आज २२ जुलैपासून भाजपच्या वतीने नेत्र रुग्णांची होणार मोफत तपासणी व शस्त्रक्रिया

आज २२ जुलैपासून भाजपच्या वतीने नेत्र रुग्णांची होणार मोफत तपासणी व शस्त्रक्रिया

BJP to conduct free eye check-ups and surgeries for eye patients from today, July 22

निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस : मा. आ. स्नेहलता कोल्हेंच्या संकल्पनेतून चार गावात  विशेष शिबिर

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन Mon21July 20.00 Pm.By  सालकर राजेंद्र 

कोपरगाव : वयाच्या विशिष्ट टप्प्यावर आल्यानंतर नागरिकांमध्ये मोतीबिंदू आजार होतो. रुग्णांना डोळ्यांनी अस्पष्ट दिसते, यामुळे दैनंदिन जीवनात नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या संकल्पनेतून  भारतीय जनता पार्टीच्या वतीने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

 कोपरगाव विधानसभा मतदारसंघ भारतीय जनता पार्टी व मनिशंकर आय हॉस्पिटल, नाशिक यांच्या  सहकार्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज मंगळवार दिनांक २२ जुलै रोजी सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत मारुती मंदिर दहेगाव बोलका या ठिकाणी मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले . तरी गरजू लाभार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी केले आहे.
माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या संकल्पनेतून व युवा नेते विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिराचे तालुक्यात विविध ठिकाणी सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत पुढील वेळापत्रकानुसार २२ जुलै (मंगळवार) – मारुती मंदिर, दहेगाव बोलका,२३ जुलै (बुधवार) – बाजारतळ, रवंदे,२४ जुलै (गुरुवार) – हनुमान मंदिर, रांजणगाव देशमुख२५ जुलै (शुक्रवार) – साईमंदिर परिसर, वाकडी येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले . शिबिरात येताना लाभार्थ्यांकडे आधार कार्ड आणि मोबाईल क्रमांक आवश्यक आहे. तपासणीसाठी व शस्त्रक्रियेसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून  कोपरगाव भारतीय जनता पार्टीच्या वतीने हा उपक्रम  राबविण्यात येत आहे. 

Leave a Reply

You cannot copy content of this page