स्वदेशीचा स्वीकार करून देश महासत्ता बनेल,”- अमित शहा 

स्वदेशीचा स्वीकार करून देश महासत्ता बनेल,”- अमित शहा

“The country will become a superpower by embracing Swadeshi,”- Amit Shah

महाराष्ट्रातील निवडक १५ साखर कारखान्यांना अशी प्रकल्प उभारण्यासाठी केंद्र मदत करणार

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन Sun 5Oct 11.00 Pm.By  सालकर राजेंद्र 

कोपरगाव: भारत नंबर वन होण्यासाठी आपल्याकडे अनेक पर्याय आहेत, पण जर आपल्याला जगात नंबर वन व्हायचे असेल तर स्वदेशीशिवाय दुसरा पर्याय नाही.जर भारताच्या १४० कोटी नागरिकांनी फक्त स्वदेशी उत्पादने वापरण्याचा संकल्प केला आणि व्यापाऱ्यांनी भारतीय उत्पादनांचा प्रचार करून आणि परदेशी वस्तूंपासून दूर राहून त्यांच्या दुकानांमध्ये स्वदेशी आणि ‌आणि वस्तूंमध्ये भारतीय वस्तूंचा साठा केला तरच देशाचे महासत्ता होण्याचे स्वप्न लवकरच साकार होऊ शकते.असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शहा यांनी कोपरगाव येथे केले.

रविवारी ५ ऑक्टोबर रोजी संजीवनी युनिव्हर्सिटीच्या ग्राउंडवर  केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते ५५ कोटी रुपयांच्या  सीएनजी बायोगॅस व पोटॅश या दोन प्रकल्पांचे  ऑनलाईन पद्धतीने  प्रकल्पांचे उद्घाटन केल्यानंतर शेतकरी मेळाव्यात बोलत होते.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री एकनाथ  शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महाराष्ट्राचे जल मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, आमदार आशुतोष काळे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, सहकार महर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

अमित शहा पुढे म्हणाले की ,स्वावलंबना पेक्षा मोठे काहीही नाही.नरेंद्र मोदी सरकारने सुरू केलेल्या “आत्मनिर्भर भारत” उपक्रमामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळाली आहे आणि बेरोजगारीची समस्याही दूर होत आहे. संजीवनी उद्योग व कोल्हे कारखान्याने देशातील सहकारातील पहिल्या सीएनजी बायोगॅस व  पोटॅश या दोन प्रकल्पांची उभारणी केली. देशभरातील सहकारी साखर कारखान्यांसाठी एक नवीन मार्ग सुरू केला आहे, महाराष्ट्रासाठी एक उदाहरण आहे आपण असा प्लांट बांधला पाहिजे ज्याचा येत्या काळात साखर कारखाना चालविण्यास मोठा फायदा होईल.आणि आज मी घोषणा करू इच्छितो की नरेंद्र मोदी यांचे सरकार येत्या काही दिवसांत निवडक पंधरा कारखान्यांना एनसीडीसी मार्फत नवीन प्रकल्प उभारण्यासाठी मदत करणार आहे.भारतातील हा पहिलाच प्रकल्प आहे. संजीवनी ग्रुपने हरित ऊर्जा आणि शाश्वततेच्या क्षेत्रातही अनेक पहिले काम केले आहे हे सांगताना त्यांनी 

मी बिपिनदादा कोल्हे आणि विवेक कोल्हे यांचे मनापासून अभिनंदन करू इच्छितो. ही एक सुरुवात आहे की जी येत्या काळात देशभरातील साखर कारखान्यांसाठी एक नवीन मार्ग उघडेल? असे गौरव उद्गार व्यक्त करून संजीवनी उद्योग समूहाच्या व संजीवनी कारखान्याच्या विविध उपक्रमांचा उल्लेख केला व विवेक कोल्हे यांचे तोंड भरून कौतुक केले.

