स्व. माधवराव (आप्पा)  आढाव यांच्या पुतळ्याचे शनिवारी भूमिपूजन

स्व. माधवराव (आप्पा)  आढाव यांच्या पुतळ्याचे शनिवारी भूमिपूजन

Swa. Bhoomi Poojan of Madhavrao (Appa) Adhav’s statue on Saturday

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन Thu17July 18.40 Pm.By  सालकर राजेंद्र

कोपरगाव : थोर स्वातंत्र्य सेनानी कोपरगांव नगरीचे प्रथम लोकनियुक्त लोकप्रिय नगराध्यक्ष स्व. माधवराव (आप्पा) कचेश्वर पा. आढाव यांच्या पुतळ्याचा भूमिपूजन सोहळा जयंतीदिनी शनिवारी (१९) रोजी जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते, माजी मंत्री आण्णासाहेब  म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली व माजी आमदार अशोक काळे, संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, आमदार आशुतोष काळे, आमदार रमेश बोरनारे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे, सहकार महर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे चेअरमन विवेक कोल्हे, यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती संभाजी महाराज सर्कल येथील कृष्णाई बँक्वेट हॉलमध्ये होणार  असल्याची माहिती लक्ष्मी माधव प्रतिष्ठान ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष विजय गोरक्षनाथ आढाव  यांनी गुरुवारी (१९) रोजी बडदे व्यापारी संकुल कोपरगाव येथे  आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

शिवाजी रोड तरुण मंडळाचे माजी अध्यक्ष विकास आढाव, कोपरगाव नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष गणेश आढाव, गौतम बँकेचे माजी चेअरमन विजय आढाव, बाळासाहेब आढाव, रवींद्र आढाव, मंदार आढाव, अजय आढाव, विजय रावसाहेब आढाव, माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, ज्येष्ठ कवी राजेंद्र कोयटे, रिपाई आठवले गटाचे तालुकाध्यक्ष जितेंद्र रणशुर, मनसेचे उपजिल्हाध्यक्ष संतोष गंगवाल, राष्ट्रपती पुरस्कार विजेते येसगावचे माजी सरपंच बापूसाहेब सुराळकर व आढाव परिवारातील युवक उपस्थित होते.

Leave a Reply

You cannot copy content of this page