गुणवत्तापूर्ण शिक्षण, मार्गदर्शन व कष्ट यातुन यशाचा मार्ग सुखकर होतो – शंकरराव कोल्हे

गुणवत्तापूर्ण शिक्षण, मार्गदर्शन व कष्ट यातुन यशाचा मार्ग सुखकर होतो – शंकरराव कोल्हे

संजीवनी  उत्तीर्ण विद्यार्थी गौरव सोहळा

वृत्तवेध ऑनलाईन।3Augast 2020,
By: Rajendra Salkar,17.53

कोपरगाव : गुणवत्तापूर्ण शिक्षण, योग्य मार्गदर्शन व विद्यार्थ्यांची कष्टाची तयारी यामुळे यशाचा मार्ग सुखकर होत असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांनी इंग्लिश मीडियम स्कूलच्या ऊतीर्ण विद्यार्थी गौरव सोहळ्यात केले. शिक्षण घेतांना ज्यांनी कष्ट घेतले, ते विदयार्थी आज विविध ठिकाणी उच्च पदावर काम करत आहे, त्यांचे आयुष्य नक्कीच उज्ज्वल झाले आहे असेही त्यांनी सांगितले,यावेळी संस्थेच्या व्यवस्थापकीय समिती सदस्या सौ. रेणुका विवेक कोल्हे उपस्थित होत्या.

शंकरराव कोल्हे म्हणाले, कोपरगाव सारख्या ग्रामीण भागातील विदयार्थांना चांगले शिक्षण मिळावे या उद्देशाने सुरू केलेल्या या शिक्षण संस्थेने अनेक विदयार्थी घडवले, आज राज्यातच नव्हे तर देशाच्या कानाकोप-यात आपल्या शाळेच्या विदयार्थी उच्च पदावर काम करीत आहे, ही गोष्ट आपल्यासाठी भूषणावह आहे.

प्रास्तविक करताना रेणुका कोल्हे म्हणाल्या, सामाजिक, राजकीय क्षेत्रात काम करताना माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून या भागात शैक्षणिक सुविधा निर्माण केल्या. त्यांच्या दूरदृष्टी तून उभी राहिलेली ही शिक्षण संस्था आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेने उत्कृष्ट निकालाची परंपरा या ही वर्षी जपली असल्याचे त्या म्हणाल्या.

यावेळी विदयालयात प्रथम आलेल्या कु. साक्षी मांजरे हिचे पालक संजय मांजरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, आजच्या धावपळीच्या जीवनात पालकांना मुलांसाठी वेळ देणे शक्य होत नाही, अशा परिस्थीतीत शाळेत पाल्याला योग्य मार्गदर्शन मिळाले तर विदयार्थी चांगल्या प्रकारे घडला जातो, संजीवनी इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये उत्तमप्रकारे मार्गदर्शन मिळाल्यामुळे कु साक्षी हे दैदिप्यमान यश मिळवू शकली असल्याचे सांगितले.
दहावीच्या परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देउन गौरव करण्यात आला. याप्रसंगी अकॕडमीक हेड हरीभाऊ नळे , प्राचार्य बाळासाहेब जाधव, विद्यार्थ्यांचे पालक व विदयार्थी यावेळी उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे सुञसंचालन छाया सुराळकर , सुमिञा भोसले यांनी केले तर आभार संस्थेचे प्राचार्य बाळासाहेब जाधव यांनी केले.

Leave a Reply

You cannot copy content of this page