त्यांचा तिरस्कार नव्हे त्यांच्यावर प्रेम करा –   ॲड. गौरव गुरसळ

त्यांचा तिरस्कार नव्हे त्यांच्यावर प्रेम करा –   ॲड. गौरव गुरसळ

भावा-बहिणीच्या नात्या पलीकडचे माणुसकीचे नाते

आगळ वेगळ रक्षाबंधन : मतिमंद मुलीने बांधली राखी,

वृत्तवेध ऑनलाईन।3Augast 2020,
By: Rajendra Salkar,19.10

कोपरगाव : त्यांचा तिरस्कार नव्हे त्यांच्यावर प्रेम करा, असा संदेश देत मतिमंद मुलीकडून राखी बांधून रक्षाबंधन साजरे करून कोपरगाव तालुका वकील संघाचे उपाध्यक्ष ॲड गौरव गुरसळ यांनी भावा-बहिणीच्या नात्या पलीकडचे माणुसकीचे नाते जपले. गेल्या पाच वर्षापासून याच प्रकारे आपले रक्षाबंधन साजरे करत आहेत.

एरवी मतिमंद माणसाकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन अत्यंत हीन झाला असून केवळ जीवणामध्ये चढ-उतार व एखाद्या घटनेचा धक्का बसून ही माणसे समाजापासून दूर गेलेली असतात. त्यांना आधार देण्याची गरज असते समाज त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. मात्र सालाबाद प्रमाणे जेथे कुठे मनोरुग्ण महिला आढळून आल्या की लगेच ॲड. गुरसळ यांचे कार्य सुरू होते.गेल्या पाच वर्षापासून रक्षाबंधन हा सण ते आपल्या कुटुंबाच्या सोबत मनोरुग्ण महिलांच्या हस्ते राखी बांधून घेत साजरा करतात.

काल सकाळीच त्यांनी मतिमंद मुलगी कल्याणी शिरसाठ (चिकी) ज्या ठिकाणी आहे ते ठिकाण गाठले. श्रीमती अरुणाताई मगर, दिपक केकाण,अनिरुद्ध गुरसळ, सायली गुरसळ ,अनिल गुरसळ यांना बरोबर घेत त्यांनी चिकीला वर्षभर पुरेल इतके कपडे दिले. मिठाई देत चिकीच्या गालावरचा आनंद त्यांच्या लक्षात आला. सोबत आणलेली राखी पुढे करत चिकिच्या हस्ते त्यांनी
व अनिरुद्ध गुरसळ यांनी राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले .

Leave a Reply

You cannot copy content of this page