शाह म्हणाले की, नवरात्रीच्या पूर्वसंध्येला पंतप्रधानांनी ३९५ उत्पादनांवरील जीएसटी (वस्तू आणि सेवा कर) एक तृतीयांश कमी केला आणि या निर्णयामुळे नागरिकांना मोठा फायदा होत आहे. ते म्हणाले, “अनेक अन्नपदार्थांवरील जीएसटी शून्य करण्यात आला आहे. दैनंदिन वापराच्या आवश्यक वस्तूंवरील तो पाच टक्के करण्यात आला आहे.”

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, सहकार क्षेत्रातला पहिला सीएनजीचा बायोगॅस प्रकल्प हा आज या ठिकाणी विवेक भैय्यांच्या पुढाकारामुळे आपल्या स्वर्गीय शंकरराव कोल्हे सहकार महर्षी या साखर कारखाना आणि संजीवनी ग्रुपच्या माध्यमातून आपल्या कोपरगाव मध्ये तयार होतोय हे ऐतिहासिक याकरता देखील आहे की देशाचे प्रधानमंत्री  नरेंद्र मोदी यांनी शेतकरी हा केवळ शेतकरी नको तर तो अन्नदातासोबत ऊर्जा दाता झाला पाहिजे अशा प्रकारचा विचार मांडला आणि त्यातून केंद्र सरकारने मोदी यांच्या नेतृत्वात आणि सहकार विभागाने अमित भाई शहांच्या नेतृत्वात मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या योजना आणल्या त्या योजना करता निधी उपलब्ध करून दिला आणि साखर कारखानदारी जिवंतही राहिली पाहिजे आणि त्याच्यामध्ये सर्क्युलर इकॉनॉमी तयार झाली पाहिजे अशा प्रकारचा विचार हा रुजवण्याचा काम हे सहकार क्षेत्रामध्ये केलं आपल्याला कल्पना आहे की,इथेनॉल सारखी एक क्रांती या देशांमध्ये मोदीजींच्या नेतृत्वात आली इथेनॉलमुळे एकीकडे आपल्ं परकीय चलन वाचलं तिकडे आमच्या साखर कारखान्यांना साखरेच्या चढ-उतार असतो या चढ-उताराने येणाऱ्या नुकसान आहे ते नुकसान भरून काढण्याकरता मोठ्या प्रमाणात मदत देखील मिळाली. आणि केंद्र सरकारच्या ज्या सगळ्या ऑइल कंपनीचा आहे यांनी खरेदीदार म्हणून त्या ठिकाणी वेगवेगळ्या कारखान्याशी करार केल्यामुळे एक उत्तम निधीचा स्त्रोत  सुरू झाला आणि मोठ्या प्रमाणात शाश्वकता आणण्याचं काम या क्षेत्रामध्ये मोदीजींच्या नेतृत्वात झालं. पण याच्याकडे पाहत असताना एका वेगळ्या नजरेने देखील बघितलं पाहिजे. आज आपण बघतोय आपल्या देशासमोर किंवा जगासमोर सगळ्यात मोठा प्रश्न काय सगळ्यात मोठा प्रश्न आहे वातावरणातल्या बदलाचा आपण गेले काही महिने आपल्या महाराष्ट्रामध्ये यंदा पावसाळा सुरू झाला मे मध्ये आता ऑक्टोबर महिना सुरू झाला तरीही पाऊस पडतो आहे आमचे अनेक सर्कल असे आहेत की ज्या ठिकाणी सात सात वेळा अतिवृष्टी झाली आणि शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालं केवळ शेतीचा नाही तर सर्व  प्रकारचे नुकसान झाले जी काही सरकारने मदत करायचे ते तर आपण करणारच आहोत पण प्रश्न आहे की हे जे वातावरणातल्या बदलाचे परिणाम आहेत हे परिणाम यापुढे जर असेच सुरू राहिले तर आमच्या शेतकऱ्याने नेमकं काय करायचं आहे. प्रदूषण आपल्याला कमी करावे लागणार आहे  इंधनाच्या वापरामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतंच त्याचबरोबर परकीय चलन देखील खर्च होते. याचा शेतीवर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो .

