उस्मानाबाद : संत काशिबा महाराज यांचे एमआयडीसी चौक व उड्डाणपूलास नाव

उस्मानाबाद : संत काशिबा महाराज यांचे एमआयडीसी चौक व उड्डाणपूलास नाव

जय गुरव…जय काशिबा महाराज…हर हर महादेव.. गजरात लोकार्पण सोहळा संपन्न

संत काशिबा महाराज नामकरण लोकार्पण सोहळा उस्मानाबाद

वृत्तवेध ऑनलाईन।4 Augast 2020,
By: Rajendra Salkar,12.30

कोपरगाव : उस्मानाबाद येथील एमआयडीसी चौक व उड्डाणपूलाला संत काशिबा महाराज नामकरण करण्याचा ठराव नगरपालिकेने केला होता. त्या अनुषंगाने सोमवारी (३ ऑगस्ट) रोजी संत काशिबा महाराज नामफलकाचे अनावरण आमदार राणाजगजितसिंह पाटील व लोकार्पण खासदार ओम राजे निंबाळकर हस्ते संपन्न झाले.

यावेळी जि.प.अध्यक्ष अस्मिता कांबळे, आ.कैलास पाटील, नगराध्यक्ष मकरंद राजे निंबाळकर,भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे, राजाभाऊ शेरखाने आदि हजर होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विधिज्ञ पंडितराव नळेगावकर होते. याप्रसंगी उपनगराध्यक्ष अभय इंगळे, उद्योजक बाळासाहेब क्षिरसागर, लघुउद्योग भारतीचे संतोष शेटे,प्रवीण काळे,संभुदेव खटिंग, बांधकाम सभापती तथा गटनेते युवराज नळे, शिवसेनेचे गटनेते सोमनाथ गुरव, नगरसेवक सिध्देश्वर कोळी,योगेश जाधव,अक्षय ढोबळे,सिध्दार्थ बनसोडे, शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे संस्थापक विष्णू इंगळे,युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस उमेश राजे निंबाळकर, तुषार निंबाळकर, देवानंद येडके,बापू शेळके,लक्ष्मण माने,रंगनाथ गुरव,प्रीतम मुंडे ,संदीप इंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी  ॲड पंडितराव नळेगावकर, , भालचंद्र धारुरकर,गोपाळ नळेगावकर, श्रीनिवास पाटील,प्रभाकर कदम,मोहन पाटील,ॲड.प्रशांत खंडाळकर,सुनील तिर्थकर, महेश मोटे,प्रमोद बचाटे,सचिन धारुरकर,ॲड.अतुल पाटील यांनी सर्व मान्यवरांचा यथोचित सत्कार केला.

तसेच कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रदिप मोकाशे यांनी तर आभार प्रदर्शन केशव पाटील यांनी केले.

Leave a Reply

You cannot copy content of this page