स्वतःच्या जीवाची पर्वा न करता दिला मदतीचा हात
या कोरोना योद्ध्याला आमचा सलाम !
वृत्तवेध ऑनलाईन।2Augast 2020,
By: Rajendra Salkar,18:16
कोपरगाव : तुळजापुर येथील तुळजाभवानी मंदिराचे भक्तनिवास मध्ये काॅरंटाईन केलेल्या महिलेला अखिल गुरव समाज संघटना महाराष्ट्र राज्याचे युवक कार्यकारी अध्यक्ष सचिन धारुरकर यांनी कोरोना संकटात मदतीचा हात दिला आहे.
कोरोना सारख्या भयानक काळात
पंढरपूर येथील समाज बांधवांचे अणदुर येथील नातेवाईक महिलेला तुळजापुर येथील तुळजाभवानी मंदिराचे भक्तनिवास मध्ये काॅरंटाईन करण्यात आले आहे या महिलेला काही वस्तू लागत होत्या. त्यांना मदतीची गरज होती पण तिथे ओळखीचे जवळपास असे कुणीही नव्हते. त्यांनी आपल्या पंढरपूरच्या नातेवाईकांशी संपर्क साधला व त्यांना आपली अडचण सांगितली. त्या नातेवाईकांनी त्यांना जाणे शक्य नसल्याने त्यांनी मदत पोचविण्याचा जबाबदारी उस्मानाबाद येथे असलेले गुरव समाजाचे युवक कार्यकारी अध्यक्ष सचिन धारूरकर यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संवाद साधून कानावर घातली.
सचिन धारूरकर यांनी माहिती मिळताच भर पावसात जिवाची पर्वा न करता तातडीने उस्मानाबाद येथे जाऊन सदर महिलेला हव्या त्या वस्तू पदरमोड करून पोहोच केल्या. पंढरपूरचे नातेवाईकांनी भारुडकर यांना दोन हजार रुपये पाठवले पण धारूरकर यांनी धारूरकर यांनी खर्च झालेले अकराशे रुपये घेऊन ९००) रुपये परत पाठवून दिले.
माणसाच्या मनात श्रद्धा असेल, डोळ्यात स्वप्ने असतील, स्वीकारलेले काम प्रामाणिकपणे पूर्ण करण्याची सचोटी त्यांच्याकडे असेल आणि या सगळ्याच्या मुळाशी निरपेक्ष समाजसेवेची ऊर्मी असेल, तर आपण चमत्कार घडवू शकतो.. असाच एक चमत्कार ‘लॉकडाउन’मध्ये घडला आहे. संकटकाळात सापडलेल्या समाज भगिनीसाठी माणुसकीने हात पुढे केला आहे.