कोपरगावात स्थानिक स्वराज्य निवडणुकीचा बिगुल!
The trumpet of local government elections in Kopargaon!
भाजप-दोन्ही राष्ट्रवादी व दोन्ही शिवसेना युतीच्या चर्चांना ऊत — इच्छुक उमेदवारांची धावपळ सुरू
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन Tue27Oct 19.40 Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव :कोपरगाव शहरातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा बिगुल अखेर वाजला असून, शहरातील राजकीय तापमान झपाट्याने वाढले आहे. प्रभागांचे आरक्षण जाहीर होऊन त्यावरील हरकतींचा कालावधी संपल्यानंतर, तसेच मतदार याद्यांवरील दुरुस्त्यांना अंतिम स्वरूप दोन तीन दिवसात येईल, आता सर्वच पक्षांनी निवडणुकीची रणधुमाळी सुरू केली आहे.
भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट व अजित पवार गट) तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि शिवसेना (शिंदे गट) या सर्व पक्षांत तिकिट वाटपासाठी इच्छुकांची लगबग सुरू झाली आहे. अनेक ठिकाणी पक्ष कार्यालयात नेते–कार्यकर्त्यांच्या बैठकांचा सपाटा सुरू असून, इच्छुक उमेदवारांनी वरिष्ठ नेत्यांकडे फिल्डिंग लावण्याचे सत्र सुरू केले आहे.
भाजपात उमेदवारांची स्पर्धा
भाजपमध्ये या वेळी नव्या चेहऱ्यांना संधी मिळेल का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. विद्यमान नगरसेवक आणि नव्याने पुढे आलेले युवा कार्यकर्ते तिकिटासाठी आपापल्या गटातील नेत्यांच्या संपर्कात आहेत. शहरातील काही प्रभागांमध्ये आंतरिक गटबाजीही दिसू लागली असून, उमेदवारी ठरवताना नेतृत्वासमोर आव्हान निर्माण होण्याची शक्यता आहे.
काँग्रेसमध्ये सक्रियता वाढली
काँग्रेस पक्षातही सक्रियता व हालचाली वाढल्या आहेत.
राष्ट्रवादीत वरच्या पदासाठी रस्सीखेच
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये — शरद पवार गटात शांतता दिसत आहे.
आणि अजित पवार गट — तिकिटाच्या वाटपावरून गुप्त हालचालींना वेग आला आहे. शहरातील काही जुने कार्यकर्ते अजित पवार गटाशी संपर्कात असल्याची चर्चा आहे, नगराध्यक्षाच्या उमेदवारीवरून राष्ट्रवादीत दोन बाजू तयार झाल्या आहेत, आणि अंतिम यादीत कोण कुठे असेल हे बघणे औत्सुक्याचे ठरेल.
शिवसेनेत दोन्ही गटांची चुरस
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व शिवसेना (शिंदे गट) यांच्यातही कोपरगावात थेट स्पर्धेचे चित्र निर्माण झाले आहे. दोन्ही गटांनी आपापली संघटनशक्ती वाढविण्यासाठी बैठका आणि जनसंपर्क मोहीमा सुरू केल्या आहेत.
युती-आघाडीचे तर्कवितर्क
दरम्यान, शहरात युती, तसेच आघाडी यावर चर्चा सुरू आहे. मात्र, स्थानिक पातळीवरील नाराजी आणि महत्त्वाकांक्षा लक्षात घेता, या युती कितपत टिकतील, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. अनेक ठिकाणी बंडखोरीचे संकेतही मिळू लागले आहेत.
अपक्षांनी देखील कंबर कसली आहे
जनसंपर्क आणि सोशल मीडिया रणधुमाळी
प्रभागात मतदारसंघात भेटीगाठी, कार्यक्रम, वाढदिवस निमित्त मेळावे सुरू झाले आहेत. काही संभाव्य उमेदवारांनी सोशल मीडियावर प्रचार मोहीम सुरू केली आहे. भावी नगराध्यक्ष प्रभागात माझीच उमेदवारी अशा घोषणांसह बॅनर आणि पोस्टर शहरभर झळकू लागले आहेत.
आगामी आठवडे निर्णायक
निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच कोपरगावातील राजकारण तापले असून, पुढील काही दिवसांत युती, तिकीट वाटप आणि संभाव्य बंडखोरीच्या घडामोडींवर सर्वांचे लक्ष केंद्रीत राहणार आहे. शहरातील मतदारही आता नेत्यांचे पाऊल कोणत्या दिशेने वळते, हे बारकाईने पाहत आहेत.
Post Views:
42





