आमदार काळेंची झगडे फाटा ते वडगाव पान रस्त्याची दुरुस्ती करण्याची सभागृहात मागणी

आमदार काळेंची झगडे फाटा ते वडगाव पान रस्त्याची दुरुस्ती करण्याची सभागृहात मागणी

MLA Kale’s fights demand repair of Fata to Wadgaon Pan road in the House

राहिलेले सात कोटी द्या एकाच ठेकेदाराने तीन वेळा दुरुस्ती करूनही  रस्ता जैसे थे

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन Thu17July 21.00 Pm.By  सालकर राजेंद्र

कोपरगाव :  कोपरगाव तालुक्यातील झगडे फाटा ते वडगाव पान  ६५ राज्य मार्ग  मतदारसंघ तालुक्याच्या व मतदार संघाच्या दृष्टीने अतिशय वर्दळीचा व महत्त्वाचा मोठा रस्ता आहे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. वारंवार मागणी करूनदेखील या रस्त्यांच्या दुरवस्थेकडे दुर्लक्ष होत असल्याने आमदार आशुतोष काळे यांनी विधिमंडळ अधिवेशनात दुरुस्तीची मागणी करून सभागृहाचे लक्ष याकडे वेधले आहे.

राज्यमार्ग ६५ वरील झगडे फाटा-वडगाव पान फाटा रस्ता कोपरगाव मतदार संघातील दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा मार्ग आहे. या रस्त्यावर बाराही महिने मोठ्या प्रमाणात वाहनांची ये-जा असते. यामध्ये जड वाहतुकीचा देखील मोठ्या प्रमाणात समावेश असतो
कोपरगाव मतदार संघाच्या लगतच जगप्रसिद्ध शिर्डीचे श्री साईबाबा देवस्थान असून या ठिकाणी वर्षभर धार्मिक कार्यक्रम व उत्सव सुरु असतात. त्या उत्सवा वेळी शिर्डी संस्थानच्या सुरक्षेच्या दृष्टीने व देश विदेशातून येणाऱ्या साईभक्तांना या वाहतुकीचा त्रास होवू नये तसेच शिर्डी श्री साईबाबा मंदिर व साई भक्तांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने गेल्या सात आठ वर्षापासून सर्व प्रकारच्या वाहनांसाठी या मार्गाचा  वापर करण्यात येत आहे. क्षमतेपेक्षा अधिक वजनाची वाहने या रस्त्यांवरून रात्रंदिवस धावत असल्याने या सर्वच रस्त्यांची वाट लागली आहे.
या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आ.आशुतोष काळे यांनी पाठपुरावा केल्यामुळे राज्य शासनाने १७ कोटी निधी मंजूर करून त्यापैकी १० कोटी निधीतून या रस्त्यांची दुरुस्ती करण्यात आलेली होती.परंतु मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असल्यामुळे वारंवार दुरुस्ती करूनही हा रस्ता टिकत नाही. या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी एकाच ठेकेदाराला तीन-तीन वेळेस दुरुस्ती करण्याचे काम देण्यात आले आहे परंतु  अद्यापही रस्ता ‘जैसे थे” च आहे. याकडे आमदार आशुतोष काळे यांनी सभागृहाचे  लक्ष वेधले .
झगडे फाटा ते तळेगाव दिघे ह्या १७ किलोमीटरच्या रस्त्यापैकी साडे तीन किलोमीटर रस्ता तर खूपच खराब झाला असून खराब रस्त्यामुळे छोटे-मोठे अपघात होत आहे. या रस्त्याला देण्यात आलेल्या सतरा कोटी निधीपैकी शिल्लक असलेला सात कोटी निधी तातडीने देवून या रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी आ.आशुतोष काळे यांनी केली आहे.

केंद्रीय रस्ते विकास मंत्री ना. नितीन गडकरी यांच्याकडे  झगडे फाटा-वडगाव पान फाटा रस्ता (राज्य मार्ग ६५) ची दर्जोन्नती करुन हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरित करणे बाबत त्यांचा पाठपुरावा सुरु आहे. यावरच न थांबता या रस्त्याचा प्रश्न विधिमंडळ अधिवेशनात उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधून या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत घेतलेल्या भूमिकेचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.

चौकट :-  रस्त्याची दुरावस्था लक्षात यावी यासाठी  तात्कालीन आमदार अशोक काळे यांनी तात्कालीन जिल्हाधिकारी डॉ.संजीव कुमार व तात्कालीन पोलीस अधीक्षक कृष्णप्रकाश यांना आपल्या गाडीतून पुणतांबा फाटा ते झगडे फाटा या सात किलोमीटरच्या रस्त्याचा प्रवास घडवला होता. त्यावेळी रस्त्याची विदारक परिस्थिती जिल्हाधिकारी डॉक्टर संजीव कुमार यांच्या लक्षात आली आल्याने त्यांनी तातडीने या सात किलोमीटर रस्त्यासाठी  तब्बल १४ कोटी निधी मंजूर केला तेव्हा कुठे त्या रस्त्याची दारिद्र्यता संपली आहे 

Leave a Reply

You cannot copy content of this page