कोपरगांवात राष्ट्रवादीच्या ‘घड्याळा’ची टिकटिक;  विरोधात ‘तुतारी’ की ‘मशाल’ ?

कोपरगांवात राष्ट्रवादीच्या ‘घड्याळा’ची टिकटिक;  विरोधात ‘तुतारी’ की ‘मशाल’ ?

The ticking of NCP’s ‘Clock’ in Kopargaon;  Against ‘trumpet’ or ‘torch’?

मशिनवरून सेनेचं ‘धनुष्यबाण’ तर भाजपाचं ‘कमळ’  गायब

  यंदाच्या विधानसभा निवडणुकीतील  या मोठ्या राजकीय घटना

Rajendara C. Salkar,News Portal, वृत्तवेध ऑनलाईन!Wed 23, Oct.19.00 Pm.By सालकर राजेंद्र

कोपरगाव: यंदाची विधानसभा निवडणूक ही काहीशी आगळी वेगळी ठरणारी असेल. या निवडणुकीत पहिल्यांदाच काही गोष्टी पाहायला मिळणार आहेत.

राज्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर वेगळेच राजकीय समीकरण तयार झालं. राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा एक गट भाजपसोबत सत्तेत आणि दुसरा गट काँग्रेससोबत विरोधी पक्षात असल्याचं दिसून आलं. त्यानंतर राष्ट्रवादीच्या आणि शिवसेनेच्या दुसऱ्या गटाला अनुक्रमे तुतारी आणि मशाल चिन्ह मिळालं. त्यामुळेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र असलेल्या उद्धव ठाकरेंना पहिल्यांदाच मशाल’ हे नवीन चिन्ह तर राष्ट्रवादीची स्थापना करणाऱ्या शरद पवार यांना तुतारी’ या नव्या चिन्हासोबत विधानसभा  निवडणुकीला सामोरं जावं लागणार आहे.

कोपरगावात राष्ट्रवादीच्या घड्याळाची टिकटिक विरोधात तुतारी’ वाजणार की मशाल’ पेटणार ?

राज्यासह केंद्रीय भाजपाच्या नेत्यांना कोल्हे यांना बंडखोरी करण्यापासून रोखण्याबरोबर भाजपमध्येच थांबविण्यात  यश आले दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी  अजित पवार गटाचे आमदार आशुतोष काळे यांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर झाली आणि त्यानंतर चर्चा सुरु झाली ती त्यांच्या विरोधात ‘तुतारी’ वाजणार की ‘मशाल’ पेटणार  याचा निर्णय येत्या एक दोन दिवसात होऊन चित्र स्पष्ट होईल सध्या तरी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हा सह संपर्क प्रमुख राजेंद्र झावरे यांच्या नावावर शिक्का मोर्तब झाले असून केवळ औपचारिकता म्हणून मातोश्रीच्या आदेशाची अर्थात एबी फॉर्मची ते वाट पाहत असल्याचे  समजते.  

महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांच्या जागा वाटपाचा तिढा जवळपास सुटला ज्या जागा संदर्भात तिढा आहे त्या  तिढा  असलेल्या  २० जागेमध्ये कोपरगाव विधानसभेचे सुद्धा नाव आहे. 

गेल्या साडेतीन ते चार दशकापासून कोपरगाव विधानसभा मतदारसंघात शिवसैनिक हे धनुष्यबाणावर नाही तर भाजपच्या कमळ’ चिन्हावर मतदान करीत आलेले  आहेत. त्यामुळे मागील ३५ ते ४० वर्षांची ‘धनुष्यबाण’ असो की कमळा’वर  मतदान करण्याची परंपरा खंडीत होणार आहे. 

कोपरगाव विधानसभा मतदारसंघ महायुतीत   राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या च्या वाट्याला गेला. विद्यमान आमदार आशुतोष  काळे यांची उमेदवारी जाहीर झाली.  त्यामुळे भाजपच्या स्नेहलता कोल्हे यांनी विवेक कोल्हे यांच्या उमेदवारीसाठी भाजप सोडून वेगळा निर्णय घेण्याचा पवित्र घेतला,  परंतु याची देवेंद्र फडणवीस यांनी गांभीर्याने दखल घेत त्यांची मनधरणी केली त्याचबरोबर केंद्रीय सहकार मंत्री अमित शहायांच्याबरोबर देखील आज बुधवारी(२३) रोजी दिल्लीत बैठक घेतली. आणि कोल्हेंना बंडखोरी करण्यापासून रोखण्याबरोबरच भाजपमध्ये थांबविण्यात यश मिळविले आहे त्यामुळे या विधानसभेला कोपरगाव मतदारसंघात धनुष्यबाण’ आणि कमळ’ हे चिन्ह मतदान यंत्रावर यंदा पाहायला मिळणार नाही. असे असले तरी घड्याळाच्या विरोधात तुतारी’ वाजणार की मशाल’ पेटणार याकडे मात्र कोपरगाव विधानसभेतील मतदारांचे लक्ष लागले आहे

यंदा पहिल्यांदा घडणाऱ्या घटना

३५ ते ४० वर्षानंतर वर्षानंतर पहिल्यांदा कोपरगावमध्ये कोल्हे यांचे नाव मतदान यंत्रावर नसेल.

