कोपरगांव : येथील गोदावरी खोरे सहकारी दूध संघाचे जनसंपर्क अधिकारी व साहित्यिक राधाकिसन देवरे यांची नात कु. आदिती बाळासाहेब आसने हिने नुकत्याच झालेल्या १० वीच्या शालांत परीक्षेत लोणी येथील पद्मभुषण बाळासाहेब विखे पाटील यांच्या प्रवरा गर्लस् इंग्लिश मिडियम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात ९३.६० टक्के गुण मिळवून विशेष प्राविण्य मिळविले आहे.
आदिती हिला विद्यालयाच्या प्राचार्या संगीता देवकर, शेख, दिघे,गायकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. श्रीरामपूर तालुक्यातील माळवाडगांव येथील
बाळासाहेब मारुती आसने यांची आदिती ही कन्या आहे. तिच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतूक होत आहे.