मृत्यूनंतर पार्थिवाला मुलींनीच दिला वडिलांना खांदा अन् अग्निडाग

मृत्यूनंतर पार्थिवाला मुलींनीच दिला वडिलांना खांदा अन् अग्निडाग

After death, the daughters gave their father a shoulder and a torch for the funeral pyre.

पढेगावचे ज्येष्ठ समाजसेवक स्वरूपचंद संघवी यांचे निधन

पाच कन्यांनी पार पाडला अंत्यविधी; गावभर शोककळा

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन Tue 7 Oct 19.00 Pm.By  सालकर राजेंद्र

कोपरगाव : मृत्यूनंतर पार्थिवाला मुलाने खांदा द्यावा आणि त्यानेच अग्निडाग द्यावा, अशी प्रथा आहे. मात्र, या सर्व रीतीरिवाजांना फाटा देत कोपरगाव तालुक्यातील पढेगाव येथे पाच मुलींनी वडील येथील ज्येष्ठ समाजसेवक, धर्माभिमानी व माजी उपसरपंच स्वरूपचंद रतनचंद संघवी (वय ९२) यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पार्थिवाला खांदा दिला. तसेच एका मुलीने अग्निडाग दिला. 

त्यांना पाच मुली असून त्यामध्ये — शीतल रविंद्र छाजेड (कोपरगाव),राणी बोथरा (संभाजीनगर), मनिषा खबिया (शिर्डी),सपना शिंगवी (पारनेर),आणि  वर्षा गादीया ( कोळपेवाडी) — यांचा समावेश आहे.

अनेक सामाजिक रूढींना छेद देत, महाराष्ट्रातील आणि देशभरातील काही मुलींनी पुढाकार घेऊन आपल्या वडिलांच्या अंत्यविधीला खांदा दिला आहे आणि त्यांना अग्नी दिला आहे. मुलींनी पित्याचे पार्थिव खांद्यावर घेतल्याने आणि अंत्यसंस्कार पूर्ण केल्याने समाजात एक नवा आदर्श निर्माण झाला आहे, ज्यामुळे मुला-मुलींमध्ये भेदभावाची विचारसरणी मोडून काढली जात आहे. कोपरगाव तालुक्यातील पढेगाव येथे अशाच प्रकारची घटना घडली त्यांच्या पाच मुलींनी परंपरेला आव्हान देऊन वडिलांच्या अंत्यसंस्कारांना खांदा दिला आणि अग्नी दिला.

यांच्या निधनाने गावात तसेच कोपरगाव परिसरात शोककळा पसरली असून ग्रामस्थ व नातेवाईकांत हळहळ व्यक्त केली जात आहे.

स्व. संघवी हे कोपरगाव शहरातील शुभम नागरी सहकारी पतसंस्थेचे व्यवस्थापक रवींद्र छाजेड यांचे सासरे होत. आयुष्यभर त्यांनी ग्रामविकास, सामाजिक कार्य आणि धार्मिक उपक्रमांमध्ये पुढाकार घेत समाजात आदर्श निर्माण केला होता. साधेपणा, सौजन्यशीलता आणि कार्यतत्परता यासाठी त्यांना गावात विशेष मान होता.

त्यांना मुलगा नसल्याने पाचही कन्यांनी एकत्र येऊन पारंपरिक विधीवत अंत्यविधी पार पाडला, ही बाब संपूर्ण परिसरासाठी भावनिक ठरली. कन्यांनी केलेल्या या कर्तव्यपर अंत्यविधीने उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू तरळले.

अंत्यसंस्कारास नातेवाईक, ग्रामस्थ तसेच समाजातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या निधनाने गावातील एक प्रेमळ, समाजहितैषी व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना व्यक्त परत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

Leave a Reply

You cannot copy content of this page