सिंहस्थ कुंभमेळ्यात सावळीविहीर ते मालेगाव  रस्ता होणार; मंत्री गडकरींचे मानले आ.काळेंनी आभार

सिंहस्थ कुंभमेळ्यात सावळीविहीर ते मालेगाव  रस्ता होणार; मंत्री गडकरींचे मानले आ.काळेंनी आभार

Savalivihir to Malegaon road to be constructed at Simhastha Kumbh Mela; Thanks to Minister Gadkari

आ. आशुतोष काळे यांच्या सातत्याच्या प्रयत्नाने  दळणवळण होणार सुलभ; महामार्गाची जाणार दलिंद्री

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन!Wed 24Jun 16.30 P m.By  सालकर राजेंद्र 

कोपरगाव-  कुंभ मेळाव्याला अनुषंगाने आमदार आशुतोष काळे यांनी काही रस्त्यांची मागणी केली होती त्यांच्या मागणीची दखल घेत  केंद्र सरकारने विकास आराखड्यात कोपरगाव मतदारसंघातील सावळी विहीर-मनमाड-मालेगाव,घोटी-सिन्नर-वावी-शिर्डी या महत्वाच्या रस्त्यांचा समावेश केल्याबद्दल आमदार आशुतोष काळे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रसिद्धी पत्रकातून जाहीर आभार व्यक्त केले आहेत.आ. आशुतोष काळे यांच्या सातत्याच्या प्रयत्नाने  दळणवळण होणार सुलभ होणार असून या रस्त्याची दलिंद्री  जाणार असल्याने नागरिकांकडून आमदारांचे ही  आभार

कोपरगाव मतदार संघातील महत्वाच्या असणाऱ्या बहुतांश रस्त्याला आ.आशुतोष काळे यांनी मागील पंचवार्षिक मध्ये मोठ्या प्रमाणात निधी आणल्यामुळे त्या रस्त्यांचा प्रश्न कायमचा निकाली निघणार असला तरी उर्वरित रस्त्यांसाठी मिळेल त्या योजनेतून रस्त्यांसाठी निधी मिळविण्याचा आ. आशुतोष काळे यांचा सातत्याने प्रयत्न सुरु असतो.पुढील वर्षी नसिक येथे होणाऱ्या कुंभ मेळाव्याला पराराज्यासह देश विदेशातून भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होणार असून त्या विकास आराखड्यात ‌  सावळी विहीर-मनमाड-मालेगाव,घोटी-सिनर-वावी-शिर्डी या महत्वाच्या रस्त्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे दळणवळणांच्या दृष्टीने कोपरगाव मतदार संघाला मोठा फायदा होणार आहे. त्याबद्दल आ. आशुतोष काळे यांनी कोपरगाव मतदार संघातील जनतेच्या वतीने केंद्रीय मंत्री ना.नितीन गडकरी यांचेसह राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजित पवार, उपमुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.शिवेंद्रसिंह राजे भोसले यांचे आभार मानले आहे.

कोपरगाव मतदारसंघातील या प्रमुख रस्त्यांचा समावेश करण्यात आल्या मुळे केवळ सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नव्हे, तर भविष्यातील वाहतूक सुलभता, पर्यटकांची वाढ, तसेच स्थानिक विकासाला मोठा हातभार लागणार आहे. या निर्णयामुळे कुंभमेळ्याच्या काळात नाशिककडे जाणाऱ्या भाविकांना व पर्यटकांना कोपरगावमार्गे सुकर व सुरक्षित प्रवासाची सुविधा मिळणार आहे. पूर्या पूर्वीचा नगर मनमाड महामार्ग सध्याचा सावळी विहीर ते मालेगाव या रस्त्यावर असलेली अनेक वर्षांची दलिंद्री जाणार असल्याने नागरिकांनी आ. आशुतोष काळे यांचे देखील आभार मानले आहे

चौकट
कोपरगावच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असून पुढील काळात देखील अशाच पद्धतीने मोठ्या प्रकल्पांची मंजुरी मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार – आ.आशुतोष काळे कोपरगाव विधानसभा

Leave a Reply

You cannot copy content of this page