निळवंडे कालव्यातून कोपरगाव मतदार संघातील बंधारे, तलाव भरून द्या आमदार काळे 

निळवंडे कालव्यातून कोपरगाव मतदार संघातील बंधारे, तलाव भरून द्या आमदार काळे 

MLA Kale should fill the dams and lakes in Kopargaon constituency from the Nilwande Canal

   दोन दिवसात पाणी येणार तळेगाव शाखा कार्यकारी अभियंता

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन Mon 21July 20.10 Pm.By  सालकर राजेंद्र 


कोपरगाव मतदार संघातील निळवंडे कालवे लाभधारक क्षेत्रातील आमदार आशुतोष काळे यांच्या नियमित पाठपुराव्यामुळे निळवंडेचे आवर्तन सुरु होताच  सर्व साठवण तलाव,गावतळे, बंधारे  भरले जावे यासाठी स्वतःची यंत्रणा उभी केल्याने या उन्हाळ्यात या जिरायती गावांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागले नाही हे आमदार काळे यांनी केलेल्या प्रयत्नाचे फलित आहे

यावर्षी मे आणि जून महिन्यात पावसाने आशा पल्लवीत केल्या. सर्वच धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात झालेल्या पर्जन्यमानामुळे मागील वर्षीच्या तुलनेत सर्वच धरणे दुप्पट क्षमतेने किंवा त्यापेक्षा जास्त भरलेली आहेत व जायकवाडी धरण देखील जुलै महिन्यातच ७५ टक्यांच्या वर जाऊन पोहोचले आहे. परंतु जूनचा शेवटचा आठवडा ते जुलै संपत आला तरी कोपरगाव मतदार संघाकडे पावसाने पाठ फिरविली आहे. त्यामुळे उष्णता देखील मोठ्या प्रमाणात वाढली असून खरीप पिके सुकू लागली आहेत.याची दखल घेवून निळवंडे कालव्याच्या सुरु असलेल्या आवर्तनातून तळेगाव शाखेतून जिरायती भागातील तलाव,गावतळे,बंधारे भरून देण्याच्या सूचना आ.आशुतोष काळे यानी केल्याने  चांगला पाऊस होईपर्यंत या गावातील नागरीकांना पिण्याच्या पाण्याची व जनावरांच्या चाऱ्याची टंचाई जाणवणार नाही. 

दोन दिवसात पाणी सोडण्याबाबत नियोजन करण्यात येणार असल्याचे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी सांगितले आहे.

                         

Leave a Reply

You cannot copy content of this page