समताची “वारकरी बँक” वारकऱ्यांच्या पैशाला देणार मोफत सुरक्षा आणि व्याजाचा लाभ
“Warkari Bank” of Equality Free security and interest benefits on the money of the workers
काका कोयटे यांच्या अभिनव कल्पनेचे राज्यपाल हरिभाऊ बागडे करून कौतुक
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन!Wed 24Jun 16.40 P m.By सालकर राजेंद्र
कोपरगाव: जिल्ह्यातील अग्रगण्य अश्या समता नागरी सहकारी पतसंस्थेने “वारकरी बँक’ या अभिनव संकल्पनेतून पंढरीच्या दिंडीच्या माध्यमातून पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या रकमेला मोफत सुरक्षा देण्याबरोबर व्याजाचा लाभही देण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष तथा समता पतसंस्थेचे चेअरमन काका कोयटे यांच्या या सेवाभावी अभिनव संकल्पनेचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी प्रत्यक्ष भेटीत कौतुक केले आहे.
सामाजिक भावनेतून काका कोयटे यांनी सातत्याने नवीन विचार समोर आणले आहेत याच अनुषंगाने सध्या पायी दिंडीतून मोठ्या प्रमाणावर वारकरी पंढरपूरला जात असतात त्यांच्याबरोबर प्रवासासाठी लागणारा पैसा असतो दिवसभर पायी चालल्यानंतर मुक्कामाच्या ठिकाणी रात्री थकल्याने गाढ झोप लागते अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या जवळ असलेल्या रकमेला सुरक्षा मिळणे आवश्यक आहे याचा विचार करून समता पतसंस्थेचे चेअरमन काका कोयटे यांनी वारकऱ्यांसाठी वारकरी बँक ही संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे
या संकल्पनेतून त्यांच्या जवळ असलेल्या रकमेला सुरक्षा देण्याबरोबरच या रकमेवर व्याज देणार असून ज्यावेळी वारकऱ्यांना आपल्या रकमेची गरज भासेल त्यावेळी त्यांना ती रक्कम व्याजासह देण्यात येणार आहे मात्र हे व्याज वार्षिक आठ टक्के दराने त्यांनी ठेवलेल्या दिवसानुसार देण्यात येणार आहे.
वारकरी बँक या संकल्पनेबाबत विचारले असता काका कोयटे यांनी सांगितले की परम पूज्य विष्णू महाराज केंद्रे यांनी वारकऱ्यांच्या वस्तू व पैशांची जबाबदारी कोणीतरी घ्यावी, असे आवाहन केले होते.या आवाहनाला प्रतिसाद देत समता पतसंस्थेने पंढरपूरच्या मार्गावर वारकऱ्यांना अत्यावश्यक वेळेस त्यांच्या जमा केलेल्या वस्तू आणि रक्कम दिली जाईल,वारकरी बँक’ उपक्रम आळंदीपासून पंढरपूरपर्यंत अखंड सुरु असून, दिंडी क्रमांक ४३ मध्ये सहभागी असलेल्या विष्णू महाराज केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम प्रभावीपणे राबविला जात आहे असेही कोयटे यांनी सांगितले.
वारकऱ्यांना ऊन, पाऊस व वाऱ्यापासून संरक्षण मिळावे म्हणून कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ आणि कोपरगाव तालुका किराणा मर्चंट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत रेनकोट वाटपाचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.या उपक्रमाची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष राजकुमार बंब, कार्याध्यक्ष सुधीर डागा, आणि उपाध्यक्ष चांगदेव शिरोडे यांनी दिली
वारकऱ्यांच्या वतीने वारकरी संप्रदायातील आदर्श व्यक्तीमत्त्व बाबासाहेब कापे यांनी समता पतसंस्था, कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ व तालुका किराणा मर्चंट असोसिएशन यांचे आभार मानले आहे.

काका कोयटे हे सातत्याने महाराष्ट्र राज्य फेडरेशन असेल समता पतसंस्था असेल कोपरगाव व्यापारी असोसिएशन असेल व्यापारी महासंघ या माध्यमातून वेगवेगळ्या नवनवीन कल्पनात्मक सामाजिक दायित्व पार पडत असतात गेल्या दोन चार दिवसापूर्वी माझी खासदार सदाशिव लोखंडे यांच्या निधीतील योग भवन सुरक्षेचे व सुशोभीकरणाची दायित्व स्वीकारले या त्यांच्या कार्यालय प्रभावित झालेल्या अथवा मलिक आत्मा मालिक संस्थेचे परमानंद महाराज यांनी वैश्विक योग संमेलन काका कोयटे यांनी करावे अशी अपेक्षा विश्वास व्यक्त केला संतांनी दाखविलेला हा विश्वास ही एक प्रकारे त्यांच्या कामाची पावतीच म्हणावी लागेल. वारकरी बँक संकल्पनेचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी प्रत्यक्ष भेटीत केलेले कौतुक काका कोयटे यांच्यासाठी निश्चितच सकारात्मक भावना निर्माण करणारी आणि त्यांना प्रोत्साहित करणारी आहे.





