कोपरगाव आतापर्यंत १४४६ कोरोना संशयित व्यक्तींच्या तपासण्या, ७० रुग्ण बरे होऊन घरी गेले, तर २ देवाघरी गेले,

कोपरगाव आतापर्यंत १४४६ कोरोना संशयित व्यक्तींच्या तपासण्या, ७० रुग्ण बरे होऊन घरी गेले, तर २ देवाघरी गेले,

 

वृत्तवेध ऑनलाईन।4 Augast 2020,
By: Rajendra Salkar,18.30

कोपरगाव कोविड सेंटर

कोपरगाव कोरोना अपडेट : १४४६ तपासणी, अहवाल निगेटिव्ह १२६४ ,तर १८२ अहवाल आले पॉझिटिव्ह.
• रॅपिड ॲटिंजेन टेस्टद्वारे केल्या ८१३ व्यक्तींच्या तपासण्या, नगर येथे ६०३ व्यक्तींच्या तपासण्या,

कोपरगाव : तालुक्यात कोरोना विषाणू संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता त्यावर उपाययोजना करण्यासाठी आतापर्यंत (४ ऑगस्ट पर्यंत) १ हजार ४४६ कोरोना संशयित व्यक्तींच्या स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. यापैकी १ हजार २६४ तपासणी अहवाल निगेटिव्ह तर १८२ अहवाल पॉझिटिव्ह आले असून ७० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. दुर्दैवाने २ जणांचा मृत्यू झाला आहे. आज कोपरगाव कोविड सेंटरमध्ये सध्या ऍक्टिव्ह ११० रुग्णांवर उपचार सुरू आहेत,अशी माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे.

१४४६ तपासण्या

शिवाय इतर आज पर्यंत कुठलेही अहवाल प्रलंबित नाही . एकूण करण्यात आलेल्या १४४६ तपासण्यांपैकी ८४३ तपासण्या या रॅपिड ॲटिजेंन टेस्टद्वारे कोपरगाव कोविड सेंटर येथे करण्यात आल्या आहेत. तर ६०३ तपासण्या नगर येथे करण्यात आल्या आहेत, अशी माहिती डॉक्टर कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे.
तालुक्यात संशयित म्हणून तपासणी करण्यात आलेल्या १४४६ व्यक्तींपैंकी केवळ १८२ व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तालुक्यात केलेल्या तपासण्यांपैकी पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याचा दर हा १२.५% इतका आहे.

तालुक्यात आतापर्यंत ७० रुग्णांची कोरोनावर मात केली आहे.
कोपरगाव शहरात तहसीलदार योगेश चंद्रे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर या तीन यंत्रणांनी समन्वय साधून गेल्या काही दिवसात करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांमुळे तसेच आरोग्य विभाग डॉ. कृष्णा फुलसौंदर, डॉ. संतोष विधाटे डॉक्टर वैशाली बडदे (आव्हाड) यांनी केलेल्या तातडीच्या वैद्यकीय उपाययोजना तालुक्यातील कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ३८.५ टक्क्यांपर्यंत गेले आहे. बाधित रुग्णांपैकी आतापर्यंत ७० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामध्ये कोपरगाव शहर तालुक्यातील विविध गावांचा समावेश आहे.
तर दुर्दैवाने दोन जणांचा मृत्यू झाला. मृत्युदर १.०९ % इतका आहे. असे डॉ. फुलसौंदर यांनी सांगितले.

कोपरगाव कोविड सेंटरमध्ये सध्या ११० ॲक्टीव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत. मंगळवारी (४ ऑगस्ट) रोजी कोपरगाव मध्ये एकवीस नवे रुग्ण सापडले,यामध्ये देवकर वस्ती ३,साई १, कॉर्नर वृंदावन कॉलनी १, पोहेगाव ४, शिंगणापूर ९, संजीवनी कारखाना २ या शहर व तालुक्यातील रुग्णांचा समावेश आहे. अशी माहिती विशेष वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वैशाली बडदे (आव्हाड) यांनी दिली.

Leave a Reply

You cannot copy content of this page