याकरता प्रधानमंत्री मोदीजींनी सांगितलं आपल्याला एनर्जी ट्रान्समिशन करायचंय आपल्याला ऊर्जाच्या स्त्रोतांमध्ये परिवर्तन करायचं आहे प्रदूषण करणारे ऊर्जा स्त्रोत हे हळूहळू कमी करून जे आपले अतिशय नैसर्गिक किंवा अपारंपारिक ऊर्जा स्त्रोत आहेत त्याला आपल्याला त्या ठिकाणी चालना द्यायची आहे. आपण सोलारचा प्रयोग केला आज महाराष्ट्र त्यामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे सोलार सारखे अनेक प्रयोग प्रकल्प आपण केले पण त्यासोबत पेट्रोल आणि डिझेल याचं अल्टो मेट्रो तयार करणे हे अत्यंत महत्त्वाचे मग त्याच्यामध्ये पहिल्यांदा पेट्रोल डिझेल ऐवजी  फ्लेक्स इंजिन आपण आणले की ज्याच्यामध्ये 100% इथेनॉलवर आपल्या गाड्या चालू शकतील पण त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा जर काही परिवर्तन असेल तर ते म्हणजे सीबीजे सीएनजीचा  प्रकल्प आपण करतोय हा प्रकल्प म्हणजे सर्क्युलर इकॉनॉमी चा प्रकल्प आहे.आपण साखर तयार करतो बाय प्रॉडक्ट तयार करतो त्यावेळेस स्पेंट वॉश आणि प्रेसमेड बाहेर पडते या ऑर्गानिक वेस्टेजवर प्रोसेसिंग होत असताना त्याच्या शुद्धीकरणातून जे निघेल ते म्हणजे पोटॅश म्हणजे कचऱ्याचा आपण गॅस केला आणि गॅस पासून जो कचरा निघाला तो बायो फर्टीलायझर म्हणून  मोठ्या प्रमाणात आपल्या शेतीमध्ये व शेतकऱ्याला तर मदत होतेच आहे पण काहीही वेस्ट होणार नाहीत. त्यामुळे आयातीवर देखील मोठा परिणाम होणार आहे. परकीय चलन वाचेल, प्रदूषण कमी होईल. वेस्ट इज वेल होईलप्रधानमंत्री मोदी आणि आणि देशाच्या सहकार मंत्री यांनी आहे की पहिल्यांदा आमच्या सहकार क्षेत्रामध्ये शाश्वकता आणून शेतकऱ्याचा विचार करण हे जे या ठिकाणी सुरू झालेला आहे मला असं वाटतं हे खरोखर एक नवीन विजन आज आपल्या भारतामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे .

आज महाराष्ट्रात 40% शेतीचे नुकसान झालेले आहे नुसते नुकसान झालेली नाही तर जमीन देखील वाहून गेलेली आहे त्यामुळे खरीप गेला आणि रब्बी सुद्धा गेले शेतकऱ्यांचे दुःख भरून काढता येणार नाही परंतु त्यांना स्वतःच्या पायावर  भक्कमपणे उभे राहता यावं यासाठी निश्चितच राज्य सरकारने केंद्र सरकार त्यांच्या पाठीशी राहील त्यांच्या दुःखावर फुंकर घालील अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.
विवेकभैय्या ही नवीन क्रांती सुरू होत आहे त्या क्रांतीचे प्रणेते आता तुम्ही झालेले आहात आणि खरोखर मला असं वाटतं ही एक अत्यंत महत्त्वाचे गोष्ट आहे आणि म्हणून एक युवा नेता म्हणून तुमचं मी अतिशय मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. पण आता एक उत्तम काम तुम्ही केलेला आहे हे काम अजून मोठ्या कसे करता येईल हे काम इतरांनाही कसे मदत करता येईल याचा प्रयत्न हा तुम्ही करावा.

