पाच वाजेपर्यंत एक लाख ९० हजार ५८८ (६५•८०%) मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला

पाच वाजेपर्यंत एक लाख ९० हजार ५८८ (६५•८०%) मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला

As of 5 pm, 190,588 (65•80%) voters had cast their votes

कोपरगाव विधानसभा मतदारसंघात या नेत्यांनी मतदान केंद्रावर, बजावला मतदानाचा अधिकार.

कोपरगावात मतदार संघात सकाळच्या टप्यात मतदानाला अल्प प्रतिसाद; वाचा पहिल्या आठ तासात किती मतदान?

तीन वाजेपर्यंत एक लाख १५१ हजार ७३८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन!Wed20 Nov 3.30 Pm.By  सालकर राजेंद्र 

कोपरगाव: कोपरगाव विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला सकाळी ७ वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. यावेळी विविध नेत्यांनी उमेदवारांनी मतदानाचा हक्क बजावला.  त्यांनी सकाळी सकाळी   घरातून बाहेर पडत मतदान करून मतदानाचा हक्क बजावला आहे.

आ. आशुतोष काळे, माजी आमदार अशोक काळे, सौ.पुष्पाताई काळे, सौ. चैताली काळे, अभिषेक काळे या काळे परिवाराने माहेगाव  देशमुख येथील १६१ या मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला.

तर सौ. माई कोल्हे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे,  बिपिनदादा कोल्हे, विवेक कोल्हे, सौ. रेणुका कोल्हे,  ईशान कोल्हे, सौ.श्रध्दा कोल्हे, नितीनदादा कोल्हे, सौ.कलावतीताई कोल्हे, अमित कोल्हे, सौ.मनाली कोल्हे, सुमित कोल्हे, सौ. निकीता कोल्हे यांनी  कोल्हे वस्ती येसगाव   येथील ४७ या मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. तर

महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप वर्पे, सौ. संगीता वर्पे. समीर वर्पे,सौ. समिक्षा वर्पे, त्यांच्या आई प्रमिला व वडिल गोरक्षनाथ वर्पे यांनी देखील कोपरगाव शहरातील कन्या विद्यामंदिर १२९ या मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला आहे.

तर अपक्ष उमेदवार संजय काळे व सौ. माधुरी काळे यांनी नऊचारी संवत्सर येथील ८१ या मतदान केंद्रावर क्रमांकावर आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.

कोपरगाव विधानसभा मतदारसंघात पहिल्या टप्प्यात अल्पसा प्रतिसाद मिळत होता नंतर सातत्याने त्यात टप्प्याटप्प्याने वाढ होत गेली. या मतदारसंघात दोन्ही राष्ट्रवादीत लढत होत आहे पहिल्या चार तासात सकाळी ११ वाजेपर्यंत २१.१% मतदान झाले आहे यात पुरुष ३६२५८ तर महिला २५००१ व इतर एक असे एकूण ६१२६० इतके मतदान झाले होते. दुपारी एक वाजेपर्यंत ३६.९६ % मतदान झाले होते एकूण मतदान एक लाख ७ हजार ५१ यात पुरुष ५८ हजार ३८० तर महिला ४८ हजार ६७० यांनी मतदानाचा हक्क बजावला होता  दुपारी तीन वाजेपर्यंत वाजेपर्यंत ५२•३९.% मतदान झाले आहे यात पुरुष ७८६७९ तर महिला ७३०५७ व इतर २ असे एकूण १५१७३८ इतके मतदान झाले होते

सायंकाळी पाच वाजेपर्यंत वाजेपर्यंत ६५•८०% मतदान झाले आहे यात पुरुष ९७४२३ तर महिला ९३१६२ व इतर ३ असे एकूण १९०५८८ इतके मतदान झाले होते

कोपरगाव शहर हा झोपडपट्टी बहुल भाग असल्याने दुपारनंतर मतदानाला गर्दी होऊ लागली होती.

