संविधानाबाबत नेरेटिव्ह पसरवून देशाला अस्थिर करण्याचा विरोधकांचा  प्रयत्न- मंत्री राधाकृष्ण विखे

संविधानाबाबत नेरेटिव्ह पसरवून देशाला अस्थिर करण्याचा विरोधकांचा  प्रयत्न- मंत्री राधाकृष्ण विखे

Opposition trying to destabilize the country by spreading narratives about the Constitution – Minister Radhakrishna Vikhe

भाजपासाठी खस्ता खाल्ल्यांचे पालकत्व घ्या 

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन Mon 21July 20.20 Pm.By  सालकर राजेंद्र 

कोपरगांव  : संविधान हा या देशाचा आत्मा असून संविधानावर आधारीत देशाची वाटचाल चालू आहे. ज्या संविधानाने आपल्याला मुलभुत अधिकार दिले ते संविधान हीच लोकशाहीची ताकद असून सुदृढ लोकशाही ही या देशाने जोपासली आहे  व संविधान वर्ष म्हणून  मा.पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देशात साजरा होत असतांना संविधान बदलणार असल्याच नेरेटिव्ह विरोधकांनी देशात पसरवून या देशाला अस्थिर करण्याचा प्रयत्न विरोधक करीत आहेत संविधान बदलण्याचा अधिकार कोणाला नसून ते नरेंद्र मोदीं यांनी दाखवून दिले असल्याचे प्रतिपादन राज्याचे जलसंधारण मंत्री व अहिल्यानगरचे पालक मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी कोपरगांव केले आहे.

रा.स्व.संघ जनसंघासाठी आयुष्य वेचणार्‍या तब्बल १५० कार्यकर्त्यांचा सन्मान येथील व्यापारी धर्मशाळेत राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगरचे पालक मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते झाला. प्रारंभी स्व.खा.सूर्यभान पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून सन्मान सोहळयास प्रारंभ झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाल्मिकराव भोकरे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितिन दिनकर, उपाध्यक्ष विनायक गायकवाड, गोदावरी दुध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे, रविंद्र बोरावके,  कार्यक्रमाचे प्रास्तविक माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी केले.
 प्रास्ताविकात वहाडणे यांनी विखे यांना आपण या जिल्ह्याचे पालकमंत्री आहात,या तालुक्यात ज्यांनी संघ, जनसंघ, भाजपासाठी खस्ता खाल्ल्या त्यांचे पालकत्व घेण्याचे आवाहन केले 
ना.विखे पुढे म्हणाले ५० वर्षांपूर्वी आपण संघर्ष करुन देशाचं संविधान वाचवण्याकरिता सर्वांनी प्रयत्न केले. आणि या लढयाला ५०वर्ष पूर्ण होत आहेत.  आणि त्या निमित्ताने आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणविस याच मन:पूर्वक अभिंनदन करुन धन्यवाद देतो की आपल्या या सर्व सेनानींची आठवण ठेवून त्यांनी एक आगळावेगळा उपक्रम देशात चालू केला कदाचित महाराष्ट्र हे पहिल राज्य असेल ज्यानी हा उपक्रम सुरु केला आहे. आज या लढयातील स्व.सूर्यभान पा.वहाडणे यांच्या सारखे लढवय्ये होते.  ज्यांनी संघर्ष केला असे काही वयोवृद्ध हयात आहेत. आज त्यांना सन्मानपत्र देतांना  माझ मन भरुन आलंय..एक निरपेक्ष नि:स्वार्थी भावनेने या लोकांनी आपल्या कुटूंबाची वाताहातीची तमा केली नाही. परंतु तत्वांशी कधी तडजोड केली नाही. खरोखर अशा लोकांचा सत्कार करणे योग्य आहे त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे.  आज आपला देश विचाराच्या आधारावर विश्वगुरु बनण्याच्या तयारीत आहे आणि या यशाचा पाया आपल्या सारख्या लोकतंत्र मानणारे सेनानींनी या ठिकाणी रचला आणि त्यामुळेच आज देशाच्या लोकशाहीचं  मंदीर अतीशय समर्थ पणे व  ताठ मानेने उभा आहे याचा गौरव आपल्या प्रत्येकाला आहे. देषभरात लागू करण्यात आलेल्या आणिबाणीच्या  लढयात तुरुंगवास भोगणार्‍या लोकतंत्र सेनानींचा सन्मान सोहळा भारतीय जनता पार्टी वसंत स्मृती कार्यालयाच्या व स्व.खा.सूर्यभानजी वहाडणे पाटील यांच्या वतीने व्यापारी धर्मशाळा या ठिकाणी आयोजित केला होता. त्यास उत्सफूर्त प्रतिसाद मिळाला.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माजी तालुकाध्यक्ष सुभाष दवंगे, छन्नुदास वैष्णव, विजय जोशी, चेतन खुबाणी, वसंत जाधव,संजय कांबळे व इतर कार्यकर्ते यांनी प्रयत्न केला.

Leave a Reply

You cannot copy content of this page