सहा पाणी योजना:अर्धवट कामावरून आ.काळे आक्रमक; अधिवेशनात औचित्याचा मुद्दा

सहा पाणी योजना:अर्धवट कामावरून आ.काळे आक्रमक; अधिवेशनात औचित्याचा मुद्दा

Six Water Scheme:At Half Work A. Kale Invaders; The issue of justification at the convention

त्या दोन ठेकेदारांना काळया यादीत टाका; नवे टेंडर, नवा ठेका द्या !

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन Fir18July 18.10 Pm.By  सालकर राजेंद्र 

कोपरगाव : कोपरगाव मतदार संघातील सहा पाणी योजनांच्या अर्धवट व निकृष्ट कामावरून आक्रमक झालेल्या आ. आशुतोष काळे यांनी पावसाळी अधिवेशनात औचित्याचा‌ मुद्दा उपस्थित करून कामाला विलंब केल्याबद्दल त्या दोन्ही ठेकेदारांना  नोटीस बजावून त्याच्यावर कारवाई करा, त्यांना काळ्या यादीत टाका,नवे टेंडर, नवा ठेका द्या, अशी मागणी केली.

सभागृहास माहिती देताना आमदार आशुतोष काळे म्हणाले की,जल जीवन मिशन योजने अंतर्गत‌ जयंती सुपर कन्स्ट्रक्शन प्रा.लि.मेहसाणा व सहज कन्स्ट्रक्शन इंडिया एल.एल.बी.प्रा.लि. या दोन कंपन्यांना तीन वर्षापूर्वी कोपरगांव मतदार संघातील धारणगाव, सुरेगाव,  शिंगणापूर, पिंपळवाडी-नपावाडी,मळेगाव थडी,मायगांव देवी या सहा पाणी पुरवठा योजनांची कामे तीन ते साडे पाच टक्के वाढीव दराने देण्यात येवून सदर योजनांची कामे जून २०२२ ते जुलै २०२४ या कालावधीत पूर्ण करण्याची अट होती. परंतु सदर कालावधीत काम पूर्ण न झाली नाहीत व झालेली  काम अर्धवट व निकृष्ट अवस्थेत होते. त्यामुळे संबंधित ठेकेदारांना जून २०२५ अखेर पर्यंत मुदतवाढ देखील देण्यात आली होती. परंतु वारंवार मुदतवाढ देवूनही आजतागायत या कंपन्या नागरिकांच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या पाणी योजनांची कामे पूर्ण करू शकल्या नाहीत, गेल्या तीन  वर्षांपासून ठेकेदाराच्या अनास्थेमुळे अर्धवट अवस्थेत आहेत. कासवगतीमुळे लोकांना मनस्ताप होतोय,मंजूर कामे ठेकेदार कंपन्या करीत नाहीत आणि याचा परिणाम शेतकऱ्यांवर होत आहे. त्यांना पाण्यापासून वंचित रहावे लागले आहे.या पाणी पुरवठा योजनांच्या कामाबाबत अनिश्चितता निर्माण होऊन गावातील नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यामुळे कामाला विलंब केल्याबद्दल त्या दोन्ही ठेकेदारांना  नोटीस बजावून त्याच्यावर कारवाई करा, त्यांना काळ्या यादीत टाका,नवे टेंडर, नवा ठेका द्या, अशी मागणी आमदार काळे यांनी  केली.

 चौकट

परंतु हे ठेकेदार त्यांना वरिष्ठ नेत्यांचा आशीर्वाद असल्याचे भासवत असून पाणी पुरवठा योजनांची कामे कितीही संथ गतीने केली तरी आपल्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई होणार नाही. याचा त्यांना आत्मविश्वास असल्यामुळे  या दोन कंपन्यांची  कामे रद्द करावीत.नव्याने टेंडर काढून या पाणी पुरवठा योजनांची कामे पूर्ण करावीत व या कंपन्यांना काळ्या यादीत टाकावे – आ. आशुतोष काळे 

 

Leave a Reply

You cannot copy content of this page