शिर्डीमध्ये कोव्हिड सेंटर उभारा, भाजप प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हेंची मागणी

शिर्डीमध्ये कोव्हिड सेंटर उभारा, भाजप प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हेंची मागणी

( BJP State secretary Senhlata Kohle demands Covid Center in Shirdi )

स्नेहलता कोल्हे

वृत्तवेध ऑनलाईन।4 Augast 2020,
By: Rajendra Salkar,19.55

कोपरगाव : कोपरगाव च्या माजी आमदार भाजप प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी कोपरगाव च्या रुग्णांच्या सोयीसाठी शिर्डीमध्ये कोव्हिड सेंटर सुरु करण्याची मागणी केली आहे. स्नेहलता कोल्हे यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे भ्रमणध्वनी वरून ही मागणी केली आहे. इतकंच नाही तर राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना निवेदन पाठवून मागणी करण्यात आली असल्याचं स्नेहलता कोल्हे म्हणाल्या.

कोपरगाव तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय, अपुरा वैद्यकीय कर्मचारी वर्ग आणि अत्यावश्यक वैद्यकीय साहित्य नसल्यामुळे कोपरगाव येथील कोरोना सेंटर रूग्णांना सेवा देण्यास असमर्थ ठरत असल्याने रूग्णांची हेळसांड होत असून रूग्णांच्या जीवाशी चाललेला खेळ थांबविण्यासाठी शिर्डीमध्ये कोव्हिड सेंटर सुरु करावं, अशी मागणी भाजपा प्रदेश सचिव माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी केली. यासंदर्भात भाजपा प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, पालकमंत्री यांना व प्रशासनाला निवेदन पाठवले आहे . अहमदनगर जिल्हाधिकारी यांनाही त्यांनी निवेदन पाठवलं आहे.

( BJP State secretary Senhlata Kohle demands Covid Center in Shirdi )

Leave a Reply

You cannot copy content of this page