कोपरगावात अमित शहांच्या शेतकरी मेळाव्याने गाठला होता गर्दीचा उच्चांक
Amit Shah’s farmers’ rally in Kopargaon reached its peak of crowd
“न भूतो न भविष्यती’; महिला आणि तरुणांची संख्या लक्षणीय होती.
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन Wed 8Oct 19.00 Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव: कोपरगावात आकाराने मोठे असलेल्या संजीवनी युनिव्हर्सिटीच्या ग्राउंडवर रविवारी भारतीय जनता पार्टीचे केंद्रीय गृहनिर्माण तथा सहकार मंत्री अमित शहा यांच्या सभेच्या निमित्ताने प्रचंड जनसमुदाय एकवटला होता. मैदानासह युनिव्हर्सिटीच्या प्रवेशद्वारापासून सर्वत्र प्रचंड गर्दी जमली होती. यामुळे यापूर्वी राजकीय पक्षांच्या पार पडलेल्या सभांमधील गर्दीसोबत तुलना होऊ लागली आहे. पोलिस प्रशासनाच्या मतानुसार हा आकडा ३० हजाराच्या घरात आहे तर विरोधक २५ हजारांची उपस्थिती सांगत आहेत.भाजपाच्या पदाधिकार्यांकडून मात्र ३५-४० हजाराच्या गर्दीचा दावा केला जात आहे.
आठवडाभरापासून संजीवनी उद्योग समूह सहकार महर्षी शंकरराव कोल्हे कारखाना व भारतीय जनता पार्टीच्या वतीने सुरू असलेली तयारी, कार्यकर्त्यांमार्फत झालेल्या प्रसिद्धीचा फायदा अखेर रविवारच्या ५ ऑक्टोबरच्यासभेत दिसून आला.
अहिल्यानगर दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय मंत्री ना. अमित शहा हे सहकार मंत्री शंकरराव कोल्हे कारखाना व संजीवनी उद्योग समूह यांच्या सीएनजी बायोगॅस व पोटॅश प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी कोपरगाव येथे आले होते यावेळी येथील युनिव्हर्सिटीच्या ग्राउंड वर यांच्या हस्ते वरील दोन्ही प्रकल्पांचे ऑनलाईन उद्घाटन झाले त्यानंतर त्यांनी शेतकरी मेळाव्यास संबोधन केले यानिमित्ताने गर्दीचा उच्चांक गाठला जाईल, असे कोल्हे उद्योग समूह व भाजप पदाधिकाऱ्याकडून सांगितले जात होते. त्याची प्रचिती अमित शहा यांच्या यांच्या शेतकरी मेळाव्याच्या निमित्ताने दिसून आली. दुपारी ३ वाजेची वेळ असली तरी ढगाळलेलं वातावरण असतानाही कोपरगाव तालुका व मतदार संघासह नगर, राहता गणेशनगर, शिर्डी, सिन्नर, येवला, वैजापूर, नाशिक, संभाजीनगर येथून कार्यकर्ते बारा वाजेपासूनच कोपरगावात दाखल होऊ लागले होते. त्यामुळे मैदान श्रोत्यांच्या उपस्थितीने खच्चून भरले होते. तसेच साई तपोभूमी चौकाकडून रेल्वे स्टेशन पर्यंतचा रस्ताही भरला होता. मैदानाच्या आजूबाजूच्या परिसरात ठिकठिकाणी स्क्रीन लावण्यात आले होते लोक मिळेल त्या ठिकाणी बसून सभेचा आनंद घेत होते. गर्दी झाल्याने अमित शहा यांना भव्य अशा व्यासपीठाच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत फिरत चाहत्यांना अभिवादन करावे लागले.
आज पर्यंत झालेल्या सभा
कोपरगावात यापूर्वी सेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची नामदेवराव परजणे यांच्या प्रचारार्थ तहसील मैदानावर भर पावसात सभा झाली त्यानंतर त्याच मैदानावर अशोक काळे यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे यांची देखील सभा झाली शरद पवार यांची आशुतोष काळे यांची प्रचारार्थ झालेली सभा आदित्य ठाकरे यांची सभा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर झाल्या. प्रमोद महाजन यांची नेहरू भाजी मार्केट समोर गुरुद्वारा रोडवर सभा झाली. के बी पी विद्यालय येथे सोनिया गांधी यांची सभा, स्वाध्यायाच्या धनश्री दीदी यांचा केबीपी विद्यालय मैदानावरील मेळावा. आंबेडकर मैदान यावर अनेक सभा झाल्या परंतु त्यापेक्षा मोठ्या सभा तहसील कचेरीच्या मैदानावर झाल्या त्याहीपेक्षा मोठ्या सभा के बी पी महाविद्यालयाच्या विद्यालयाच्या मैदानावर झाल्या त्याहीपेक्षा मोठी सभा विश्व हिंदू परिषदेचे प्रविण तोगडिया सभा सुद्धा फार मोठी झाली होती सर्व सभांचे व कार्यक्रमांच्या गर्दीचा उच्चांक अमित शहा यांच्या शेतकरी मेळावा व उद्घाटन सभेने गाठला होता. सभेस येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर एक वेगळा उत्साह दिसून येत होता. अनपेक्षित आणि उत्स्फूर्त असा प्रत्येक गर्दीचा प्रतिसाद बघून भारावून गेलेल्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी मोठ्या संख्येने उपस्थित जनसमुदायाचे सभासदांचे, नागरिकांचे उपस्थित शेतकऱ्यांचे, महिलांचे आवर्जून पुन्हा पुन्हा आभार व्यक्त केले.
पोलिसांच्या दृष्टीने मैदानाची क्षमता २५ ते ३० हजार आहे. भाजपाच्या पदाधिकार्यांकडून कोपरगाव शहरात आजपर्यंत झालेल्या सभांमधील गर्दीचा हा उच्चांक असल्याचा दावा केला जात आहे.
चौकट
विवेक कोल्हे यांनी येणाऱ्या काळात देशातील साखर कारखानदारीसाठी एक नवा मार्ग उघडला आहे – केंद्रीय मंत्री ना.अमित शहा, साखर कारखानदारीला नवी दिशा देणारे नव्या क्रांतीचे प्रणेते एक युवा नेता विवेक भैय्या- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,
स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांनी उराशी बाळगलेले स्वप्न विवेक कोल्हेंच्या रुपाने त्यांची पुढची पिढी उत्तम प्रकारे काम करीत आहे त्याबद्दल विवेक तुला हार्दिक शुभेच्छा देतो-उपमुख्यमंत्री अजित पवार,
हा देश युवकांचा देश आहे आणि विवेक कोल्हे या युवकांने काहीतरी केले आहे त्याला मनापासून धन्यवाद- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
या सर्वांनी विवेक कोल्हे यांचे कार्याचा गौरव करताना महायुतीसाठी विधान सभेला निवडणूक न लढविता केलेला त्यागा याचा देखील सर्वांनी उल्लेख करीत दखल घेतल्याचे जाहीरपणे सर्व मान्यवरांनी व्यक्त केल्याने व गौरवाने एकीकडे कोल्हे परिवार भारावून गेला, तर दुसरीकडे अपेक्षित नसलेल्या न भूतो न भविष्यती गर्दीमुळे कोल्हे परिवार सुखावला असल्याचे पाहायला मिळाले. कार्यक्रमाच्या नियोजनाबद्दल अनेकांनी त्यांचे जाहीरपणे भेटून अभिनंदनही देखील केले.
Post Views:
41