कोपरगाव विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे आमदार आशुतोष काळे आणि राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या संदीप बर्पे  यांच्यात लढत होणार आहे. एकूण १२ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. कोपरगाव विधानसभा मतदारसंघ संमिश्र लोकवस्तीचा आहे.  या मतदारसंघाची  निर्मिती झाली. तेव्हापासून या मतदारसंघात बहुतेक वेळा  काळे-कोल्हे अशीच लढत राहिलेली आहे. मात्र १९९५ पासून या मतदारसंघात शिवसेनेने कडवी झुंज दिलेली आहे तर २००४ आणि २००९ या दोन्ही वेळेस शिवसेनेने बाजी मारली होती. तर २०१४ या निवडणुकीत भाजपच्या स्नेहलता कोल्हे विजयी झाल्या होत्या. त्यांना तेव्हाही शिवसेनेचा हातभार लागला होता त्यानंतर २०१९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आशुतोष काळे हे विजयी झाले होते त्यांना देखील शिवसेनेनेच टेकू दिला होता.  २०२४ मध्ये दोन्ही राष्ट्रवादी  काँग्रेस एकमेकांसमोर उभे टाकलेले आहेत एकेकाळी शिवसेनेच्या बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व झाले आहे महायुतीत ही जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आशुतोष काळे यांना गेली.तर राष्ट्रवादी काँग्रेसची जागा म्हणून महाविकास  आघाडीतून या जागेवर  राष्ट्रवादी शरद पवार गटाने आपला दावा करून ही जागा मिळविल्याने   संदीप वर्पे यांना उमेदवारी मिळाली आहे. आज पर्यंत कोपरगाव मतदार संघात तुल्यबळ लढती या काळे कोल्हे यांच्यात झालेल्या आहेत त्यामुळे कोपरगाव विधानसभा मतदारसंघ म्हटले की पक्ष कुठलाही असो आजपर्यंत हा मतदार संघ काळे कोल्हे यांचा म्हणूनच ओळखला जात होता यावेळी कोल्हे यांची उमेदवारी नसल्याने महायुतीचे उमेदवार म्हणून आमदार आशुतोष काळे हे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून उमेदवार आहेत.  दोन्ही उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत महायुती असल्याने कोल्हे व त्यांच्या कार्यकर्त्यांची एक गठ्ठा मतदान आपल्यालाच मिळणार असल्याचा विश्वास आशुतोष काळे यांना आहे तर उद्धव ठाकरे शिवसेनेसह अल्पसंख्यांक व कोल्हे समर्थकांचीही  मते आपल्याला पडतील असा विश्वास संदीप वर्पे यांना वाटतो आता कोपरगाव मतदार संघातील मतदार नेमके कोणाला झुकते माप देतात व आपले मत  कोणाच्या पारड्यात  टाकणार किंवा मतदान रूपाने कोणाच्या पाठीशी राहणार , यावर भविष्यातील बरीच गणिते अवलंबून असतील. या मतदारसंघात शहरातील बहुतांशी भाग झोपडपट्टीबहुल  असून हा मतदार निर्णायक ठरणार आहे. दोन लाख ८९  हजार ६५६ एकूण मतदार असून यात पुरुष एक लाख ४६ हजार ३३७ तर महिला मतदार एक लाख ४३ हजार ३१३ व इतर ३४ इतके मतदान आहे.

 महाराष्ट्रात २८८ विधानसभा मतदारसंघासाठी आज २० नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली  आहे.  कोपरगाव विधानसभेच्या एका जागेसाठी 12  उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून या सर्व उमेदवारांचं भवितव्य आज मतपेटीत बंद होणार आहे. मतदानाची प्रक्रिया ६ वाजेपर्यंत चालणार आहे . तर निवडणुकीचे निकाल हे २३ नोव्हेंबर रोजी लागणार आहे. त्यामुळे राज्यात महायुती की महाविकास आघाडी बाजी मारणार हे या दिवशी स्पष्ट होणार आहे.

 

Leave a Reply

You cannot copy content of this page