कोपरगाव नगरपालिकेचा नगराध्यक्ष (ओबीसी) नागरिकांचा मागास प्रवर्ग
Mayor of Kopargaon Municipality (OBC) Backward Category of Citizens
अनेक इच्छुकांचे चेहरे खुलले, मोकळा श्वास घेतला
राज्यातील २४७ नगरपालिका आरक्षण जाहीर; ६७ जागांपैकी ३४ जागा ओबीसी महिलांसाठी तर कोपरगाव सह ३३ जागा नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन Mon 6 Oct 16.30 Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव: राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज सोमवारी (६ ऑक्टोबर) रोजी आरक्षणाची सोडत मंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण सोडत जाहीर झाली. आपल्या शहराचे नगराध्यक्षपद कोणत्या प्रवर्गाकडे जाईल याची लोकप्रतिनिधीं मधे प्रचंड उत्सुकता होती. ती उत्सुकता अखेर संपली असून आता आपल्या कोपरगाव शहराचे नगराध्यक्ष पद ओबीसी नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी झाल्याने आता पुरुष आणि महिला कोणालाही नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी करता येईल यामुळे अनेकांचे चेहरे खुलले असून दडपणाने कोंडलेला श्वास मोकळा झाला आहे.
राज्यातील २४७ नगरपरिषदांमध्येही नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाले आहे. यात महिलांसाठी जागा राखीव ठेवण्यात आलेल्या जागापैकी १७ नगरपरिषदा अनुसूचित जाती महिला प्रवर्ग, ३४ नगरपरिषदा ओबीसी महिला प्रवर्ग आणि ६८ नगपरिषदांमधील नगराध्यक्ष पद हे खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव झाले आहेत.
ओबीसी साठी एकूण ६७ जागा राखीव ठेवण्यात आल्या होत्या या जागापैकी ३४ जागा ओबीसी महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या होत्या यात कोपरगाव नगरपरिषदेचा समावेश नसल्याने कोपरगाव चे नगराध्यक्षपद आपसुकच ओबीसी नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव झाले आहे. लोकप्रतिनिधींमधे प्रचंड उत्सुकता होती. नगराध्यक्षपदाच्या या सोडतीमुळे स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणे कमालीची बदलू शकतात. त्यामुळे आता या कोण उभे राहणार, आरक्षणाचा फायदा कोणत्या पक्षाला होणार, याचे विश्लेषण आता राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
Post Views:
127





