कोरोना : कोपरगावात रविवारी १०१ चाचण्या १८ नव्या रुग्णांचा समावेश

कोरोना : कोपरगावात रविवारी १०१ चाचण्या, १८ नव्या रुग्णांचा समावेश

कोपरगाव कोविड सेंटर कोरोनाग्रस्त १३५ , कोरोनामुक्त ४६ तर ८९ ॲक्टीव रुग्ण

वृत्तवेध ऑनलाईन।2Augast 2020,
By: Rajendra Salkar,17.45

कोपरगाव : रविवारी दुपारी १०१ जणांच्या नमुन्याची रॅपिड अ‍ॅण्टिजेन चाचणी केली. यात १८ नवे ऍक्टिव्ह रुग्ण आढळून आले, तर ८३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
१८ पॉझिटिव्ह रुग्णात : टिळेकर वस्ती २ ,संजीवनी २ ,संजय नगर २ , सुभाष नगर १, बैलबाजार रोड ४ ,मंजूर ३, महादेव नगर १, टिळक नगर १, शंकर नगर १, धारणगाव १ यांचा समावेश असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा फुलसौंदर यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती देताना डॉ. फुलसौंदर म्हणाले, शनिवारी  (२ ऑगस्ट) रोजी सकाळी कोपरगाव येथे १०१ जणांचे नमुने रॅपिड अ‍ॅण्टिजेन चाचणी द्वारे तपासण्यात आले यात १८ एॅक्टिव रुग्ण आढळून आले तर उर्वरित ८३ अहवाल निगेटिव्ह आले असे त्यांनी सांगितले.

तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाटे कोपरगाव ग्रामीण वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा फुलसौंदर विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे (आव्हाड) रुग्णांवर लक्ष ठेवून आहेत. दरम्यान लोकांनी काम असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहनही आरोग्य प्रशासनाने केले आहे. नागरिकांनी प्रशासनाने सांगितलेले नियम पाळून, स्वतःची काळजी घेणे आता गरजेचे बनले आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page