महिलांनी आपल्या आरोग्याबाबत जागरूक झाल्या, हे आमच्यासाठी मोठं यश – सौ स्वाती कोयटे

महिलांनी आपल्या आरोग्याबाबत जागरूक झाल्या, हे आमच्यासाठी मोठं यश – सौ स्वाती कोयटे

Women becoming aware of their health is a big success for us – Mrs. Swati Koyte

सखी सर्कल’चे मोफत कॅन्सर तपासणी शिबिर

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन Sun20July 20.40 Pm.By  सालकर राजेंद्र

कोपरगाव : सखी सर्कल संस्थेच्या माध्यमातून  परिसरातील महिलांच्या हितासाठी समाजोपयोगी, आरोग्यदायी व शैक्षणिक या उपक्रमायाद्वारे वेळोवेळी जनजागृती घडवून आणली. आजच्या कॅन्सर तपासणीच्या शिबिरास  महिलांचा उदंड प्रतिसाद पाहता त्या आपल्या आरोग्याबाबत जागरूक झाल्या हे आमच्यासाठी मोठे यश असल्याच्या गौरव युक्त ‌भावना सखी सर्कल संस्थेच्या अध्यक्ष सौ. स्वाती कोयटे यांनी व्यक्त केल्या.

रविवारी (२०) रोजी शहराच्या गोकुळ नगरीतील समता टायनी टॉट्स स्कूलमध्ये कॅन्सर तपासणी शिबिरात स्वाती कोयटे बोलत होत्या.
यावेळी सखी सर्कल’च्या   सिमरन खुबाणी, सौ.शालिनी खुबाणी यांची प्रमुख उपस्थिती होती.

  स्वाती कोयटे पुढे म्हणाल्या”स्त्री आरोग्य ही समाजाच्या आरोग्याची खरी शिडी आहे. प्रत्येक स्त्रीने वेळेवर पाऊल उचलून कॅन्सरसारख्या तपासण्या करून स्वतःला जपणं गरजेचं आहे. आमच्या घरामध्ये मदतनीस म्हणून काम करणाऱ्या महिलांमध्ये  कॅन्सर बाबत जनजागृती निर्माण व्हावी, तसेच महिलांना त्यांच्या आरोग्याची नियमित तपासणी करण्याची सवय लागावी, या उद्देशाने शिबिराचे आयोजन करण्यात यापुढेही संस्थेचे काम दीपस्तंभाप्रमाणे सुरूच राहील असे आश्वासन देखील त्यांनी दिले.

या शिबिरात शिर्डी येथील प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सई देशमुख, तसेच कोपरगावातील डॉ. रोशनी आढाव, डॉ. आस्था तिरमखे, डॉ. मेघा गोंधळी, डॉ. दिपाली आचार्य या तज्ज्ञ डॉक्टरांनी महिलांची तपासणी केली. तपासणी करताना डॉक्टरांनी महिलांना कॅन्सर या रोगाची लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाय, व नियमित तपासणीचे महत्त्व याविषयी सखोल मार्गदर्शन केले.‌या शिबिरात विविध वयोगटातील  ४५ महिलांनी सहभाग नोंदवला, 

चौकट

, “आमच्यासाठी ही तपासणी मोफत उपलब्ध करून दिली, यामुळे आम्हाला आमच्या आरोग्याबाबत जागरूकता आली आणि एका गंभीर आजाराबद्दल महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. सातत्याने विविध उपक्रम राबवून महिला म्हणून आमच्यात आत्मविश्वास निर्माण केला याबद्दल सखी सर्कल संस्थेचे आम्ही आभार मानतो- “सविता शिंदे मदतनीस

Leave a Reply

You cannot copy content of this page