चांदेकसारे गोसावी समाजाच्या स्मशान भूमीचा प्रश्र सुटला.
संरक्षण भिंत टाकत वृक्षारोपण केले.
वृत्तवेध ऑनलाईन।2Augast 2020,
By: Rajendra Salkar,18:26
कोपरगाव : तालुक्यातील चांदेकसारे येथे अनेक पिढ्या प्रलंबित असलेल्या गोसावी समाजाच्या स्मशानभूमीचा प्रश्न गावातील ज्येष्ठ ग्रामस्थ व गोसावी समाजातील जाणत्या मंडळींच्या मध्यस्थीने सुटला. श्री भैरवनाथ जोगेश्वरी देवस्थान ट्रस्टच्या वतीने स्मशानभुमीला संरक्षण भिंत टाकत तिथे वृक्षारोपणही करण्यात आले.
यावेळी माजी उपसरपंच अशोक होन,उपसरपंच विजय होन, डॉ गोरक्षनाथ रोकडे, ट्रस्टचे अध्यक्ष मधुकर होन, खजिनदार सचिन होन, सचिव दादासाहेब होन ,किरण होन, राहुल होन , माजी सरपंच मतीन शेख, मच्छिंद्र खरे, नारायण खरे,जना खरे,गणेश होन, आबासाहेब होन, शरद होन, राजू होन, विलास चव्हाण, सुधाकर होन ,सतीश चव्हाण, विलास चव्हाण, शांतीलाल पवार, बाळासाहेब गुजर, प्रवीण होन, अशोक होन ,मधुकर होन,सुनील होन,रवी खरात ,आरूण खरात,रवींद्र खरात,चांदेकसारे येथे बाल भैरवनाथ जोगेश्वरी मंदिराच्या बाजूला गोसावी समाजाची स्मशान भूमी होती. दोन तिन पिढ्यांपासून गोसावी समाजाचा व मंदिर ट्रस्ट स्मशान भूमीसाठी इतरत्र जागा हलविण्यासाठी चर्चा चालू होती. मात्र योग्य तोडगा निघत नसल्याने हा प्रश्न प्रलंबित राहिला होता.
नव्यानेच मंदिर ट्रस्टवर श्रीराम रतन पंचायतन आश्रम ट्रस्टची नियुक्ती झाली.व त्यांनी आपल्या दोन वर्षांच्या कार्यकाळात गावातील ज्येष्ठ ग्रामस्थ व गोसावी समाजातील जानत्या लोकांची बैठक लावत हा गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला प्रश्न सोडवला.माजी उपसरपंच अशोक होन यांनी ग्रामपंचायत चांदेकसारेच्या ग्रामसभेत सर्वानुमते स्मशानभूमीसाठी पाच गुंठे जागाही उपलब्ध करून देण्यात आली मग श्री राम रतन पंचायतन आश्रम ट्रस्टने उपलब्ध करून दिलेल्या स्मशानभुमीच्या जागेला वॉल कंपाऊंड करून दिले. भैरवनाथ जोगेश्वरी युवा प्रतिष्ठानच्यावतीने गावातील हिंदू ,मुस्लिम ,दलित व गोसावी समाजातील चारही स्मशानभूमीसाठी सहा महिने ते दोन वर्षे वयोगटातील झाडे खरेदी करत स्मशानभूमी मध्ये वृक्षारोपण करण्यात आले. भैरवनाथ युवा प्रतिष्ठानच्या तरूनांनी घेतलेला हा निर्णय खूप महत्त्वाचा असल्याचे मत अध्यक्ष मधुकर होन यांनी व्यक्त केले. सूत्रसंचालन सुधाकर होन यांनी केले तर आभार विलास चव्हाण यांनी मानले.