219 कोपरगाव विधानसभा मतदार संघात पहिल्या दोन तासात 6.56 टक्के मतदान झाले
6.56 percent voting was recorded in the first two hours in 219 Kopargaon assembly constituency.
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन!Wed20 Nov 10.00 Am.By सालकर राजेंद्र
कोपरगाव: 219 विधानसभा मतदारसंघात अनेक मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगाच्या रांगा लागल्या आहेत. पहिल्या दोन तासात 272 बुथवर 19006 (6.56%) झाले असून यात पुरुष 12596 तर श्री 6410 इतर शून्य असे मतदान झाले आहे अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सायली सोळंके व सहाय्यक निवडणूक अधिकारी महेश सावंत यांनी दिली आहे
आ. आशुतोष काळे, माजी आमदार अशोक काळे, सौ.पुष्पाताई काळे, सौ. चैताली काळे, अभिषेक काळे या काळे परिवाराने माहेगाव देशमुख येथील 161 या मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला.
तर सौ. माई कोल्हे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, बिपिनदादा कोल्हे, विवेक कोल्हे, सौ. रेणुका कोल्हे, ईशान कोल्हे, सौ.
नितीनदादा कोल्हे, सौ.कलावतीताई कोल्हे, अमित कोल्हे, सौ.मनाली कोल्हे, सुमित कोल्हे, सौ. यांनी कोल्हे वस्ती येसगाव येथील 47 या मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. तर
महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप वर्पे, सौ. संगीता वर्पे. समीर वर्पे,सौ. समिक्षा वर्पे, त्यांच्या आई प्रमिला व वडिल गोरक्षनाथ वर्पे यांनी देखील कोपरगाव शहरातील कन्या विद्यामंदिर 129 या मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला आहे.
तर अपक्ष उमेदवार संजय काळे व सौ. काळे यांनी नऊचारी संवत्सर येथील 81 या मतदान केंद्रावर क्रमांकावर आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.
महाराष्ट्रात २८८ विधानसभा मतदारसंघासाठी आज २० नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली आहे. पहिल्या दोन तासात हजार सहा 6.56% इतके मतदान झाले असून कोपरगाव विधानसभेच्या एका जागेसाठी 12 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून या सर्व उमेदवारांचं भवितव्य आज मतपेटीत बंद होणार आहे. मतदानाची प्रक्रिया ६ वाजेपर्यंत चालणार आहे . तर निवडणुकीचे निकाल हे २३ नोव्हेंबर रोजी लागणार आहे. त्यामुळे राज्यात महायुती की महाविकास आघाडी बाजी मारणार हे या दिवशी स्पष्ट होणार आहे.
राज्यात गेल्या महिनाभरापासून राज्यात प्रचाराचा धुरळा उडाला होता. प्रचार संपल्यानंतर देखील आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत. सत्ता आपल्या ताब्यात राहावी यासाठी सर्वजण झटत आहेत.