एक जबाबदार नागरिक म्हणून घडणारे समताचे विद्यार्थी आमच्यासाठी अभिमानास्पद – स्वाती कोयटे

एक जबाबदार नागरिक म्हणून घडणारे समताचे विद्यार्थी आमच्यासाठी अभिमानास्पद – स्वाती कोयटे

Students of equality who happen as a responsible citizen are proud of us – Swati Koite

लिओ क्लब ऑफ समता (अल्फा) चा ५५ वा पदग्रहण व शपथविधी सोहळा

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन Fir18July 18.20 Pm.By  सालकर राजेंद्र

कोपरगाव : विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण, सामाजिक भान आणि जबाबदारीची जाणीव निर्माण करण्याचा उद्देशाने लिओ क्लबच्या माध्यमातून एक जबाबदार नागरिक म्हणून घडणारे  समताचे विद्यार्थी आमच्यासाठी अत्यंत अभिमानास्पद असल्याचे गौरव उद्गार समता इंटरनॅशनल स्कूलच्या कार्यकारी विश्वस्त स्वाती कोयटे यांनी व्यक्त केले.

समता इंटरनॅशनल स्कूलचे नवनियुक्त  विद्यार्थी लिओ समर राजपूत  अध्यक्ष, लिओ तीर्थ समदाडिया उपाध्यक्ष, लिओ ईशान कोयटे  सचिव  लिओ सृष्टी वक्ते कोषाध्यक्ष यांच्या ५५ व्या पदग्रहण व शपथविधी  सोहळ्यात स्वाती कोयटे बोलत होत्या.

लायन्स क्लब ऑफ कोपरगाव आणि लिओ क्लब ऑफ समता (अल्फा) यांच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून एल. पी. एम. जे. एफ. लायन गिरीश मालपाणी, एम. जे. एफ. लायन रवींद्र गोलार आणि एम. जे. एफ. लायन संजय उबाळे उपस्थित होते. तसेच तुळसीदास खुबाणी, संदीप कोयटे, राजेश ठोळे, सुधीर डागा, संदीप रोहमारे, राम थोरे, सत्यम मुंदडा, आनंद ठोळे, सुरेश शिंदे, नरेंद्र कुरळेकर, सचिन भडकवाडे, पंकज ठोळे, भरत अजमेरा, सुमित भट्टड, प्रसाद भास्कर, शैलेश बनसोडे, आदित्य गुजराथी, जय बोरा, ओंकार भट्टड, कुशल कोठारी, पृथ्वी शिंदे यांच्यासह कोपरगाव, शिर्डी, राहाता आणि संगमनेर येथील लायन्स क्लब व लिओ क्लबचे अनेक पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

समता इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक काका कोयटे, कार्यकारी विश्वस्त सौ.स्वाती संदीप कोयटे, मुख्याध्यापक समीर अत्तार व शिक्षक वृंद यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

You cannot copy content of this page