आप्पांच्या कर्तुत्वाला साजेशे स्मारकस्थळ उभारा -जल संपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील 

आप्पांच्या कर्तुत्वाला साजेशे स्मारकस्थळ उभारा -जल संपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील 

Build a memorial Appa site befitting your achievements – Water Resources Minister Radhakrishna Vikhe Patil

कोपरगावच्या पाणी प्रश्नाचे प्रश्न मुद्दे सोडवू नामदार विखे

Namdar Vikhe will solve the issues of Kopargaon’s water problem

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन Sat19July 20.30 Pm.By  सालकर राजेंद्र 

कोपरगाव स्वातंत्र्य सेनानी स्वर्गीय माधवराव कचेश्वर पाटील आढाव यांचे कोपरगाव शहरासाठी योगदान पाहता त्यांच्या  विकासाच्या पाऊलखुणांचा विचार का झाला नाही? आज पर्यंत त्यांचं स्मारक का झाले नाही अशी खंत व्यक्त करताना माधव उद्यान येथील नियोजित स्मारक  पुढच्या अनेक पिढ्यांना  प्रेरणा आणि ऊर्जा देणारं  स्मारक चिरंतन स्मृती ठरावी पैशासाठी स्मारक संकुचित करू नका ते स्मारक माधवराव आप्पांच्या कर्तुत्वाला साजेशे असावं, यासाठी फार प्रश्न उपस्थित न करता दायित्व समजून नगरपालिकेने हे काम करावे अडचण राहणार नाही याबाबत प्रांताधिकारी व जिल्हाधिकारी यांना देखील सूचना दिल्या असल्याचे  प्रतिपादन जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. अध्यक्षस्थानी माजी पाटबंधारे मंत्री अण्णासाहेब म्हस्के हे होते.