 पहिल्यांदा विधानसभा मतदारसंघातून कमळ’ आणि धनुष्यबाण’ चिन्ह हद्दपार झालं. 
ही जागा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला मिळाल्यास  ३५ ते ४० वर्षात पहिल्यांदाच निष्ठावान शिवसैनिकाला उमेदवारी मिळणार असण्याची शक्यता आहे

एकंदरीतच यंदाची निवडणूक ही विविध कारणाने महत्त्वाची ठरणार आहे. आज पर्यंत कोपरगाव म्हटले की काळे कोल्हे यांची राजकीय लढाई संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेणारी व महाराष्ट्राच्या चर्चेचा विषय ठरणारी होती. मात्र यंदा कोपरगाव ची ही निवडणूक भाजपला अर्थात कोल्हे कुटुंबीयांना  प्रचंड तडजोड करावी लागणारी ठरली आहे. या तडजोडीच्या राजकारणाचे दूरगामी पडसाद  उमटणार असून याचे परिणाम आगामी काळात कोपरगावच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या  निवडणुकीत देखील पाहायला मिळतील.  यंदाच्या कोपरगाव विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या आदेशामुळे कोल्हे थांबणार याची गेल्या आठवड्यापासून चर्चा सुरू होती दिल्लीत बुधवारी अमित शहा, देवेंद्र फडणवीस, स्नेहलता कोल्हे व विवेक कोल्हे यांच्यात झालेल्या बैठकीमुळे कोल्हे थांबणार हे जवळपास निश्चितच झाले आहे. त्यामुळे आठवड्यापासून सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम मिळाला,  कोल्हे यांच्या थांबण्याच्या चर्चेमुळे संपूर्ण कोपरगाव मतदार संघ ढवळून निघाला आहे. पन्नास वर्षापासून कुठलीही निवडणूक म्हटले की काळे कोल्हे यांची लढाई ठरलेली हे समीकरण गृहीत धरलेल्या  कोपरगाव मतदार संघातील सामान्य नागरिक, महिला, मतदार, व्यापारी, शेतकरी कोल्हे समर्थक कार्यकर्ते यांच्यासाठी  हा मोठा धक्का मानला जात आहे. कोल्हे यांचे निवडणुकीतील लढाईचे महत्व किती मोठे आहे. कोल्हे निवडणूक लढाईत नसतील तर आपले अस्तित्व काय ? याची जाणीव  आता प्रकर्षाने प्रत्येक क्षेत्रातील प्रत्येकाला होत असल्याची  प्रत्येक जण  खुल्या दिल्याने कबूली देताना दिसून येत आहे. दिवाळी तोंडावर असताना निवडणुका जाहीर झालेल्या असताना कोपरगाव मतदार संघातील शांतता सर्वकाही सांगून जाते.  खऱ्या अर्थाने निवडणुकीत कोल्हे नसणे याची  खंत मतदार संघातील सामान्य पासून  राजकीय जाणकारापर्यंत सर्वांच्या बोलण्यातून दिसून येते.  भाजपाकडून ज्या पद्धतीने कोल्हे यांना थांबविण्यात आले अवघ्या आठशे मतांनी पराभूत झाल्यानंतर केवळ सत्तेच्या राजकीय तडजोडीमुळे कोल्हे यांना उमेदवारी नाकारून त्यांच्यावर अन्याय केल्याची भावना कोपरगाव मतदार संघातील प्रत्येकाच्या मनात निर्माण झाली आहे. यामुळे कोपरगाव मतदार संघातील स्वकीय असो की   विरोधक प्रत्येकाच्या मनात कोल्हे यांच्या बद्दल प्रचंड सहानुभूती निर्माण झाली असून कुठेतरी भाजप बद्दल तीव्र नाराजी दिसून येत आहे. कोल्हे यांच्यावर झालेल्या अन्यायाचे व  कोल्हे समर्थकांच्या नाराजीचे पडसाद नक्कीच येवला, वैजापूर, राहता, शिर्डी या कोपरगाव मतदार संघाच्या आसपासच्या चार-पाच विधानसभा मतदारसंघात दिसून येतील. असे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे. कोल्हेंनी बंडखोरी करून कोणत्याही पक्षातून उमेदवारी घेतली असती तर ते कदाचित निवडून देखील आले असते परंतु त्यांनी तसे न करता पक्षाच्या आदेशाला शिरसावंद्य मानून राजकीय अस्तित्वाची पर्वा न करता थांबण्याचा कठोर निर्णय घेतला याची पक्षाला नक्कीच दखल घ्यावी लागेल  अशा भावना पुढे कोल्हे समर्थकांनी व्यक्त केल्या.

Leave a Reply

You cannot copy content of this page