एकनाथ शिंदे म्हणाले की, देशातला पहिला सीएनजी प्रकल्प या ठिकाणी उभा राहतोय याबद्दल मी संजीवनी ग्रुपचा मनापासून अभिनंदन करतो मनापासून त्यांना शुभेच्छा देतो खरं म्हणजे सहकार आपण समृद्धीचा महामंत्र देणारे खऱ्या अर्थाने पूर्वी आपण पाहिलं आणि गेल्या चार-पाच वर्षापासून पाहतोय की सहकार मंत्रालय आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी ने पहिल्यांदा सुरू केलं आणि त्या सहकार विभागाचे जी धुरा ते आपल्या कणखर गृहमंत्री अमित शहाजींच्या खांद्यावर दिली याचा अर्थ काय हे सहकारामध्ये या ठिकाणी हा देश पुढे गेला पाहिजे ग्रामीण भागापासून सगळ्यांचा विकास झाला पाहिजे आणि खऱ्या अर्थाने जी काय मुठभर लोकांची मक्तेदारी आहे ती प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत याचा फायदा पोहोचला पाहिजे आज ही भूमिका डोळ्यासमोर ठेवून आदरणीय सहकार मंत्री काम करतात त्या ठिकाणी देखील त्यांनी सांगितले जे नवीन नवीन  प्रयोग यावेळेस खऱ्या अर्थाने पारंपारिक पद्धतीने आपण जे करतो ते ठीक आहे परंतु या सहकार क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थाने नवीन प्रयोग आले पाहिजे आणि हा भारत हा शेतीप्रधान देश आहे शेतकऱ्यांचा देश आहे हे राज्य शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा आणि हा भारत देश युवकांचा आता विवेक कडे पाहिलंय आपण नवीन काहीतरी करतोय आणि त्यांनी शंकरराव कोल्हे यांनी जो रोपट लावलं त्या रोपट्याचा वटवृक्ष झालेला आपण या ठिकाणी पाहतोय आणि म्हणूनच आदरणीय अमित भाई अशा प्रकारे जिथे जिथे प्रगत शेतकरी नवीन नवीन  रिफॉर्म सांगतोय नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न करतोय त्या ठिकाणी आवर्जून जातात आणि त्यांना प्रेरणा आणि शाबासकी देतात .आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी यांनी आत्मनिर्भर हा एक नारा दिलेला आहे भारत आत्मनिर्भरतेकडे जातोय त्याचं ज्वलंत उदाहरण आपण पाहिलं की नुकतीच  जीएसटी मध्ये केलेली कपात यांच्यामुळे खऱ्या अर्थाने आपण आत्मनिर्मधार तेकडे जातोय आणि आज इथं पहिला प्रकल्प सीएनजीचा होतोय एक प्रकारचं हे आत्मनिर्भर्तेकडे उचललेलं पहिलं पाऊल आहे.आज देश आपला आर्थिक महासत्तेकडे जातोय खऱ्या अर्थाने मोदीजींनी   आपल्या देशाची अर्थव्यवस्था मजबूत केली 11 व्या नंबर वर पाचव्याहून चौथ्यावरून आता तिसरा नंबर वर आपण येणार आहोत आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी भारत आर्थिक  मध्ये वाटचाल करतोय महासत्तेकडे वाटचाल करतो आणि म्हणूनच आपल्या सगळ्या मंडळात असताना चळवळ देखील या ठिकाणी देशांमध्ये महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर फोफावली  पाहिजे आणि म्हणूनच अमित भाईंनी ज्या वेळेस हे सहकार क्षेत्र ऊस उत्पादक शेतकरी सहकारी कारखाने अडचणीत आले. त्यावेळेस देखील मी मगाशी भाषणात देखील सांगितलं त्यावेळेस देखील महाराष्ट्रातल्या उत्पादक शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी दहा हजार कोटी इन्कम टॅक्स माफ करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आणि खऱ्या अर्थाने सहकाराला एक ऊर्जा देण्याचं काम केले. सहकार चळवळ ही देशांमध्ये या पद्धतीने  ग्रामीण भागामध्ये ऊर्जा क्रांती घडल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणूनच अशा प्रकारचे प्रकल्प आहे हे प्रकल्प सुरू झाले पाहिजे दुसऱ्या इतर लोकांनी आत्मसात केले पाहिजे आणि यामध्ये सहकार क्षेत्रामध्ये फक्त कृषी विभागावर मर्यादित न राहता या ठिकाणी शिक्षण उद्योग, बँकिंग, क्षेत्रामध्ये देखील आपण पुढे जातोय आणि म्हणूनच अमित भाई देखील या सर्व क्षेत्रांमध्ये या सर्वांचा फायदा कसा होईल सर्व सामान्य माणसाच्या जीवनामध्ये बदल कसा होईल.तो सुखी कसा होईल या दृष्टीने पावले टाकताय आणि म्हणूनच मी आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांचा मनापासून अभिनंदन करतो त्यांना मनापासून धन्यवाद देतो  चौख उत्तर देणारे 370 कलम हटवणारे, राम मंदिर बनणारे या ठिकाणी मोदीजींच्या नेतृत्वाखाली या देशाला सुरक्षित करणारे, सहकार चळवळीत देखील आपण मागे राहता कामा नये यासाठी महाराष्ट्राला वेळोवेळी ते मदत करताय आणि म्हणूनच या ठिकाणी आज आपण अशा प्रकारचे प्रकल्प देखील सुरू करतोय 2025 सहकार वर्ष म्हणून सहकाराकडून समृद्धीकडे अशी घोषणा हा मंत्र आणि म्हणूनच त्यामध्ये पेट्रोल जन्य पदार्थांचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो मे महिन्यात पाऊस पडतोय  आणि म्हणून  पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आपण अशा प्रकारचा कॉम्प्रेस बायोगॅसचा वापर वाढवला पाहिजे आणि मी आपल्या कोल्हे परिवाराला मनापासून धन्यवाद देतो त्यांनी हा नवीन प्रकल्पांतून नवीन एक प्रगतीचे पाऊल टाकलंय त्याबद्दल त्यांना खूप खूप मनापासून अभिनंदन मनापासून शुभेच्छा देतो.आपल्या देशावर आपल्या राज्यावर पुराचे संकट आले आणि सात लाख हेक्टर जमीन पुरा खाली गेली आहे शेती वाहून गेली आहे शेतकऱ्यांची जमीन खरवडुन गेली आहे घरांची पडझड झाली. शेतकरी आमचा अन्नदाता, शेतकरी मायबाप, आणि म्हणून शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे काम राज्य सरकार तर करणारच आहे आणि म्हणून काल आमची मुख्यमंत्री देवेंद्र अजित दादा आमची बैठक झाली ही सर्व निकष बाजूला ठेवून या ठिकाणी शेतकऱ्यांच्या पाठीशी ‌उभे राहण्याचा आम्ही निर्णय घेतला. आणि काल अमित भाईंचे देखील आमचे चर्चा झाली आणि जेव्हा जेव्हा महाराष्ट्र संकटात आला तेव्हा तेव्हा या ठिकाणी मोदीजी आपल्या मागे उभे राहिले अमित भैया आपल्या मागे पहाडासारखे उभे राहिले आणि म्हणूनच मी आपल्याला सांगतो काही लोक म्हणतात केंद्र ने काय दिले काय मी आपल्याला सांगतो जेव्हा जेव्हा संकट केंद्र सरकार मोदीजी अमित भाई आपल्या पाठीशी उभे राहिले आणि यावेळेस देखील संकट मोठा शेतकऱ्याचे नुकसान मोठा आणि म्हणून त्यांनी त्यांना सांगितलं आम्ही विनंती केली  अमित भाईंना देखील विनंती केलेली आहे आणि आम्हाला विश्वास आहे केंद्र सरकार पूर्णपणे ताकतीने खंबीरपणे उभे राहिल्याशिवाय उभा राहील हा विश्वास याठिकाणी मी देतो