लक्ष्मी माधव प्रतिष्ठानच्यावतीने शनिवारी २०  रोजी दुपारी ४ वाजता  स्व. माधवराव कचेश्वर  पा. आढाव  यांचा १०७ व्या जयंती उत्सव निमित्ताने माधव बाग येथे पुतळ्याचे भूमिपूजन व लक्ष्मीनगर कमान उद्घाटन सोहळा . जलसंपदा मंञी राधाकृष्ण विखे पाटील यांचे हस्ते संपन्न झाला.
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील पुढे म्हणाले कोपरगाव मध्ये नेत्यांची कमी नाही शंकरराव स्वर्गीय शंकरराव काळे स्वर्गीय शंकरराव कोल्हे स्वर्गीय के.बी. रोहमारे स्वर्गीय दादा शहाजी रोहमारे, मोहनराव गाडे, प्रेमजी काले, शांतीलाल लोहाडे, मिस्टर गिरमे अशा अनेक दिग्गज लोकांनी एकत्र येऊन विकासाची कामे केली आहेत. हे या शहराचे वेगळेपण आहे. सामाजिक कामापेक्षा व्यक्तिगत कामाला महत्त्व दिले जाते माधवराव आप्पा हे अजातशत्रू  व्यक्तिमत्व होते जनतेशी व्यक्तिगत जिव्हाळा साधत त्यांनी विकासाची मंदिरे उभी केली त्यातून स्नेह जोडला त्यांनी केलेली काही कामे अजूनही चिरंतन आहेत परिस्थिती आव्हाने असताना सुद्धा ते मागे हटले नाहीत  स्वतःचा उत्कर्ष व हितापेक्षा सर्वांगी ती सर्वांगीण हिताला त्यांनी प्राधान्य दिले जनतेला कुटुंब मानले कोपरगावकरांना कुटुंब मानले शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी काम केले आज समाजाला आत्मचिंतन व आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.  आप्पांचे यथोचित स्मारक व्हावे ही अनेक वर्षाची मागणी असताना आढाव कुटुंबीयांवर अन्याय झाला आहे. विजय आढाव  यांचे याबाबतीत मी खरोखर कौतुक करतो येत्या तीन-चार महिन्यात पुतळा उभा राहील अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली..
मंत्री राधाकृष्ण विखे म्हणाले की, आज जिकडे तिकडे स्वार्थ बळावला आहे आपल्या पलीकडे जाऊन विचार करण्याचे आपण विसरून गेलो आहोत आपली भागीदारी जात पंथ धर्म यात झाल्याने आपण ओळख हरवून बसलो आहे हे सर्व या वीस वर्षात पुढे आले आहे. गोदावरी कालवे, शेतीपाणी प्रश्न, निळवंडे चे पाणी या बिपिन कोल्हे यांनी मांडलेले मुद्दे विचारात असून नक्कीच यावर आपण काम पूर्ण करू अशी आश्वासन देखील त्यांनी यावेळी दिले.
अध्यक्षपदावरून बोलताना माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के म्हणाले स्वर्गीय माधवराव आप्पा यांनी या शहरासाठी केलेले काम पाहता मंत्री राधाकृष्ण विखे पाटील या ठिकाणी उपस्थित आहे हे पाहता लवकरच आप्पांचा भूषणावह असा पुतळा मानाने उभा राहील. अशी अपेक्षा व्यक्त केली.
आमदार रमेश बोरनारे यांनी स्वर्गीय माधवराव आप्पा यांच्या कार्याचा आढावा घेताना निश्चित त्यांचे स्मारक झाले पाहिजे परंतु या स्मारकाबरोबर त्यांच्यातील  एक टक्का गुण मला   आत्मसात करता आला तरी मी स्वतःला भाग्यवान समजेल अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या .
माजी आमदार अशोक काळे म्हणाले स्वर्गीय आप्पांचे नाव येताच त्यांचे कर्तुत्व डोळ्यासमोर उभे राहते आणि आपोआपच आपण नतमस्तक होतो एक दूरदृष्टी असलेला प्रामाणिक निस्वार्थी परोपकारी कार्याचा पाया त्यांनी घातला स्वर्गीय कर्मवीर शंकरराव काळे यांच्याबरोबर त्यांचे संबंध सामाजिक बांधिलकीचे होते काळे साहेबांच्या विचारावर आप्पांनी वाटचाल केली दूरदृष्टी, लोकहित, राजकीय सामाजिक कार्यात शब्द हे प्रमाण त्यांनी जपले विचाराशी त्यांनी कधी तडजोड केली नाही त्यामुळे आप्पांचे नाव हृदयात कोरले गेले पुढच्या पिढीला नक्कीच त्यांचे स्मारक मार्गदर्शक राहील असे अशा भावना व्यक्त केल्या.
बिपिन कोल्हे म्हणाले आप्पांनी शहरातील सामान्य नागरिकांसाठी स्वतःच्या मालकीची साडेतीन एकर जागा पत्नी लक्ष्मीबाई यांच्या नावाने निवासासाठी दिली आज त्या ठिकाणी लक्ष्मी नगर ही वसाहत उभी आहे आप्पाचे आणि शहरातील नागरिकांचे अतूट असे विश्वासाचे नाते होते  रस्त्यावरती काही न वाचता अगदी सहज ते सही शिक्का देत होते पालिकेच्या सामान्यातील सामान्य कर्मचाऱ्यांची नावानिशी ओळख त्यांना होती पालिकेच्या माध्यमातून त्यांनी मूलभूत सुविधांना प्राधान्य दिले  कोपरगावच्या पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न,  गोदावरी कालवे दुरुस्त व्हावे निळवंडे चे पाणी मिळावे हे अनेक नेत्यांनी अनेक वर्ष पाहिलेले स्वप्न आज पूर्ण करण्याची संधी  मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना मिळाली आहे ते सोडविण्याचं त्यांनी मला  सांगितले आहे.
काका कोयटे म्हणाले आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक आणि अध्यक्ष दोन्ही कोपरगावचे जावई आहेत कोपरगावच्या लेकी भाग्यवान आहेत त्यांच्या पावलाने तिकडे समृद्धी आणि समाधान घेउन आले आहे. आमदारापेक्षा  होणे सोपे परंतु नगरसेवक होणे अवघड असताना स्वर्गीय आप्पां ४४ वर्ष कोपरगाव नगरपालिकेचे नगरसेवक राहिले  तर तब्बल १४ वर्ष नगराध्यक्ष म्हणून त्यांनी काम करून विक्रम केला आप्पांचा पुतळा नव्हे तर स्मारक लोकसहभागातून व्हावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाची प्रास्ताविक लक्ष्मी माधव प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विजय गोरक्षनाथ आढाव यांनी केले. 
कार्यक्रमासाठी जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील माजी मंत्री अण्णासाहेब मस्के माजी  जिल्हा परिषद अध्यक्ष ना. शालिनीताई विखे पाटील सौ सुशीलाताई म्हस्के,आ. रमेश बोरनारे सर माजी आमदार अशोक काळे संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन कोल्हे, महानंदाचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बापू जाधव, गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे, महाराष्ट्र पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका  कोयटे, माजी नगराध्यक्ष पद्माकांत कुदळे, उद्योजक कैलासशेठ ठोळे, बीएसएनएलचे संचालक  रवीकाका बोरावके, कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक रोहमारे, संभाजी काळे, माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, दिलीप दारुणकर, उद्योजक मनोज शेठ अग्रवाल, गणेश आढाव, विकास आढाव, कृष्णा आढाव, बाळासाहेब आढाव, मंदार आढाव, विजय रावसाहेब आढाव, वैशाली आढाव, बाळासाहेब नरोडे यासह संपूर्ण आढाव परिवार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते 
सूत्रसंचालन राजेंद्र कोयटे व भावना गवांदे यांनी केले तर शेवटी आभार प्रसाद आढाव यांनी व्यक्त केले.
चौकट

कोपरगाव चे वैशिष्ट्य म्हणजे काळे कोल्हे यांनी कारखान्याच्या निवडणुका कायम बिनविरोध केल्या विशेष म्हणजे उसाचा भाव सुद्धा दोघांनी एकत्रच ठरवला असे आण्णासाहेब म्हस्के यांनी म्हणताच त्यावर व्यासपीठावर असलेल्या बिपिन कोल्हे यांनी तुम्ही पण‌ संगमनेर आणि प्रवरा ठरवताच की असे म्हणताच उपस्थितांमध्ये मोठा हशा पिकला ..

 

 

 
 
 

Leave a Reply

You cannot copy content of this page