श्रीरामपूर विभागाला पहिला मान आता कोपरगाव सह ३१२ पोस्ट कार्यालय होणार प्रभावी आणि वेगवान
Shrirampur division gets first place, now 312 post offices including Kopargaon will be effective and fast
४ ऑगस्ट पासून देशभरातील सर्व पोस्ट ग्राहकांना प्रभावी आणि वेगवान सेवा
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईनThu31July 19.20 Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव : डाक विभागाकडून डिजिटल परिवर्तनाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले असून २२ जुलैपासून सदरचा पायलट प्रोजेक्ट राबविण्याचा पहिला मान पुणे रिजन मधील अहिल्या नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर विभागाला मिळाला असून या अंतर्गत कोपरगाव सह शहर व ग्रामीण मिळून ३१२ पोस्ट कार्यालये आता प्रभावी व वेगवान सेवा देणार आहेत तर ४ ऑगस्ट पासून ही सेवा संपूर्ण देशभरात सुरू करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे हे सॉफ्टवेअर स्वतः पोस्ट कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी डेव्हलप केलेले आहे. अशी माहिती पोस्ट मास्तर राजेश नेतनकर यांनी दिली. 
डाक विभागाकडून डिजिटल परिवर्तनाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले असून, ‘APT (Advanced Platform for Transformation (परिवर्तनासाठी प्रगत प्लॅटफॉर्म) अप्लिकेशन’ हे पुढच्या पिढीतील नवीन सॉफ्टवेअर २२ जुलै पासून काही निवडक प्रमुख पोस्ट ऑफिसमध्ये राबवण्यात आले आहेत. पुणे रिजन मधून श्रीरामपूर विभागातील कोपरगाव सह शहर व ग्रामीण मिळून ३१२ पोस्ट कार्यालयांना सदरचा पायलट प्रोजेक्ट राबवण्याचा प्रथम मान मिळाला आहे.
श्रीरामपूर मुख्य पोस्ट ऑफिस अंतर्गत, कोपरगाव सह शहरातील ५२ व ग्रामीण भागातील २६० असे एकूण ३१२ पोस्ट ऑफिस मध्ये ही प्रणाली सुरू झाली आहे. त्यामुळे आता पोस्ट ग्राहकांना अधिक वेगवान व प्रभावी सेवा मिळणार आहे. या पायलट प्रोजेक्टसाठी सोलापूर विभागाचे अध्यक्ष एस. व्ही. एल. एन. राव, श्रीरामपूर डाक विभागाचे अधीक्षक उमेश जनावळे, कोपरगाव विभागाचे डाक निरीक्षक आनंद सोनवणे, पोस्ट मास्तर राजेश नेतनकर यांच्या प्रमुख उपस्थितीत या सॉफ्टवेअर प्रणालीचे उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी पोस्ट कर्मचारी विजय जोर्वेकर, विशाल गवळी, लुकमन तडवी, शशांक इवानते, पोपट सूळ, विजय बाभुळके, बापूसाहेब चव्हाण, अशोक अनाप, अंकित गुप्ता, यांच्यासह ग्रामीण डाक सेवक, ग्राहक उपस्थित होते.
या योजनेअंतर्गत पुढील मुख्य पोस्ट ऑफिस आणि त्याअंतर्गत येणाऱ्या सब पोस्ट ऑफिस आणि शाखा पोस्ट ऑफिसमध्ये नव्या प्रणालीची अंमलबजावणी करण्यात आली आहे.
चौकट.
देशभरातील प्रत्येक राज्यातील काही विभागामध्ये पायलट प्रोजेक्टची चाचणी घेण्यात आली यात महाराष्ट्रातील माहिम मुख्य पोस्ट ऑफिस,ठाणे मुख्य पोस्ट ऑफिस,जळगाव मुख्य पोस्ट ऑफिस,अमरावती मुख्य पोस्ट ऑफिस,कोल्हापूर मुख्य पोस्ट ऑफिस.नवीन प्रणालीच्या पार्श्वभूमीवर सुरळीत अंमलबजावणीसाठी २१ जुलै रोजी एक दिवसासाठी पोस्ट ऑफिसमधील सर्व व्यवहार तात्पुरते बंद ठेवण्यात आले होते. या काळात डेटा माइग्रेशन, सिस्टीम तपासणी आणि आवश्यक कॉन्फिगरेशनची प्रक्रिया पार पाडली गेली आहे.
कोट
APT अप्लिकेशनमुळे अधिक वेगवान आणि प्रभावी सेवा ग्राहकांसाठी वापरायला सुलभ आणि आधुनिक इंटरफेस जलद सेवा वितरणाची हमी कार्यक्षम, स्मार्ट आणि भविष्योन्मुख पोस्ट सेवा प्रणाली आता ग्राहकांना मिळणार आहे.पोस्ट कार्यालयाच्या वतीने या प्रणाली बाबत या डिजिटल परिवर्तनामुळे भविष्यात आणखी जलद, सुरक्षित आणि सोयीच्या सेवा मिळणार आहेत – राजेश नेतनकर ,कोपरगाव पोस्ट मास्तर .