अजित पवार म्हणाले की, आज सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना आणि संजीवनी ग्रुप यांचा हा देशातील पहिला सहकारी सीएनजी प्रकल्प व स्प्रेडर ड्रायर पोटॅश प्रकल्प याचा उद्घाटन आज अमित शहा साहेबांनी आपल्या सगळ्यांच्या साक्षीने केलं आणि या कार्यक्रमाच्या करता बिपिन दादांनी व विवेक कोल्हे आम्हाला सगळ्यांना बोलावलं त्याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद देतो इथे आल्यानंतर मला फार वर्षांपूर्वीची एक आठवण येते कोल्हे साहेब ज्यावेळेस आपल्या सगळ्यांचे प्रतिनिधित्व करत होते त्या काळात एकदा आपल्या कोपरगावला दुधाचा एक मोठी आपण सभा आयोजित केलेली होती दुधाला दर मिळाला पाहिजे अशा प्रकारची आणि तेव्हापासून माझं इकडच्या भागांमध्ये जाने ना सुरू आहे  एकंदरीतच कोल्हे साहेबांच्या बरोबर काम करण्याची संधी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळाली मी त्याबद्दल नशीबवान समजतो रयत शिक्षण संस्था  असेल वेगवेगळ्या सहकारी संस्था असतील तिथे आम्हाला त्यांच्याबरोबर काम करायला मिळायचं अतिशय दुरदृष्टी असणारा नेता  नेहमी नवीन काहीतरी शोधण्याचा प्रयत्न केले नंतरच्या काळामध्ये ती जबाबदारी बिपिन दादांनी उचलली त्यांनी देखील त्या बाबतीमध्ये जे काही रोपटे लावलेलं होतं ते अतिशय चांगल्या पद्धतीने वाढवण्याचे काम वटवृक्षांमध्ये रूपांतर करण्याचं काम केलं  आणि नवीन पिढीचा प्रतिनिधी या नात्याने विवेकने देखील या ठिकाणी चांगल्या प्रकारचे काम चालू आहे धन्यवाद हे झालं धन्यवाद मी आता म्हणतो मी ते म्हणणारे त्याच्यानंतर म्हणायचं तुम्ही धन्यवाद परंतु आजचा दिवस कोपरगाव आणि परिसरातील नागरिकांच्या दृष्टीने ऐतिहासिक आणि सुवर्ण अक्षरांनी नोंद घेतली जाईल अशा प्रकारचा दिवस आहे राज्यातील सहकार चळवळीतला खूप मोकळा इतिहास आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला खऱ्या अर्थाने चालना देण्याचे काम या चळवळीसाठी ज्यांनी कोणी त्या देशामध्ये सहकारी सर्व जण आपल्या राज्यामध्ये विशेषता वाढवण्याचे काम केलं नुसती उसापासून  साखर न बनवता जेवढे काही  करता येतील त्यामध्ये जर सर्वात जास्त सहकारी तत्त्वावर बायप्रोडक्ट केले असतील तर ते सहकार महर्षी शंकरराव कोल्हे  साहेबांच्या या सहकारी साखर कारखाने देखील नेहमी राज्यातील या एकंदरीत जिल्ह्याला पण एक वेगळ्या प्रकारचा इतिहास आहे अहिल्यानगर कोपरगाव हे सहकार क्षेत्रातील एक महत्त्वाचं केंद्र म्हणून त्या ठिकाणी ओळखले जातात या भागांनी फक्त साखरेमध्ये क्रांती केली नाही तर दुधामध्ये देखील क्रांती घडवली आज पर्यावरण संतुलित तंत्रज्ञान आणि शेतकरी कल्याण यावर भर देत सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाने ही आपली वेगळी ओळख केलेली आहे. मित्रांनो या प्रकल्पातला दररोज 12 टन  सीएनजी निर्मिती होणार आहे आणि तो थेट पेट्रोलियम कंपन्यांना पहिल्यांदा विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे त्यामुळे कारखान्याच्या उत्पन्नात वाढ होणारे आपल्या सभासदांना दोन पैसे जास्त भाव द्यायला मदत होणारे त्याच्यामध्ये अन्नदाता असलेला शेतकरी आता ऊर्जा दाता म्हणून देखील ओळखला जाणार आहे.