हे म्हणाले, कोपरगाव मतदार संघात ६० हजार युवक – युवती आहेत. पाणी गेल्यामुळे उद्योग येण्यास तयार नाहीत परवानगी मिळत नाही त्यामुळे नोकरी महोत्सवाची गरज पडली. संजीवनी विद्यापीठाच्या माध्यमातून आत्तापर्यंत साडेसहा हजार युवकांना नोकरी मिळाली आहे संजीवनी उद्योग समूहाच्या माध्यमातून दरमहा कोपरगावच्या बाजारपेठेत आठ ते दहा कोटी रुपये येतात औद्योगिक वसाहतीसाठी नव्याने ३५ एकर जागा मिळाली आहे तेव्हा तरुणांनी नोकरी मिळवणे हे उद्दिष्ट न ठेवता उद्योजक होण्यासाठी प्रयत्न करावा अनेक गोष्टींना सरकारची सबसिडी आहे संधी युवकांनी शोधली पाहिजे आणि संधीचे सोने केले पाहिजे असे आवाहन यावेळी त्यांनी उपस्थित युवक युवतींना केले
यावेळी आयुर्वेद गुरु डॉ. रामदास आव्हाड म्हणाले ज्यांना नोकरी मिळाली त्यांचे अभिनंदन ज्यांना मिळाली नाही त्यांनी निराश होऊ नका सकारात्मक विचार ठेवा दिशा बदला किनारे बदलतील असे विचार व्यक्त करून युवक युवतींना प्रोत्साहन दिले
अनेक तरुण नोकरीच्या शोधात आहेत. या मेळाव्यात अशा तरुणांना रोजगाराच्या संधी मिळाल्या आहेत. हजारो तरुणांना नोकऱ्या मिळाल्या असून, मेळाव्यात योग्य पात्रतेच्या नितीन औताडे, राहुल पोंडे, दीक्षा नवतुरे, संचिता रणशूर, आरती गोसावी, ईश्वरी कोकाटे, अनज शेख उमेदवारांना ऑन-दि- स्पॉट नियुक्तीपत्र देण्यात आले. त्यामुळे हा रोजगार मेळावा युवक-युवतींना त्यांच्या करिअरसाठी एक महत्त्वाची संधी उपलब्ध करून देणारा ठरला असल्याची भावना रोजगार मेळाव्याबाबत संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन कोल्हे यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे,डॉ.मिलिंद कोल्हे, संजीवनी विद्यापीठाचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे, प्रणव पवार,उद्योजक राजेश ठोळे, संजय भन्साळी, हदयरोगतज्ञ डॉ. दत्तात्रय मुळे, आयुर्वेदाचार्य डॉ. रामदास आव्हाड, गणेशाचे डॉ. एकनाथ गोंदकर, व्यापारी असोसिएशनचे सुधीर डागा, आत्मा मालिक चे सचिव हनुमंतराव भोंगळे, के जे सोमय्या महाविद्यालयाचे प्राचार्य व्ही. सी. ठाणगे, गणेश वाणी, एस जे एस ग्रुपचे प्रसाद कातकडे, माजी मुख्याध्यापक मकरंद कोऱ्हाळकर, रियाज शेख सर, रिपाईचे दिपक गायकवाड, उपाध्यक्ष मनेष गाडे, केशव भवर, कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार, साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे, व्यवस्थापकीय व्यवस्थापक प्रकाश डुंबरे, सर्व खाते प्रमुख, उपखाते प्रमुख, संजीवनी एज्युकेशन सोसायटीचे सर्व अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी वृंद
यांच्यासह संजीवनी उद्योग समूहातील विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी कार्यकर्ते संजीवनी युवा प्रतिष्ठानचे युवा सेवक, नोकरीसाठी मुलाखतीस आलेले हजारो युवक युवती त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.दिवसभर सुरू असणाऱ्या या नोकरी महोत्सवात विविध संघटनाचे आजी माजी पदाधिकारी,नेते यांनी भेटी देऊन उपक्रमास शुभेच्छा व्यक्त केल्या.
संजीवनी नोकरी महोत्सवासाठी सुमारे दहा हजार सुशिक्षित बेरोजगारांनी नोंदणी करत प्रत्यक्ष मुलाखतीसाठी हजेरी लावली, यात दिव्यांग बांधवांचाही समावेश होता., मुलाखतीत ज्यांची निवड झाली त्यांना यावेळी तात्काळ नियुक्ती पत्राचे वाटप होईल करण्यात आले. सुशिक्षित बेरोजगारांची नोंदणी, अल्पोपहार व्यवस्था, मुलाखत विभागणी यंत्रणा, संगणकाचा प्रभावी वापर, प्रशस्त जागा, आवश्यक मार्गदर्शन इत्यादी व्यवस्था सगळं कसं नीटनेटकं होतं याची कार्यक्रमस्थळी चर्चा होती
चौकट
८१८० ऑनलाईन नोंदणी व मुलाखत स्थळी ऐनवेळी उपस्थिती १५०० असे एकूण ९६८० युवकांचा प्रतिसाद मिळाला.पैकी ६८६५ मुलाखती पार पडल्या तर काही वेळेअभावी येत्या काळात विभागनिहाय पार पडणार आहे.यातील २२३४ नोकरी प्रमाणपत्र व या व्यतिरिक्त ८९० सेकंड राऊंडसाठी सिलेक्ट झाले असून एकूण ३१२४ नोकऱ्या आज वितरीत झाल्या आहे.उर्वरित सर्वांना जॉब कार्ड प्राप्त झाले असून त्यांना दर सोमवारी नोकरीचे उपलब्धी संदेश मिळणार आहे.या महोत्सवात ४.२० लाखाचे पॅकेज गेले असून सेकंड राऊंड मद्ये गेलेल्या युवक युवतींना अधिक रकमेचे पॅकेज मिळू शकणार आहे.
Post Views:
32