वाहतूक क्षेत्रातील आर्थिक खर्च कमी करण्यासाठी सुद्धा या प्रकल्पाचा हातभार लागणारे याची नोंद आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे आणि कारखान्यात मळी सांडपाणीतून  शुद्ध स्वरूपातील सीएनजी तयार करण्याची प्रक्रिया पर्यावरण संवर्धनासाठी आदर्श ठरेल याबद्दल देखील मी विश्वास व्यक्त करतो इथं इथे दोन निर्मितीच्या नंतर उरणार्‍या प्रेसमेड पासून सीएनजी तयार करून तो बीपीसीएलच्या माध्यमातून ग्राहकांच्या पर्यंत पोहोचवला जाणारे 55 कोटी रुपये खर्च या बाबतीमध्ये करण्यात आलेले आणि त्याच्यामध्ये आदरणीय अमित शहा साहेबांची फार मोठी मदत झालेली आहे त्याच्यामध्ये मोलेसिस  पासून पोटॅश मिळून त्या शेतकऱ्यांना परत देण्याची योजना देखील त्यामुळे देशातील आयातीवरील अवलंबित्व कमी होणार आहे .आज आपल्याला मार्केटमध्ये पोटॅश मिळत असताना अडचण येते परंतु आता तुम्ही तुमच्याच भागामध्ये स्वतःचा पोटॅश निर्माण करणारा  हा मल्टीपीड प्रकल्प असल्याने फक्त ऊस नाही तर नेपियर गवत कापसाचे अवशेष आणि वेगवेगळ्या प्रकारे नगरपालिकेतील सेंद्रिय कचरा यापासून सुद्धा कंप्लेंट बायोटेकची निर्मिती होऊ शकते त्यामुळे शेतकऱ्यांना आंतरपीक म्हणून अधिक उत्पादन उत्पन्नाचे पर्याय त्या ठिकाणी होऊ शकतात असा खूप एक चांगला प्रकल्पाचा मध्ये घेतलेला इतर देखील सहकारी साखर कारखाने त्याचा अनुकरण करतील आम्हाला कालपासून आम्ही आदरणीय अमित शहा साहेबांच्या बरोबर आहेत ते सांगतात की बाबा अशा प्रकारचे प्रकल्प उभे करण्याच्या करता मनापासून महाराष्ट्रातल्या सहकारी साखर कारखानदारीला सहकार्य करायला तयार आहेत त्यांचा पुरेपूर फायदा आपण सगळेजण घेऊया, सध्या पूरग्रस्तांच्या बद्दल देखील महाराष्ट्रामध्ये एक वेगळं वातावरण झालेले संपूर्ण महायुतीच्या शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे तिथे कुठेही निधीची कसली कमतरता भासु देणार नाही कुठल्याही परिस्थितीत आपल्या महाराष्ट्रातल्या बळीराजाला शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही शासन शेतकऱ्यांच्या अपत्तीग्रस्तांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे.महाराष्ट्राला मोठ्या मदतीची गरज आहे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिल्लीला जाऊन पंतप्रधानांना मागणी करून त्यांच्याशी चर्चा केलेली कालपासून आम्ही अमित शहा साहेबांशी बोलतोय त्यांनी पण त्याच्यामध्ये मार्ग काढायची सकारात्मक अशा प्रकारे भूमिका घेतलेली आहे नेहमीच महायुती सरकारला एनडीएच्या सरकारने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या सरकारने भरभरून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. याही वेळेस तशीच मदत ही महाराष्ट्राला मिळाल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीने त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये जे स्वप्न स्वर्गीय सहकार महर्षी शंकरराव कोल्हे  साहेबांनी उराशी बाळगलेलं होतं ते स्वप्न पार पाडण्याच्या करता कृतीत आणण्याच्या करता पुढची पिढी देखील उत्तम पद्धतीचे काम करते त्याबद्दल बिपिनजींचा स्नेहलता ताईंचा विवेक त्याबद्दल तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतो

 

चौकट 
महायुतीमुळे विवेक कोल्हे निवडणूक लढू नका आपल्या राष्ट्रवादीचे उमेदवाराला मदत करा त्यांनी ती केली आणि आज महायुतीचे सरकार भक्कमपणे उभी आहे. तुम्ही राजकीय भवितव्याची काळजी करू नका अमित शहा यांनी देखील याची दखल घेतली आहे  तुमचं सगळे राजकीय भविष्य उत्तम होईल.-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,
 
चौकट दोन

 

मला देशाचे गृहमंत्री आणि सहकार मंत्र्यांच्या साक्षीने सांगायचं आम्ही यावेळेस एकनाथराव शिंदे देवेंद्र मी आम्ही सगळे महायुतीचं काम करत होतो अनेक ठिकाणी ताकतीचे लोक होते  कोपरगावच्या  ती जागा आमच्याकडे आम्ही आशुतोष काळे ला उमेदवारी दिली त्यावेळेस कुठलाही मनामध्ये किंतु न ठेवता संजीवनी ग्रुपने मनापासून महायुतीच्या काम केलं त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना लाख लाख धन्यवाद तुमच्या मनामध्ये जे आहे ते शहा साहेबांच्या ही मनामध्ये आहे एवढेच मी सांगतो त्याच्यापेक्षा जास्त त्याबद्दल काही बोलत नाही.- उपमुख्यमंत्री अजित पवार

 

चौकट तीन

संजीवनी ग्रुपला मनापासून अभिनंदन करतो वेळ आणि सगळ्या आता युवकांचा आपला देश आहे आणि म्हणून नवीन नवीन आपल्याला काहीतरी प्रयोग केले पाहिजे ते तू सुरू केले त्याबद्दल मनापासून तुला अभिनंदन बिपिन भाऊचा अभिनंदन धन्यवाद – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

** सभा वेळेवर सुरू झाली यावेळेस प्रास्ताविकात विवेक कोल्हे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, सहकार मंत्री अमितभाई शहा व केंद्र सरकारने या प्रकल्पासाठी कशा पद्धतीने मदत केली याची माहिती दिली. सूत्रसंचालन वसुंधरा काशीकर यांनी केले व शेवटी आभार शेवटी आभार माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी मांनले.

अमित भाई यांचा पैठणीचा पुणेरी फेटा घालून फेटा घालून व हातात नांगर घेतलेला शेतकऱ्याची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.

तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित दादा पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केंद्रीय राज्य सहकार मंत्री मुरलीधर मोहोळ जल मंत्री गिरीश महाजन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आमदार आशुतोष काळे या सर्वांचा बिपिन कोल्हे स्नेहलता कोल्हे व विवेक कोल्हे यांनी बैल जोडी देऊन पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

यावेळी युवकांमध्ये विवेक कोल्हे यांच्या नावाच्या घोषणा देत मोठा उत्साह दिसून आला ठिकठिकाणी यांचे बॅनर महिला व युवकांच्या हातात दिसून येत होते.

यावेळी स्क्रीनवर चित्रफितीच्या माध्यमातून संजीवनी उद्योग समूहाच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला.

Leave a Reply

You cannot copy content of this page